मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बलिप्रतिपदा किंवा पाडवा

तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा ! या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होते. पाडवा हा एक चांगला मुहूर्त असतो, त्यामुळे सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेद्या या दिवशी केल्या जातात. पती-पत्नीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्याचे काम पाडव्याच्या निमित्ताने होते. त्यामुळे बायकांना या दिवशी नवऱ्याकडून मनासारख्या भेटी मिळवता येतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळून मिळणाऱ्या ओवाळण्याची आतुरतेने वाट बघत असतात! असा हा आनंदाचा पाडवा असतो…. भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहिण भावाच्या आनंदाचा दिवस! यानिमित्ताने मुली माहेरी येतात आणि आई वडील भावंडां बरोबर सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद आता शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकालाच काही ना काही भेटी मिळालेल्या असतात तसेच एकमेकांच्या भेटी ही होतात. सणाचे दिवस कसे संपतात कळत नाही पण चार दिवसाची दिवाळी आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जाते! तसेही आता आपण वर्षभर फराळाचे पदार्थ खातोच, कपडे खरेदी तर कायमच चालू असते त्यामुळे याचे महत्त्व फारसे वाटत नाही.

पण पूर्वीच्या काळी फराळाचे पदार्थ, कपडा खरेदी या गोष्टी प्रासंगिक असत. त्यामुळे दिवाळी कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. तरीही अजूनही आपल्याकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा सण म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस  घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे., लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते.सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून ,पाट रांगोळी करून सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच!मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क,तर मुली रांगोळी काढण्यात!मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम!  आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ  हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची  आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते!

असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली… लक्ष्मीपूजन काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात….

 व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी  होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

वसुबारस

दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!

महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..

 धनत्रयोदशी

दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वैद्य लोक धन्वंतरी ची पूजा करतात धने गुळ याचा नैवेद्य दाखवतात ज्या वैद्यकीय बुद्धीच्या जोरावर आपण रोग्याला बरे करू शकतो, त्या धन्वंतरी बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी!

आता दिवाळी अगदी दारात आलेली असते. पूर्वीच्या काळी घराला अंगण असे त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अंगणात सडा मारून, दारात रांगोळी काढणे, पणत्या लावणे असा कार्यक्रम होत असे. आता फ्लॅट सिस्टीम मुळे ही मजा गेली, तरीही आपल्या छोट्याशा ब्लॉकच्या आत आनंदोत्सव साजरा करायचा म्हणजे आनंदालाच बंधन घातल्यासारखे वाटते! पण कालाय तस्मै नमः !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगाव मध्ये स्वामीजींचा सहवास लाभलेले आणखी एक कुटुंब म्हणजे, हरिपद मित्र आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती मित्र. हरिपद मित्र वन खात्यात विभागीय अधिकारी होते. ते बंगाली असल्याने भाटे वकील ओळख करून द्यायला स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले. दारात, शांत, सौम्य, तेजस्वी, दाढी केलेला तरुण संन्यासी, पायात मराठी वहाणा, अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा असं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून, हरिपद यांना क्षणभर भुरळच पडली. पण पुढच्याच क्षणी तो आपल्याकडे काही मागण्यासच आला असावा, कारण संन्यासी म्हणजे लुच्चा लफंगा असे त्यांचे मत झाले. भाटे वकिलांनी परिचय करून दिल्यावर एका महाराष्ट्रियन ब्राम्हणाकडे बंगाल्याचे जमणे कठीणच म्हणून ते आपल्याकडे रहाण्यासाठीच आले असावेत अशीही भावना झाली. म्हणून हरिपदांनी स्वामीजींना विचारले तुमचं सामान इथेच आणून घेऊ का?

स्वामीजी म्हणाले, “मी वकील साहेबांकडे अगदी आरामात आहे. ते सारे आपल्याला फार प्रेमाने वागवतात. कोणीतरी बंगाली भेटल्यामुळे मी त्यांच्या घरातून हललो तर ते बरं दिसणार नाही. योग्य होणार नाही. त्यांना वाईट वाटेल, सध्या नको, पुढे पाहता येईल.” इथे स्वामी विवेकानंदांचा विवेक दिसतो. यानंतर झालेल्या गप्पांमधून हरिपद यांना स्वामीजींचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. दुसर्‍या दिवशी स्वामींना त्यांनी फराळाला बोलावले, स्वामीजींनी होकार दिला. दुसर्‍या दिवशी हरिपद स्वामीजींची वाट पाहत होते. बराच वेळ झाला स्वामीजी आलेच नाहीत, म्हणून हरिपद त्यांना बघायला भाटे वकिलांकडे गेले. पाहतात तर काय, त्यांच्या भोवती गावातील अनेक वकील, पंडित आणि इतर प्रतिष्ठित यांचा मेळावा जमलेला. कोणी प्रश्न विचारात होते, कोणाचा मुक्त संवाद चालला होता. स्वामीजी चार भाषांतून सर्वांना कुशलतेने उत्तरे देत होते. या रंगलेल्या धर्मचर्चेत एकाने संस्कृतमध्ये विचारले, “धर्मासंबंधी म्लेंच्छ्  भाषेत चर्चा करणे निषिद्ध आहे. असे अमुक पुराणात संगितले आहे”. त्यावर स्वामीजी म्हणाले, “ भाषा कोणतीही असो, त्या भाषेतून चर्चा करायला काही हरकत नाही. हे सांगताना त्यांनी अनेक वेदादिकांमधील संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आणि शेवटी सांगितले, हायकोर्टाचा निकाल खालची कोर्टे झिडकारू शकत नाहीत, पुराणापेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ”.

एका ब्राह्मण वकिलाने विचारले, स्वामीजी संध्या व इतरही आन्हिकांचे सारे मंत्र संस्कृत भाषेत आहेत. ते सारे आम्हाला कळत नाहीत. अशा स्थितीत ते म्हटल्याने आम्हाला काही फळ मिळेल की नाही”? स्वामीजी उत्तरले, “अलबत, तुम्ही ब्राह्मणा पोटी जन्म घेतलेला, थोडासा प्रयत्न केला तर त्या मंत्राचा अर्थ सहज समजून घेऊ शकाल. पण असा प्रयत्नच मुली तुम्ही लोक करत नाहीत. हा दोष सांगा पाहू कुणाचा?आणि अर्थ जरी कळत नसला तरी, संध्या करावयास बसता, तेंव्हा काहीतरी शुभ धर्मकर्म करीत आहोत असे तुम्हाला वाटत असते. धर्मकर्माच्या शुभ भावनेने जर ते आन्हिकं करीत असाल तर तेव्हढ्यानेच त्याचे शुभ फळ तुम्हाला खात्रीने मिळेल”.   

सर्वजण गेल्यावर स्वामीजींना हरिपद दिसताच त्यांच्या निमंत्रणची आठवण झाली. स्वामीजींनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, “एव्हढ्या मंडळींचा हिरमोड करून येणं मला प्रशस्त नाही वाटलं. गैर मानू नका”. यावेळी हरिपद यांनी पुन्हा घरी राहायला येण्याचा आग्रह केला. तर स्वामीजींनी सांगितलं, आधी भाटे वकिलांची परवानगी घ्या. ते हो म्हणाले तर माझी काही हरकत नाही. हरिपद यांनी महाप्रयत्नाने ही परवानगी मिळवली आणि ते स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. हरिपद मित्र यांच्या आयुष्यातला स्वामीजींचा हा सहवास क्रांतिकारक ठरला होता.

हरिपद मित्र अगदी मॅट्रिक होईपर्यंत इंग्रजी शाळेत शिकत असल्याने त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास उडत चालला होता. कॉलेजच्या विषयांबरोबर हक्स्ले, डार्विन, मिल.टिंडॉल, स्पेन्सर प्रभृती या पाश्चात्य पंडितांचा त्यांच्या ग्रंथावरून परिचय झाला होता. अती इंग्रजी शिक्षणामुळे ते नास्तिक बनले, कशावरही श्रद्धा नाही, भक्ति नाही. सर्वच धर्मात त्यांना दोष दिसे. याच वेळी मिशनर्यांचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. ख्रिस्ती धर्म स्वीकारावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. इतर धर्माची निंदा करून वेगवेगळे डावपेच रचून, आधी ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवा मग तो श्रेष्ठ वाटेल, मन लावून बायबल वाचा म्हणजे आपोआप श्रद्धा बसेल, असे त्यांच्या गळी ऊतरवू लागले होते मिशनरी. पण प्रमाणाखेरीज कशावरही विश्वास ठेऊ नये हे तत्व पाश्चात्य विद्येमुळेच त्यांना कळले होते आणि ते त्याच्यावर ठाम पण होते. परंतु मिशनरी आता नेमकं याच्या विरुद्धच सांगू लागले होते. शेवटी गोष्ट इतक्या ठरला गेली की, हरिपदांच्या शंका असलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग बाप्तिस्मा करून ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतील. परंतु सुदैवाने हरिपद यांना तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच कॉलेज सोडलं आणि संसार सुरू झाला त्यामुळे हे धर्मांतर वाचलं. पण यानंतर ही त्यांचा सर्व धर्माचा अभ्यास चालूच होता. चर्चमध्ये जाणं, देवळात जाणं, ब्राह्म समाजात जाणं हे चालू होतं. तरीही सत्य धर्म कोणता, असत्य कोणता, चांगला कोणता, वाईट कोणता हे हरिपद यांना ठरवता आले नव्हते. पण कोणत्यातरी धर्मावर दृढ श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखासमाधानाने  घालवता येईल हे त्यांना पटलं होतं. तरीही चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम स्थिति असताना सुद्धा मन मात्र बेचैन होतं. शांत नव्हतं. सतत कसली तरी हुरहूर असे. स्वामीजींच्या संपर्कात आल्याने त्यांना धर्मासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले. धर्म वादावादीत नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षा अनुभूतीची बाब आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी स्वामीजी म्हणत, ‘मिठाईची पारख होणार ती मिठाई खाऊनच, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, एरव्ही काहीही कळणे कधी शक्य नाही’.  

