सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शंकर उर्फ काका बडे ( ३मार्च १९४७ – १ सप्टेंबर २०१६ )

शंकर उर्फ काका बडे हे यवतमाळयेथील वर्हा्डी कवी. वर्हा डी बोलीभाषेत त्यांनी कविता लिहिल्या. ते कविता आणि किश्श्यांचे एकपात्री कार्यक्रम करत. वर्हााडच्या ग्रामीण जीवनातील अनुभव त्यांनी बॅरिस्टर गुलब्या या एकपात्री प्रयोगातून साकारले. महाराष्ट्रात याचे ३०० प्रयोग झाले.

आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र आणि दिवाळी अंक यातून त्यांनी लेखन केले.

भाग्योदय मंडळाच्या शिवरंजनी आर्केस्ट्रात निवेदक म्हणून त्यांनी काम केले.  

शंकर उर्फ काका बडे यांचे कविता संग्रह –  १.    इरवा, २. आससा वर्हााडी माणूस, ३. मुगुट

इतर लेखन – धपाधूपी आर्णी येथे २१-२३ फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या ६३व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

☆ ☆ ☆ ☆ ☆

शंकरराव गंगाधर जोशी (१७ मे १८८७ – १ मे १९६९)

शंकरराव गंगाधर जोशी संगमनेरयेथीलजुन्या पिढीतील बहुश्रुत, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे होते. ते  निष्ठावान देशभक्तही होते. त्यांच्या प्रयत्नामुळे नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज व संगमनेर महाविद्यायाचे ते प्रवर्तक व संस्थापक होते. संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले.

शंकरराव गंगाधर जोशी लेखन – संपादन

१.    चित्रकलेवरी काही पुस्तके, २.हिदी शब्दकोश, म्हणी, व्याकरणविषयक पुस्तके, ३. हिन्दी काहवत कोश, ४. स्वतंत्र भारत संकीर्तन, ५. अहमद जिल्ह्याचा इतिहास

 हिन्दी काहवत कोश या पुस्तकाला व्हार्नाक्युलर ट्रान्सलेटर सोसायटीचा पुरस्कार  मिळाला होता.

☆ ☆ ☆ ☆ ☆

काशिनाथ त्र्यंबक तेलंग ( ३० ऑगस्ट १८५०- १सप्टेंबर १८९३ )

  काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे न्यायाधीश होते. लेखक व संपादक होते. सुधारक विचारसरणीचे होते. १८८९ साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १८९२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान –

इ.स. १८७० मधे त्यांनी शंकराचार्य यांचे चरित्र हा निबंध लिहिला. १८७२ मधे रामायणावर एक अभ्यासपूर्ण निबंध लिहून, डॉ. वेबर यांनी रामायणावर मांडलेला सिद्धांत खोडून टाकला. भागवद्गीतेवरही अभ्यासपूर्ण निबंध लिहून, लेरिंगर यांचे भागवद्गीतेवरचे प्रतिपादन तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले.

१८७४ साली मुंबई सरकारसाठी भर्तृहरीची नीति आणि वैराग्य ही शतके एकत्र करून पुस्तक लिहिले. १८८४ साली मुंबई सरकारसाठी विशाखादत्त याच्या ‘मुद्राराक्षस’ या संस्कृत नाटकाची सटीप आवृत्ती लिहिली. त्यांना मातृभाषेचा अभिमान होता. ‘स्थानिक राज्यव्यवस्था’ आणि ‘शहाणा नेथन ( अनुवादीत) ही पुस्तके त्यांनी मराठीत लिहीली.

मराठी लोकांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे, म्हणून त्यांनी ‘हिंदू युंनियन क्लब’तर्फे ‘हेमंतोत्सव ‘ व्याख्यानमाला सुरू केली. मराठी साहित्याच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र भाषा संवर्धक मंडळ’ या संस्थेचे तेलंग संस्थापक होते. 

काशिनाथ तेलंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्कार –

  1. एल्फिस्टन कॉलेजमधे ‘तेलंग विंग’ या नावाने वसतिगृहाची इमारत बांधण्यात आली. आहे.
  2. माटुंगायेथील एका रस्त्याला ‘तेलंग मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

आज शंकर उर्फ काका बडे, शंकरराव जोशी आणि न्या. काशीनाथ तेलंग या तिघांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त या तिघांना सादर वंदन. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments