सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌺 अधिक आनंदाचा मास  अभिनंदन – 🌺

तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेतर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे 2023 साठीचे राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार नुकतेच जाहीर  झाले आहेत. या पुरस्कार  विजेत्यांमध्ये ई-अभिव्यक्ती मराठीमध्ये लेखन करणा-या साहित्यिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आम्हाला याचा अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटते. या सर्व  पुरस्कार विजेत्यांचे ई-अभिव्यक्ती समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !💐

सर्वांचे माहितीसाठी पुरस्कार विजेते व त्यांच्या कलाकृती याप्रमाणे :–  

1  डाॅ.सोनिया कस्तुरे – सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह : नाही उमगत ती अजूनही.

2 सुश्री वीणा रारावीकर – उत्कृष्ट काव्यसंग्रह : गुजगोष्टी शतशब्दांच्या.

3 श्री रवींद्र सोनवणे – गझलसंग्रह : प्रथम पुरस्कार : जाणीवांची आवर्तने.

4 श्री विश्वास विष्णु देशपांडे –  विशेष प्रेरणादायी व्यक्तीकथा: अष्टदीप.

5  सुश्री राधिका भांडारकर  – जीजी : आत्मानुभव व्यक्तीकथा.

6 सुश्री वंदना हुळबत्ते – बालकथासंग्रह : गांडुळाशी मैत्री.

7 श्री सुजीत कदम – बालकाव्यसंग्रह : अरे अरे ढगोबा 

8 सुश्री संध्या बेडेकर – सहज मनातलं शब्दात.

सर्व  पुरस्कार  प्राप्त  साहित्यिकांचे पुनःश्च  अभिनंदन ! ✒️ 🌺

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments