☆ जीवनरंग : स्वाभिमान –  सुश्री माया महाजन ☆

लिंक >> मूळ हिंदी कथा – स्वाभिमान – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी दुसर्‍या शहरात जाण्याचा योग आला. नवरीच्या हातावर मेंदी काढण्यासाठी आलेल्या मुलीकडे लोकं बघत आणि आश्चर्यचकित होत. दुधाळ गोरा रंग, उंच अंगकाठी, तरतरीत नाक डोळे पण मुकी होती. मोठं मन लावून ती आपल्या कामात गर्क होती.

सगळ्या बायका मोठ्या उत्सुकतेने तिला आणि तिच्या कलेला निरखित होत्या. अचानकच एक बाई तिच्याशी काही बोलली तर तिने लिहून दाखविण्याची खूण केली. त्या बाईने कागदावर लिहिले ‘‘तुमच्या या विकारावर आमच्या शहरातील एक ख्यातनाम वैद्यजी इलाज करू शकतील.’’

त्या मुलीने त्याच कागदावर आपले उत्तर लिहिले ‘‘अशक्यच! मी जन्मत:च मुकी आहे आणि खूप इलाज करून झालेत.’’

त्या बाईने परत लिहिले, ‘‘एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? शक्य आहे की तुम्ही बर्‍या व्हाल! तेव्हा किती सुखी न् आनंदी व्हाल!’’

मुलीने त्याखाली लिहिले मी आजसुद्धा याच अवस्थेत जगातील सर्वात आनंदी आणि सुखी मुलगी आहे.

आणि ती मंदसे हसली. आपल्या चेहर्‍यावर स्वाभिमानाची आभा पसरवत राहिली.

मूळ हिंदी कथा – स्वाभिमान – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया महाजन 

मो.-९८५०५६६४४२

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments