सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

|| एकदा आपल्या मुलींना यांच्या जागेवर ठेऊन पाहूयात???…..अखेर भीती संपली ||

आज दादर प्लॅटफॉर्म बाहेर तिकीट काउंटर येथे सहा शिकणाऱ्या मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या, त्रस्त असलेल्या, चिंतीत व भयभीत अवस्थेत दिसल्या.. 

मुंबईत हे दृश्य सायंकाळच्या 7.30 ते 8.00 च्या वेळेचे होते… या मुली बाहेर जमिनीवर अश्या का बसल्या आहेत ? विचारणा केली असता किती वाईट व्यवस्था व भीतीदायक परिस्थिती आहे हे कळाले…. 

आपल्या गांव खेड्यातून येणाऱ्या एकट्या मुलींसाठी ही किती गांभीर्याची बाब आहे …… ( सदिच्छा मनीष साने, ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता होते आणि मग तिचा खून या घडलेल्या घटनेनेही आपण सावध अजूनही नाही कसे????) …हे मुंबईत घडत असताना आपण इतके निष्काळजी कसे ?????…..

अश्या अनेक मेहनती मुली आपल्या कुटुंबीयांचे आधार असतात….मुंबईत एकट्या येतात परीक्षा देतात आपल भवितव्य घडविण्यासाठी….

नाशिक जिल्ह्यातून अश्याच या सहा मुली मुंबईत नायगांव येथे पोलिस भरती परीक्षेला आलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या घरी वाट बघत असलेल्या  या लाडक्या मुली दुर्दैवाने त्यांना पोलिस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी नायगांव येथे राहण्याची जागा अचानक नाकारण्यात येते, जागा तुडुंब भरलेली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात येते…. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नाही… या बिचाऱ्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत पण कोणीच कसलीच मदत करत नाहीत … आम्ही रात्र काढायची कुठे??? याचे कोणी उत्तर देत नाही…. खरंच शरमेची गोष्ट आहे….

या सहा मुली रात्री कुठे जातील?? कुठे राहतील?? काय खातील?? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा बाहेर अंधारात कोण करतील???? किंवा रस्त्याकडील फूटपाथ वर या मुलींचे संरक्षणाचे काय???….  हा विचार कोणालाही पडला नाही ???? मग काही अनर्थ घडले की मेणबत्ती घेऊन आपण सगळे काही वेळ मैदानात….मग आपआपल्या घरी…. ही दयनीय व्यवस्थेची अवस्था पाहून भीतीदायक वाटले आणि या सहा मुलींची चिंता वाटू लागली आणि वाईटही…

आपल्या शेतकऱ्यांची ही मुले गावा खेड्यातून पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहेनत घेऊन मुंबईत येत, या मुली आपल्या कुटुंबीयांचा आधार असत आणि पोलिस परीक्षेला मुंबईत आल्यावर या मुलींनाच आपल्या सुरक्षेची भीती वाटणारे घडत…. सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येत…. मग नंतर कोणीतरी 5000 रुपये मागत गेस्ट रूम चे…. 

कुठून देणार या शेतकऱ्यांच्या मुली इतके पैसे एका रूम चे???म्हणून या मुली एकत्र पुन्हा दादर स्टेशन परिसरात आल्या…व तेथे बसल्या….व प्रत्येक मुलगी चिंतेत होती रात्री काय होईल आपले ????कसे होईल ???

दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबल ला विचारले असता त्यांनी ही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्म वर असलेल्या विश्रामगृहात 2 तासांच्या वर राहता येणार नाही असे ते म्हणाले..मग दोन तासांनी या 6 मुली रात्री कुठे जाणार????…. 

या सहा मुली जेथे बसलेल्या होत्या तेथे गर्दुल्ले, पाकीट मार सतत फिरतात हे ही पोलिस कॉन्स्टेबल यांनी सांगितले म्हणाले रात्रीचे इन्चार्ज या मुलींना बसू देणार नाहीत मी आहे तोवर इथे बाहेर बसा पण सामानाची काळजी घ्या….मी इथेच आहे काही वेळ….

रात्रीच्या भीतीच्या विचारात असताना मी या सहा मुलींना पाहिले व ही सगळी बाब ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला व त्यांचा फोन व्यस्त असल्याने लगेचच वर्षा बंगल्यावर फोन केला, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं एकताच ताबडतोब स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधला व त्या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्याची व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रुममध्ये तत्काळ व्यवस्था केली …. 

सकाळी 5.00 वाजता ग्राउंड वर धावण्याची, अंग कासरतीची परीक्षा म्हणजे आदल्या दिवशी पुरेस जेवणं आणि पुरेशी झोप…या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव हे कर्तव्यात खरे उतरले…. 

या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे वा रेल्वे स्टाफ यांचे मनःपुर्वक आभार मानले…CM एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे….

रात्रीची भीती ?…अखेर संपली….

पण जर पूर्णतः संपल्यास बरे होईल अशी ग्वाही या मुलींच्या कुटुंबीयांनी दिली आहे….या परिस्थतीचा विचार करून प्रशासनाने काळजी घेत योग्य तो निर्णय घेऊन GR काढला तर बाहेरगावाहून येणाऱ्या या आपल्या मुली मुंबईतही पूर्ण: सुरक्षित राहतील ……

जरा आपण सगळ्यांनी काही क्षणासाठी आपल्या मुलींना या मुलींच्या जागेवर ठेऊन पाहूयात ???? किती भीतीदायक आहे असे घडणे.  

लेखक : अस्मिता (वार्ताहर)

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments