image_print

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ युगांत – (हिन्दी भावानुवाद) – डॉ प्रतिभा मुदलियार (मूल मराठी लेखक – डॉ विनोद गायकवाड) ☆ हेमन्त बावनकर ☆

हेमन्त बावनकर ☆ युगांत - (हिन्दी भावानुवाद) - डॉ प्रतिभा मुदलियार (मूल मराठी लेखक - डॉ विनोद गायकवाड) ☆ हेमन्त बावनकर ☆ प्रिय मित्रो, डॉ विनोद गायकवाड जी के शब्दों में  - "महाभारत यानी कभी भी खतम न होनेवाली अक्षय सुवर्ण की खान! कोई भी उसमें से कितना भी सोना निकाल कर ले जाए पर यह खान कभी खतम नहीं होती। महाभारत के दो सर्वश्रेष्ठ व्यक्तित्व हैं ‘भीष्म पितामह’ और ‘श्रीकृष्ण’!!" भीष्म पितामह के जीवन पर आधारित एवं डॉ विनोद गायकवाड़ जी द्वारा रचित 'युगांत'एक अभूतपूर्व उपन्यास है। यह उपन्यास मराठी के अतिरिक्त तमिल में भी प्रकाशित हो चूका है।  डॉ प्रतिभा मुदलियार जी ने 'युगांत' का अत्यंत सजीव हिन्दी भावानुवाद किया। भावानुवाद की  भाषा शैली पूर्णतः मौलिक एवं  कालखंड के अनुरूप है जो इस उपन्यास को विश्वस्तरीय श्रेणी में अपना स्थान बनाने में  पूर्णतः सफल है। आप इस उपन्यास की रोचकता का अनुमान इस बात से लगा सकते हैं कि - जब मैंने इस 460 पृष्ठ के उपन्यास को एक बार पढ़ना प्रारम्भ...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर  ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी)  गंगाधर देवराव खानोलकर गंगाधर देवराव खानोलकर  (19 ऑगस्ट 1903 - 30 सप्टेंबर 1992) हे लेखक, चरित्रकार व पत्रकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खानोली गावात झाला. खानोलकरांचे वडील ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारे आणि आई स्वाभिमानी, स्वावलंबी व त्यागी होती. त्यांचे दृढ संस्कार खानोलकरांवर झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम घरीच, नंतर सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसले नाहीत. यानंतर खानोलकर रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतमध्ये  वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाले.तेथे त्यांना थोर विद्वानांचे व रवींद्रनाथांचेही मार्गदर्शन लाभले. भरपूर वाचन, चिंतन, मनन वगैरे शैक्षणिक संस्कार त्यांना आयुष्यभर साहित्यसेवेची प्रेरणा देत राहिले. त्यानंतर अंमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी दोन वर्षे तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. काही काळ त्यांनी तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात अध्यापन केले. पुढे ते मुंबईत 'लोकहित', 'विविधवृत्त', 'प्रगती', 'रणगर्जना साप्ताहिक', 'वैनतेय साप्ताहिक' इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले. खानोलकरांनी एकूण 22ग्रंथ लिहिले. अर्वाचीन वाङ्मय (खंड 1 ते 9), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र,...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २७ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)  कविता महाजन मराठी साहित्यात वैचारिक बंड करून स्वतःचे निशाण अल्पायुष्यात फडकवणा-या कविता महाजन यांनी काव्यलेखनाने प्रारंभ  करून  पुढे साहित्याच्या विविध प्रांतात लेखन केले. कविता, कादंबरी, कथा, बालसाहित्य व अनुवादित साहित्याची निर्मिती करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे की त्यांनी ते लेखन, चित्रे, फोटोग्राफी, कॅलिग्राफी अशा विविध माध्यमातून सादर केले आहे. तसेच 'भारतीय लेखिका 'या पुस्तकातून त्यांनी अनेक भारतीय भाषांतील लेखिकांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे मराठी साहित्यातील हे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणावे लागेल. त्यांनी आदिवासी प्रदेशात काम करून तेथील समाजजीवनाचा अभ्यास केला होता. त्यातूनच पुढे वारली आणि आदिवासी लोकगीतांचे संकलन त्यांच्या कडून पूर्ण झाले. आणखी एक वेगळा पैलू म्हणजे त्यांनी पाकशास्त्रासंबंधीही लेखन केले व तेही अत्यंत गांभीर्याने लिहीलेले आहे. 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या दीर्घकवितेने त्यांचे काव्यलेखन उच्च पातळीवर जाऊन पोहोचलो आहे. 'ब्र' आणि 'भिन्न' या त्यांच्या दोन कादंब-यांनी   त्यांना कादंबरी विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. ब्र...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी)  विद्याधर गोखले विद्याधर संभाजीराव गोखले (4 जानेवारी 1924 - 26 सप्टेंबर 1996) हे पत्रकार व संगीत नाटककार होते. प्रथम गोखले शिक्षक म्हणून काम करत होते.