धर्मजीवनाविषयी अशा प्रकारे त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. अनेक संशय होते  त्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींनी दिली होती. सत्य, धर्म आणि श्रद्धा या विषयावरच्या चर्चेतून आणखी गोष्टींचा खुलासा हरिपद यांना झाला होता. जेंव्हा जेंव्हा सवड मिळे संवाद होई तेंव्हा तेंव्हा हरिपद मित्र ही संधी घेत असत. याबरोबरच स्वामीजी त्यांना आलेले अनुभव पण सांगत.

हरिपद यांच्या पत्नी इंदुमती यांना बर्‍याच दिवसांपासून गुरुमंत्र घेण्याची इच्छा होती.पण हरिपद धर्माच्या बाबतीत साशंक होते आणि योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहूया असे त्यांनी पत्नीला सांगीतले होते.    स्वामीजींन कडून ती घेण्याचा योग आल्याने दोघं ही कृतकृत्य झाले. शिष्यत्व पत्करल्यावर स्वामीजी तीन वेळा फक्त भेटले . प्रथम बेळगावला. नंतर स्वामीजी अमेरिका प्रवासाला गेले त्या आधी आणि नंतर देहत्यागच्या सहा महीने आधी. स्वामीजींनी दीक्षा दिल्यानंतर दोघांचेही सतत स्मरण ठेवल्याचे दिसते.अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी इंदुमतींच्या पत्रात लिहिले होते, “तुमचे उभयतांचे कल्याण असावे अशी प्रार्थना मी नित्या परमेश्वराला करत असतो. परमेश्वराची कृपा असेल तर मी अमेरिकेतून परत आल्यावर आपली भेट होईल. आपण परमेश्वराच्या हातातली केवळ बाहुली आहोत. याचे सदैव स्मरण ठेवा. मन सदैव शुद्ध असावे, विचार उच्चार वा आचार यापैकी कशातही अशुद्धतेचा स्पर्श होऊ देऊ नये. गीतेचे पठण करीत राहा”. अशा प्रकारे हरिपद यांना स्वामीजींचे वैयक्तिक सहवासातून दर्शन झाले होते. बोलता बोलताना स्वामीजींनी हरिपद बाबूंना आपला सर्वधर्म परिषदेला अमेरिकेला जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता.                                  

स्वामीजी आता इथला प्रवास संपवून निघाले. हरिपद यांनी त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला बेळगावमध्ये असताना शिरगावकर यांची ओळख झाल्याने जाताना त्यांनी मडगावच्या सुब्राय नायक यांच्या नावे  परिचय पत्र दिले होते. ते घेऊन स्वामीजी गोव्याकडे रेल्वेने रवाना झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

प्राणी मात्रांच्या सावधपणाची किती उदाहरणे द्यवी तितकी कमीच आहेत. त्सुनामी आली ,त्यावेळी प्राण्यांना त्सुनामीची आधी जाणीव  झाली होती. भूकंप होणार याची जाणीव  मानवाच्याही आधी जंगली प्राण्यांना, पशूपक्ष्यांना आगोदर होते. त्यांचे वर्तन बदलते. पाऊस येणार असल्याची जाणीव पतंग किड्यांना आगोदर होते. बर्याच संख्येने ते दिव्याजवळ येतात .निसर्गात प्राणी आणि पक्षी सावध असतातच.पण झाडांना देखील सावधपणा असतो. संवेदना असतात.हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

