🕯  संपादकीय निवेदन 🕯

☆ ई-अभिव्यक्ती (मराठी) – 🪔 दिवाळी अंक २०२३ – दिव्यांची दिवाळी – शब्दांची रांगोळी 🪔 ☆

दिव्यांची दिवाळी 🪔

        शब्दांची रांगोळी… 🪔

श्रावणात घन निळा बरसेल. गौरींच माहेरपण संपेल. पुढच्या वर्षीचं निमंत्रण स्विकारुन बाप्पा निघूनही जातील. शारदोत्सवाची सांगताही होईल… आणि चाहूल लागेल  दीपोत्सवाची !

दिवाळी! अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रकाशपर्व! सुगंधी उटणे, अभ्यंगस्नान आणि फराळाने भरलेली ताटे. आपणही करायचा आहे फराळ… कधीही न संपणारा… अ क्षर फराळ !

चला, मग लागा तयारीला. तुमच्या उत्तमोत्तम अक्षर कलाकृती पाठवा आमच्याकडे आणि सजवा ई-अभिव्यक्तीचा दिवाळी विशेषांक. ठेवणीतले कपडे, दागिने तर काढाच पण त्याबरोबर खास खास लेख, कथा, कविता, रसग्रहण, पुस्तक परिचय अस सगळ काढा बाहेर आणि सजवा आपला दिवाळी अंक. रांगोळी शिवाय पंगत शोभत नाही आणि दिवाळी अंकाशिवाय मराठी दिवाळी सजत नाही हे लक्षात असू द्या.

साहित्य पाठवायचं नेहमीप्रमाणेच त्या त्या विभागाकडं. कोणताही एकच साहित्य प्रकार पाठवायचा आणि तो ही  एकाकडचं. शिवाय ‘दिवाळीअंकासाठी साहित्य’ असा उल्लेख करायला विसरु नका. सर्वप्रकारच्या गद्य लेखनासाठी शब्द मर्यादा आहे 2000 शब्दांची.

वाट पाहात आहोत आपल्या दर्जेदार साहित्याची 15 सप्टेंबर 2023 पर्यंत. त्या नंतर मात्र  एकदम क्षमस्व! 🙏

चला, सणांच्या गडबडीत आपणही साजरा करु अक्षर सोहळा दिवाळी अंकाच्या रुपानं !

लक्षात  असूद्या — एकच कलाकृती, एकाकडेच  आणि ते ही पंधरा सप्टेंबर  पर्यंतच ! 🙏

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments