मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ झाड… ☆ मेहबूब जमादार ☆
नभ झरे झाडावर
पान पान शहारतं
त्याच्या गर्द सावलीत
अवघ जग विसावत
झाड मोहरते तेव्हा
गंधाळतो परिसर
अन पक्ष्यांच्या थव्याने
झाड भरते लवकर
भर उन्हाळी छायेचा
पांथस्थानाही विसावा
त्याच्या फांद्यावरती
कलकले पक्षांचा थवा
असे सुरेखसे झाड
उभे माझ्या वाटेवर
जाता वाटे त्याच्या
जीव थांबे क्षणभर
झाड फुलून पक्ष्यांनी
झाडाला गाता यावे
माझ्या मनाला वाटते
आपणच झाड व्हावे….
आपणच झाड व्हावे……
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