हे सगळं लिहीत असताना मला घरातलेच अनुभव आठवले. आमच घर शेतात एकाकी अस होत.टाँमी आणि बंड्या असे दोन कुत्रे, एक जयू गाय,टिट्या, गोट्या असे दोन  भाऊ भाऊ बोके,पोपट आणि आम्ही असे आमचे कुटुंब होते. बर्याच वेळा शेजारच्या पोल्ट्रीतील खाद्य खाण्यासाठी उंदीर यायचे.आणि उंदरांना धरण्यासाठी सापही यायचे. साप आला की, कोंबड्या सावध व्हायच्या.कोंबड्यांचा आरडाओरडा आणि फडफडाट  चालू व्हायचा. आणि आम्हाला सापाची जाणीव करून द्यायच्या.भोवती शेती असल्याने साप, विंचू, सरडे, मुंगूस ही असायचे. आमचे दोन्ही कुत्रे साप दिसला की वेगळा आवाज काढायचे. चोर दिसला की वेगळा आवाज काढायचे. त्यांच्या टोनिंग वरुन  आम्हाला सावध करायचे. दोन्ही बोके कुठेतरी दबा धरून बसलेले दिसले की, ओळखावे. इथे पाल, उंदीर काहीतरी नक्की आहे. कठून शिकले असतील हा सावधपणा?कित्येकदा घरात माझ बाळ रडत असलं तरी आमचा टाँमी मला कूं कूं करून सांगायचा .सावध करायचा.”लक्ष्य आहे की नाही, बाळ रडतय”.बाळाला तिर्हाइतानं कुणी घेतलेल  त्याला आजिबात आवडायचं नाही. परका कोणी घेतो की काय ,याबाबत तो फार सावध असायचा.त्याच्या सावधपणाचे किती कौतुक करावे, आणि किती अनुभव सांगावेत, तितके कमीच  आहेत. आयुष्यभर त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही.

अनेक उपकरणे, अनुभव, प्रयोग यांच्या सहाय्याने प्राणी वर्तन, त्यांच्यातील सजगता, सावधानता यांचा अभ्यास करता येऊ लागला आहे. व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयाला आली आहे. याचा प्रत्येकाने जरूर अभ्यास करावा,असे वाटते.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जमिनीवर रहाणार्या प्राण्यांचे कान हे ध्वनी ग्रहण करण्यास खूपच कार्यक्षम  असतात. हरणाच्या बाबतीत सांगायचे तरंतो प्रत्येक कान स्वतंत्रपणे हालवू  शकतो. स्थिर किंवा विश्रांतीत असताना देखील प्रत्येक कानाकडून मिळालेल्या ध्वनी लहरीची तुलना करून ते ध्वनीचा स्रोत निश्चित करु  शकतात. त्याच्या श्रवण शक्तीची तुलना उपग्रहाशी केली जाते. माकडे , जिराफ, झेब्रे, हे प्राणी समूहाने रहातात. त्यापैकी त्यांचा एक नेता किंवा प्रमुख असतो. तो शत्रूशी सामना करून इतरांचे रक्षण करतो.बाकी सारे त्यांच्या हुकमतीखाली रहातात. त्यांच्या तील सामाजिक वर्तनही उच्च दर्जाचे असते. जंगलात वाघ किंवा सिंह यांची चाहूल लागली की, झाडावरील माकडे विचित्र आवाज काढून त्याची पूर्वसूचना जमिनीवरील प्राण्यांना  देतात. बाकीचे  प्राणी सावध होऊन पळू लागतात. वाघ किंवा सिंह दुरुन एखादे सावज पक्के करतो. आणि त्याचाच पाठलाग करून ते सावज पकडतो.मग बाकीचे प्राणी पळायचे थांबतात. त्यांना समजत की,आपल्या वरच संकट टळल आहे. शिकार झाली की, तरस हा आयत्या  शिकारीवर जगणारा प्राणी सावधानपणे तयारच असतो. एकदा शिकार झाली की, पुन्हा भूक लागेपर्यंत समोरुन प्राणी गेला तरी मारला जात नाही. शिकार कशी करावी, कसे खावे,हे पिल्ले आईकडून शिकतात.

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व ताकदवान प्राणी. ते कळपाने रहातात. अन्नाच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात.आफ्रिकन हत्ती हे भडक डोक्याचे असतात. हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल सर्वांच्या आधी लागते. दोनशे चाळीस  कि. मि.अंतरावरुनही हत्तीना  मुसळधार पावसाची चाहूल लागते. आणि ते अचानक आपली दिशा बदलतात.साधारणपणे हत्तीच्या दिशेने वादळी पाऊस येणार असल्याची माहिती वेधशाळेकडून संशोधकांना मिळाली., हे हत्तीचे एक आश्चर्यजनक सावधपणच नव्हे काय?