नंतर ते पत्रकार म्हणून 'नवभारत'मध्ये व पुढे 'लोकसत्ता'त गेले.त्यांनी 'साप्ताहिक लोकसत्ते'ची  पूर्ण जबाबदारी सांभाळली. पुढे  ते 'दैनिक लोकसत्ता'चे संपादक झाले. अमरावतीत त्यांना 'सावधान' या वृत्तपत्राच्या वीर वामनराव जोशी यांचा सहवास लाभला. त्याबरोबरच गोखलेंनी न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा खास अभ्यास केला. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी ह. रा. महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. त्यांनी विपुल प्रमाणात संपादकीय लेखन केले. त्यांची शैली गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे झुकणारी होती. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत.संपादकाने प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्यांकडे,भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यांचे लेखन सरळ, सुबोध असून त्यात विनोदाचा शिडकावा असे. 'सं.जय जय गौरीशंकर', 'सं. पंडितराज जगन्नाथ', 'सं. मदनाची मंजिरी', 'सं. मंदारमाला', 'सं....
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ सप्टेंबर – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २५ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)  अरुण मार्तंडराव साधू (१७ जून १९४१- २५ सप्टेंबर१७ ) अरुण साधू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथे झाला. गणित व भौतिकशास्त्राचे ते पदवीधर होते पण त्यांनी कार्यक्षेत्र निवडले, ते मात्र पत्रकारिता आणि साहित्य लेखन. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले. केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया इ. वर्तमानपत्रांसाठी त्यांनी वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. फ्री-प्रेस जर्नलचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. १९८९नंतर ते स्तंभलेखनाकडे वळले. त्यांचे स्तंभलेखनही गाजले. त्यांनी विपुल साहित्य लेखन केले. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती सांगायच्या झाल्या, तर फिडेल चे आणि क्रांती, ड्रॅगन जागा झाला, तिसरी क्रांती- लेनिन, स्टॅलीन ते गोर्बाचेव्ह, झिपर्याइ, मुंबई दिनांक, सिंहासन इ. पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ या ग्रंथाचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. आंबेडकर’ या चित्रपटासाठी त्यांनी संहिता लेखन केले. ‘सिंहासन’ हा अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)  मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा आज स्मृतिदिन .  ( कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० - २४ सप्टेंबर, इ.स. २००२ ) जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता. कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथात अरबी, तुर्की, फारसी भाषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली, आणि हा व्युत्पत्तीकोश परिपूर्ण करण्याचे महत्वपूर्ण काम जोशींनी केले. ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये प्रकाशित झाली. श्री. जोशी यांनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात पुस्तके महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)  भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर: विविध प्रकारचे लेखन करूनही प्रामुख्याने नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.वि.तथा मामा वरेरकर यांचा जन्म कोकणातील चिपळूण येथे झाला. मालवण, रत्नागिरी येथे शिक्षण झाले. कोकणातील प्रसिध्द अशी दशावतार ही नाट्यमय लोककला  लहान वयातच पहायला मिळाली. त्यामुळे नाटकांविषयी गोडी निर्माण झाली. आपणही  काहीतरी, नाटक लिहावे असे वाटू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी 'नवीन रासक्रीडा' नावाचे नाटक लिहीले. ते यशस्वी झाले नाही. पण आपण नाटक लिहू शकतो हा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. ते नाटक कंपन्या,नाटककार यांच्याशी संपर्क वाढवू लागले व पुढे नाट्य लेखनाचे आपले स्वप्न त्यांनी समर्थपणे साकार केले. मोठेपणी त्यांना टपाल खात्यात नोकरी मिळाली. पण लेखानाच्या प्रेमापोटी त्यांनी ती काही काळानंतर सोडून दिली व संपूर्ण काळ लेखन केले. सुमारे सदतीस नाटके, सहा नाटिका कथा, कादंब-या, रहस्यकथा, बंगाली साहित्याचा अनुवाद, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. शिवाय ते सक्रीय राजकारणातही सहभागी होते. 