सुश्री आरूशी दाते

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   पंचम  कड़ी  फोटो …।इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

 

? मी_माझी  – #5  – फोटो  …? 

 

ए तू फ्रेममध्ये येत नाहीयेस… संध्याचा अजून जवळ उभी राहा…

नीट घे रे फोटो, गोरी दिसली पाहिजे, बारीक डिसें ह्याची काळजी घेशीलच… पदर नीट येतोय ना…

पटकन काढ रे, किती वेळ लावतोस… रेड आय येणार नाही ना…

फ्लॅश हवाय का?

Instructions देऊन देऊन फोटोग्राफरला भंडावून सोडतो नाही…

हे सगळं झाल्यावर फोटोग्राफरने say cheese म्हटलं की आपले सुंदर हास्य चेहऱ्यावर आणतो आणि फोटो क्लिक केला जातो…

त्यानंतर जनरली फोटोग्राफर thank you म्हणतो… तो हे म्हणायच्या आधीच आपण, ए बघू बघू कसा आलाय फोटो?

ए काय रे, मी थोडी झाकली गेली आहे ना, पदर नीट नाहीये, अशी अनेक कारणं सांगून त्याला पुन्हा फोटो काढायला भाग पाडतो…

मला नेहमी प्रश्न पडतो, फोटोग्राफर thnq का म्हणत असेल?
आज लक्षात आलं बरं का !
पुन्हा माझ्याकडून फोटो काढून घेऊन नका, परवडणार नाहीत तुमच्या instructions … ???

असो, विनोद बाजूला ठेवू या… पण फोटो म्हटलं की सगळ्यांना किती उत्साह असतो नाही ! प्रत्येकाला तो क्षण capture करायचा असतो, कायमचा… त्यातील आनंद, उत्साह, जोश, सौन्दर्य…. सगळं हवंहवंसं असतं… आणि महत्वाचं म्हणजे कदाचित भविष्यात हे फोटो पाहून हे क्षण पुन्हा जगायचे असतात… खूप गुंतलेले असतो भावनिक, आर्थिक, शारीरिक दृष्ट्या… ज्याने कोणी फोटो काढण्याची concept निर्माण केली त्याला शतशः नमन !

शेवटी काय, जे चांगलं आहे, आपलं आहे ते आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, असं नाही का वाटत… आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रसंग आपल्याला काही ना काही देऊन जातो, आणि तो आपल्या मुठीत पकडण्याचा अट्टहास असतो… पण… एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी… ह्या केसमध्ये फोटोग्राफर आपल्या समोर उभा नसतो, तर तो अंतस्थ असतो… त्यामुळे त्याला instructions देत असताना नक्की काय द्यायच्या आहेत हे ठरवायला वेळ नसतो, त्याची तयारी खूप वर्षांपासून करावी लागते, तेव्हा कुठे थोडं थोडं कळतं की फ्रेममध्ये काय पाहिजे, काय नको, angle कोणता असला पाहिजे, वगैरे… कारण इथे re take घेता येत नाही, एवढाच काय तो फरक… हो ना !

 

© आरुशी दाते

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

10 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Meena Karia

छान लिहिलेय….रोज घडणारी घटना…वरवर पाहता साधी…पण भिन्न कोनातून पाहिलीत….आशय सुद्धा चांगला….

Aarushi Date

Thnq डिअर

वि.ग.सातपुते .(विगसा)

Nice truth ..
VIGSA .

Aarushi Date

Thnq आप्पा

वैभव

Farme मध्ये काय ठेवायचं काय नाही
हे आपण विचारच करत नाही
जसे फोटो साठी तो क्षण का होईना चेहऱ्यावर हसू आणतो
डोळ्यांत भाव बहरतो
मग असे आयुष्यभर का नाही जगता येणार ?
प्रत्येकक्षण हा फोटो म्हणून स्मृतीतच जात आहे की ,मग तो फोटो आनंदी का नसावा ?
नक्कीच सगळ्यांनी याचा विचार केला तर आपला आणि दुसऱ्याचा फोटो सुद्धा चांगला काढण्यास आपण मदत करू शकतो .

Aarushi Date

Perfectly said sir

शारदा ब.खेडकर

अप्रतिम ताई छायाचित्रण काढतो आपण पण त्रास मात्र त्याला… खूपच छान लिहिले

स्नेहा

सुंदर संबंध जोडलाय. एकीकडे हवहवेसे वाटणारे क्षण कॅमेरात पकडून ठेवताना ते मनासारखे हवेत म्हणून आपण किती जागरुक असतो.सूचना देत फोटो काढतो.पण जीवन जगताना कॅमेरा नसतानाही क्षणांना सुंदर करता आले तर तर आयुष्य सुंदर होईल.आणि त्यासाठी थोडं जपून वागलं तर!स्वत:च स्वत:ला सूचना जागरुकतेने देण्याची गरज आहे.खूप सुंदर आरुषी!

वैशाली संजय कदम.

खरंच आपण त्या क्षणांना जीवनाच्या नंतरच्या काळातील अनेक वर्षे जगत असतो. म्हणूनच चांगला फोटो काढला जाईल याकडे प्रत्येक व्यक्ती लक्ष देते. आरुषी खूप छान लिहिलं आहेस.

Nisha Dange

खूप छान