अस्वल हा प्राणी कधी एक एकटा किंवा दोघे असे रहातात. वेळोवळी ते एकमेकांची जागा व्यापतात. घाबरलेले अस्वल ओरडत नाही तर जमिनीवर आपटत राहून  फुत्कार टाकतात. जेव्हा ते रागावतात ,तेव्हा ते खालचा ओठ बाहेर काढून कान मागे सारतात.आणि रागाने एक प्रकारे धमकावतात. बर्याच वेळ मागील दोन पायावर उभे राहून सर्व दिशांना मान फिरवून हुंगत रहातात. संवेदनशील होऊन आपले भक्ष्य पकडतात. आणि संकटही ओळखतात.गेंडा हा प्राणीही जंगलात रहातो. त्याची द्रुष्टी तितकीशी ताकदवान नसते. गेंडा घुसखोरांना हाकलण्यासाठी त्यांच्यामागे पळत रहातो. कधीकधी झाडाझुडुपांवर आपटलाही जातो. ठराविक  ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करून आपले क्षेत्र तो पक्के करतो.दूर  कोठे गेला तरी पुन्हा तेथेच येऊन त्याच ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करतो. आपल्या स्थानाबाबत पक्का जागरुक असतो.कुत्रा हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसाच्या संपर्कात आहे. तो इमानदार  राखणदार आणि शिकारी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पाळतात.त्याच्या घ्राणेंद्रियांची क्षमता माणसाच्या आठशेपट जास्त असते. त्यामुळे बाँब शोधक पथकातही तो काम करतो. रक्तदाब ,रूदयरोग , मानसिक ताणतणाव अशा व्याधींवर डाँग थेरपी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.त्यासाठी आता अभ्यासक्रम तयार केले आहेत.वैदिक वांग्मयात देखील कुत्र्याचे उल्लेख आहेत. कित्येकदा नको म्हणून दूरवर नेऊन सोडलेले  कुत्रे दोन–तीन दिवसांनी परत आपल्या दारी आल्याचे आपण पहातो. अशावेळी  त्या सोडणार्या निर्दय माणसाचा राग येतो.केवळ वासाच्या आधारे ते आपले ठिकाण  शोधून काढतात. मांजर या प्राण्याबद्दल सांगायचे तर ते इमानदार नसते.पण वासाने त्याला आपली शिकार समजते. आणि जाणीव झाली की , तासनतास ते सावजाची वाट पहात बसते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.

…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.

गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.

चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.

खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड  आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.

ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.

कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.

मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.

पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे

‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.

…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!

आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!

(आगामी संग्रहातून..)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जलचर  म्हणजे माशांचे प्रकार, कासव ,  मगरी यांचे सावधपण वेगळे असते. शार्क माशांच्या कातडीमधे विद्युत वहन होते. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे व्होल्टेज तयार होते.व त्यानुसार तो डाव्या उजव्या बाजूला जाऊन दिशा ठरवतो.तसेच व्हेल मासा जेव्हा शंभर – शंभर कि. मि. प्रवास करतो तो एक डिग्रीसुद्धा इकडे तिकडे न होता ,सरळ रेषेत प्रवास करतो. याबद्दलचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. सील सारखे सस्तन जलचरसुद्धा चुंबकीय  क्षेत्राचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्रात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांच्या लक्षात येतो.आँक्टोपस आपले अवयव कसेही  वाढवतो आणि सावज पकडतो. तारा मासे विषारी द्रव सोडतात. समुद्री गाय म्हणजे अवाढव्य जलचर! सात सात तास अखंड समुद्रातील वनस्पती खात असतात.व ताशी पाच मैल वेगाने  फिरत असतात. मगरी आपली  अंडी मऊ भुसभुशीत संरक्षित जागेत व डोहाच्या ठिकाणी घालून ती मातीने गाडून त्याची राखण करतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की पोहायला सुरुवात करतात. बदके किंवा राजहंसही एखाद्या प्राण्यापासून धोका आहे असे कळताच त्यावर ते फुत्कारतात.आणि अत्यंत आक्रमक होतात.काही जीवांना उपजतच द्न्यान असते. बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की,लगेच दाणे टिपायला लागतात. आकाशात घार दिसली की कोंबडी वेगळा आवाज काढून आपल्या पिलांना जवळ बोलावते.आणि आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे रक्षण करते.या सावधपणाचे वर्णन कसे करावे?