1908 साली कुंजविहारी हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. पण...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ सप्टेंबर – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)  सदानंद शांताराम रेगे (२१जून १९२३ – २१ सप्टेंबर १९८२) सदानंद रेगे हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कोकणात राजापूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. शालांत परीक्षेनंतर ते मुंबईत आले. चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. त्यानंतर १९४२मध्ये ते एका मिलमध्ये डिझायनर म्हणून कामाला लागले. काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरीही केली. कीर्ती कॉलेजमधून एम. ए. केल्यानंतर माटुंगायेथील रुईया कॉलेजमध्ये ते रुजू झाले. सदानंद रेगे यांची प्रकाशित पुस्तके – कथा संग्रह - १.जीवनाची वस्त्रे,२. काळोखाची पिसे , ३. चांदणे, ४. चंद्र सावली कोरतो, ५. मासा आणि इतर विलक्षण कथा कविता संग्रह - १.अक्षरवेल, २. गंधर्व, ३. वेड्या कविता, ४. देवापुढचा दिवा, ५. बांक्रुशीचा पक्षी            अनुवादीत – १. जयकेतू ( ओडीपसचे रूपांतर ), २. राजा इडिपस (अनुवाद), ३.बादशहा, ४. ज्याचे होते प्राक्तन शापित, ५. ब्रांद, ६ गोची बालगीते – १. चांदोबा चांदोबा, २. झोपाळ्याची बाग अनुवादीत कविता – ब्लादिमिर मायक्रोव्हस्कीच्या कवितांचा अतिशय सुंदर अनुवाद ‘पॅंटघातलेला ढग...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक म्हणून ओळखले जाणारे श्री.अशोक रामचंद्र केळकर यांचा आज स्मृतीदिन.  (२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४).  श्री. केळकर यांचा जन्म पुण्यातला. शिक्षणही पुण्यातच झाले . इंग्रजी भाषा व वाङ्मय हा मुख्य विषय आणि फ्रेंच हा उपविषय घेऊन त्यांनी पुणे विद्यापीठातून एम्. ए. भाषाविज्ञानाच्या अभ्यासासाठी रॉकफेलर प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळवली आणि अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात संशोधन केले होते. १९५८ मध्ये याच विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त केली होती. याच वेळी त्यांना लिली प्रतिष्ठानतर्फे ’तौलनिक साहित्य व समीक्षा’ यासाठी अभ्यासवृत्ती मिळाली.भारतात परत आल्यानंतर आग्रा येथील के. एम्. इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी स्टडीज अँड लिंग्विस्टिक्स या संस्थेत ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून ४ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर पुण्यात डेक्कन महाविद्यालयात प्रारंभी प्रपाठक व नंतर प्रोफेसर म्हणून त्यांनी अध्यापन केले. तेथील भाषाविज्ञानाच्या प्रगत अध्ययन केंद्राचे ७ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तेथूनच १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी हिंदी, इंग्रजी व मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले.भाषाविज्ञानाबरोबरच...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)  प्रिया तेंडुलकर  प्रिया तेंडुलकर या सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. पण ही त्यांची खरी ओळख नव्हे. कारण त्यांनी स्वतःचे विचार, अभिनय आणि लेखन यातून नाट्य, चित्र व साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. अंकुर, देवता, माहेरची माणसं, राणीनं डाव जिंकला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार इत्यादी चित्रपटातून त्यांनी कामे केली. शाम बेनेगल दिग्दर्शित 'अंकुर' हा त्यांचा पहिला चित्रपट. त्या भारतातील पहिल्या टी.व्ही. स्टार म्हणून ओळखल्या जातात. 'रजनी' ही त्यांनी काम केलेली दूरदर्शन मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या व्यतिरिक्त प्रिया तेंडूलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बिबी के, हम पाॅच या मालिकात त्यांनी काम केले होते. 'दामिनी' ही त्यांची मराठी मालिकाही खूप गाजली होती. एक हट्टी मुलगी, गिधाडे, ती फुलराणी या मराठी नाटकातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. फर्स्ट पर्सन हे त्यांचे आत्मचरित्र. असंही, पंचतारांकित या नावाची ललित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शिवाय जन्मलेल्या प्रत्येकाला, जावे तिच्या वंशा, ज्याचा त्याचा प्रश्न हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले...
Read More
image_print