पक्ष्यांच्या बाबतीत सांगायचे तर, पक्षी स्थलांतर ही अनाकलनीय आणि विस्मयकारक घटना आहे असे म्हणावे लागेल. उत्तर ध्रुवावरील (सैबेरिया)भागात थंडी सुरू झाली की, खाद्याच्या तटवड्यामुळे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे स्थलांतर करू लागतात. एका वर्षात ३६०००कि.मि.प्रवास म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि पुन्हा उत्तर ध्रुव असा न चुकता करतात आणि  रात्री दाट पानांंमधे विश्रांती घेऊन स्वसंरक्षण करतात.अनेक पक्षी आपली विष्ठा पातळ आवरणात ठेवून ,विसर्जन करुन ,घरटे साफ ठेवतात. पिलांना अन्न भरवून ती स्वावलंबी होईपर्यंत सावधपणे त्यांच्या पाठीशी रहातात.सुगरण पक्ष्याचे तर किती कौतुक करावे तितके कमीच.! हिवाळ्यात थंडीची पूर्वसूचना ते लोकांना देतात. कायम थव्याने राहून ,घरटीही मोठ्या संख्येने बांधून, नवीन वसाहतच स्थापन करतात. धोका उत्पन्न झाल्यास चिट् चिट् असा आवाज काढून संपूर्ण वसाहतीला धोक्याचा इशारा देतात. नरपक्षी घरट्याचा पाऊण भाग विणतो.मादीला घरटे पसंत पडले की, मग तो अस्तर लावून घरटे पूर्ण करतो.अशी चार पाच घरटी बांधून कुटुंब वाढवतो.

घरटी बांधताना जमिनीपासून तीस मिटर उंचीवर व घरट्याखाली पाणी असेल अशा  ठिकाणी  किंवा काट्याच्या बाभळीच्या झाडावर अशा निर्धोक जागी घरटे बांधणे पसंत करतो.घरटे बांधताना देखील सुरुवातीला नळीचा आकार ,आतमध्ये  कधी जोडघरेही असतात. जेणेकरुन मोठा पक्षी  आत जाणार नाही. ही सावधानताच नव्हे काय?

सुगरणीवर अनेकांनी कविताही केल्या आहेत. बहिणाबाई तर म्हणतात, “अरे खोप्यामधी खोपा , सुगरणीचा चांगला,एका पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. किती छान!

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत,  “Survival of the fittest “(जगण्यास  जे लायक असतील तेच जगतील .) याचा विचार करता माणूस हा पथ्वितलावर उत्क्रांत झालेला शेवटचा प्राणी. निसर्गाने मानवाला बुद्धीचा  नजराणा बहाल केला आहे. आणि त्याच्या जिवावर तो जमिनी पासून आकाशातच काय, अवकाशापर्यंतचे क्षेत्र आपल्या कवेत घ्यायला लागला आहे. तरीसुद्धा जिद्न्यासा आणि कुतूहलाने प्राणी, पक्षी त्यांचे वर्तन याचा अभ्यास व संशोधन करावेसे वाटायला लागले आहे. कारण त्यांच्या संवेदना माणसापेक्षा कितीतरी पटीनी अधिक असल्याचे लक्षात आले आहे.

‘सावधपणा’ म्हणजे दक्ष असणे, सावध असणे वगैरे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दक्ष व सावध रहावे लागते. सजीव कसे सावध असतात ,याचा विचार करायचा तर अगदी झाडे, वेली, एकपेशीय जीवापासून कीटक, माशा, मुंग्या,जलचर, पक्षी, प्राणी, जंगली प्राणी यांचा विचार करावा लागेल.

अँमिबासारख्या एकपेशीय प्राण्याला स्पर्शेंद्रिय नसते. पण त्याला स्पर्श केल्यास सावध होऊन तो आपले अंग आक्रसून घेतो. युग्लिना या एककोषिक प्राण्यालाही स्पर्शेंद्रिय नसते. पण प्रकाशाची जाणीव करुन देणारे  अतिसूक्ष्म इंद्रिय असते.त्यानुसार त्याला सजगता येते.व तो सावध होतो.

अगदी लहान कीटक वाळवी, मुंग्या, झुरळ, यांच्यामध्येसुद्धा सावधपणा असतो.त्यांचे वर्तन वेगवेगळे असते.त्यांची एक भाषा असते. कामकरी वाळवी किंवा मुंग्या रांगेतून जाताना येताना आपल्या भूमिकांशी स्पर्श करीत चालतात. चालताना त्यांच्या अंगातून एक प्रकारच्या वासाचा द्रव पाझरतो.त्या वासामुळे त्या न चुकता आपापल्या वारुळात परततात. मुंग्या जर चुकून दुसऱ्या समुहात गेल्या दुसऱ्या मुंग्या त्यांना सामावून घेत नाहीत. हुसकावून लावतात. किंवा मारतात. कित्येकदा हवेच्या बदलातला धोका कळल्याने मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना आपण पहातो.हा सावधपणाच ना?नाकतोडा, टोळासारख्या कीटकांच्या पोटावर पातळ असलेले द्न्यानेंद्रिय  ध्वनी ग्रहण करतो. व त्याद्वारे तो  सावध राहू शकतो.काही कीटकात कामकरी असतात ते घरे बांधतात.अन्न गोळा करून संततीची काळजी घेतात.सैनिक असतात ते घर आणि संततीचे रक्षण करतात.मादी कीटक प्रजोत्पादन करते.प्रत्येक जण आपापले काम दक्ष राहून करत असतो. मधमाश्यांबद्दल सांगायचे तर कामकरी माशा मधाचे ठिकाण सापडल्यावर मोहोळावर येऊन विशिष्ट तर्हेने  गोलाकार 8 आकड्याप्रमाणे फिरुन दोन्ही बाजूला हालचाल करतात. आणि मध मिळविण्याची माहिती इतरांना देतात. निरिक्षणाने सिद्ध झालेले आहे की मधमाशीला उत्तम स्मरणशक्ती , हुशारी व वेळेचेही भान असते. कुंभारीण  तोंडाने मातीचा चिखल करुन सुंदर घर  बनवते. व त्यामध्ये अंडी घालते.त्यांच्या वर्तनाबद्दल  खरोखरच आश्चर्य वाटते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ‘ असं ग दि माडगूळकरांचं माणिक वर्मा यांनी गायिलेलं एक गीत आहे. साधारणपणे सावळा रंग म्हटला की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो कान्हा, कृष्ण. मग लक्षात येतं की अरेच्या ! केवळ कान्हाच कुठे आहे सावळा ? राम, विष्णू, शंकर, विठ्ठल असे आपले सगळे महत्वाचे देव तर निळ्या किंवा सावळ्या रंगातच दाखवले जातात. निळा किंवा सावळा रंग. सावळा म्हणजे थोडासा काळा आणि थोडासा निळा देखील. या रंगांमध्ये खरं तर एक जादू, एक गूढ लपलं आहे बरं का ! जे जे अफाट आहे, अगणित आहे, आपल्या नजरेत न मावणारं आहे, ते ते सगळं आहे काळं किंवा निळं. नाही पटत का ? बघा, आपल्या डोक्यावर हे अनंत पसरलेलं आकाश निळ्या रंगाचं आहे. समुद्र ! अथांग पसरलेला. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. तोही निळा. हातात थोडंसं पाणी घ्या. त्याला कुठलाही रंग नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबांनी बनलेला सागर मात्र निळाईची गूढ शाल ओढून आहे. रात्री मात्र हे पाणी गूढगर्भ काळं दिसतं. आणि निळं दिसणारं आकाश ? खरं तर तेही निळं नसतं. उंच अवकाशात गेलो की निळा रंग नाहीसा होऊन सर्वत्र काळ्या रंगाचं साम्राज्य आढळतं. आहे की नाही गंमत ! मग हाच निळा, सावळा आणि काळा रंग आम्हाला शतकानुशतके मोहित करत आला आहे. अगदी ऋषीमुनींपासून तो आजच्या अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांना.

या सावळ्या रंगाची बाधा भल्या भल्या लोकांना झाली हो ! पण ज्याला ज्याला ती झाली, तो तो त्यात रंगून गेला. तो त्याच रंगाचा झाला. त्याला दुसरा रंगच उरला नाही. आणि दुसरा रंगच नको आहे. अगदी मीराबाईंचं उदाहरण घ्या ना ! त्या तर कृष्णभक्तीत आरपार रंगून गेलेल्या. एका कृष्णाशिवाय त्यांना काही दिसतच नाही. ‘ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया.. ‘ असं म्हणताना त्या म्हणतात, ‘ लाल ना रंगाऊ , हरी ना रंगाऊ ‘. दुसरा कोणता रंग त्यांना नकोच आहे. त्या म्हणतात, ‘ अपने ही रंग में रंग दे चुनरिया…’ बस, एकदा त्या हरीच्या सावळ्या रंगात रंगले की झाले. एकदा जो कोणी या सावळ्या रंगात रंगला,त्याला अवघे विश्वच सावळे दिसू लागते. ‘ झुलतो बाई रासझुला… ‘ या सुंदर गीतात त्या अभिसारिकेला सगळेच निळे दिसायला लागते. ती म्हणते, ‘ नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा…’

तर ‘ सांज ये गोकुळी ‘ या सुंदर गीतात संध्याकाळचे वर्णन करताना कवीला सर्वत्र सगळ्याच गोष्टी सावळ्या किंवा श्याम रंगात बुडालेल्या दिसतात.

सांज ये गोकुळी सावळी सावळी अशी सुरुवात करून कवी म्हणतो. ही सांज कशी आहे तर, ‘ सावळ्याची जणू सावली. ‘

धूळ  उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या …. तर पुढे तो म्हणतो

पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहुली.

संध्यासमयी दिसणाऱ्या पर्वतरांगेला एखाद्या काजळाची रेघ म्हणून कवीने तिचे सौंदर्य आणखी वाढवले आहे. आणि कवितेचा शेवट तर काय वर्णावा ! कवी म्हणतो

माऊली सांज अंधार पान्हा

विश्व सारे जणू होई कान्हा

मंद वाऱ्यावरी वाहते बासरी

अमृताच्या जणू ओंजळी

प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचं हे अप्रतिम गीत. आशा भोसलेंनी अजरामर केलंय. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो सांज म्हणजे संध्याकाळची वेळ जणू माऊली. सगळीकडे आता अंधाराचं साम्राज्य पसरू लागलंय. अशा या संध्यासमयी अवघे विश्व जणू कान्ह्याचे रूप घेते ! संध्यासमयीचा मंद, शीतल वारा वाहतो आहे. असा हा वायू आपल्या लहरींबरोबर जणू कान्ह्याच्या बासरीचे सूर दूरवर वाहून नेतो आहे. श्रीकृष्णाची ही बासरी इतकी गोड आहे की काय सांगावं ? कवी म्हणतो, ‘ या बासरीच्या स्वर लहरी नाहीतच तर जणू अमृताच्या ओंजळी आहेत ! ‘जेव्हा सावळ्या रंगात आपण रंगून जातो, तेव्हा आपल्याला कान्हा, बासरी, त्याचा श्यामल वर्ण सगळीकडे दिसतो.

अशीच एक अभिसारिका. रात्रीच्या वेळी यमुनेवर पाणी आणायला निघालेली. रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला आहे. ही सुंदर भक्तिरचना आहे विष्णुदास नामा यांची. विष्णुदास नामा हे संत एकनाथांचे समकालीन. बरेच लोक संत नामदेव आणि विष्णुदास नामा यांच्यात गल्लत करतात. पण हे दोघेही वेगळे. तर विष्णुदास नामा आपल्या सुंदर रचनेत म्हणतात

रात्र काळी घागर काळी

यमुनाजळेही काळे वो माय

रात्र काळ्या रंगात रंगलेली आहे. पाण्याला निघालेल्या या अभिसारिकेची घागरही काळ्या रंगाची आहे आणि यमुनेचे पाणीही रात्रीच्या अंधारात काळेच दिसते आहे. पुढे कवी म्हणतो

बुंथ काळी बिलवर काळी

गळा मोती एकावळी काळी वो माय

बुंथ म्हणजे अंगावर आच्छादण्याचे वस्त्र, ओढणी वगैरे. तेही काळ्या रंगाचेच आहे. तिच्या अंगावरचे सगळे दागिने एवढेच काय पण गळ्यात असणारी मोत्यांची माळ देखील काळीच आहे. ती पुढे म्हणते

मी काळी काचोळी काळी

कांस कासिली ती काळी वो माय

तिच्या अंगावरची सगळी वस्त्रे देखील काळ्या रंगाचीच आहेत. खरं तर ती गोरी आहे पण सावळ्याच्या रंगात एवढी रंगली आहे की स्वतःला ती काळीच म्हणवून घेते एवढी या काळ्या रंगाची जादू आहे. या अशा रात्रीच्या समयी अंधारात सगळीकडे जिथे काळ्या रंगाचेच साम्राज्य आहे, तेव्हा मी एकटी कशी जाऊ ? मग ती आपल्या सख्याना म्हणते

एकली पाण्याला नवजाय साजणी

सवे पाठवा मूर्ती सावळी.

अशा वेळी मला प्रिय असलेली सावळी मूर्ती म्हणजेच श्रीकृष्णाला माझ्याबरोबर पाठवा म्हणजे भय उरणार नाही. शेवटी कवी म्हणतो

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी

कृष्णमूर्ती बहू काळी वो माय

विष्णुदासांचा ज्या मूर्तीने ताबा घेतला आहे ती मूर्तीही काळीच आहे. म्हणजेच ते म्हणतात माझा स्वामी सावळा असा श्रीकृष्ण आहे.

अशी ही सावळ्या रंगाची बाधा. गोपींपासून राधेपर्यंत सर्वांना झालेली. ऋषीमुनी, कवी देखील यातून सुटले नाही. एकदा जो या रंगात रंगला, त्याचे वेगळे अस्तित्व राहतेच कुठे? आणि वेगळे अस्तित्व हवे आहे कुणाला ? म्हणून तर मीराबाईच्या शब्दात त्याला , त्या श्याम पियाला अशी विनंती करू या की माझ्या जीवनाचे वस्त्र तुझ्या रंगात असं रंगवून टाक की

ऐसी रंग दे के रंग नाही नाही छुटे

धोबीया धोये चाहे सारी उमरिया…

बाबारे, तुझ्या रंगात मला असे रंगून जाऊ दे की संसारात येणारे व्याप, ताप या कशानेच तो रंग जाणार नाही.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

१६/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print