श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ मूर्ती ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

तो एक कलाकार होता. त्याने खूप सुंदर सुंदर मूर्ती घडवल्या होत्या. मातीच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती,  खडकांवर भीत्तीचित्राप्रमाणे कोरलेल्या मूर्ती. काही मूर्ती लहान होत्या. काही खूपच भव्य होत्या. पण सगळ्याच मूर्ती सुंदर होत्या. मूर्ती जीवंत आहेत , एकमेकींशी बोलताहेत, असं वाटत होतं. किती प्रकारच्या मूर्ती बनवल्या होत्या त्याने. दंतविहीन निरागसबालके. त्यांची फुलांसारखी कोमलता मनाला मोहून टाकायची. काहींमध्ये उफाळणारं तारुण्य,  प्रणयाचं आमंत्रण असायचं. प्रकाशाची चमक त्यात असायची. काही विरह व्यथा प्रकट करणार्‍या असायच्या. काही मूर्ती जरा-जर्जर वृद्धांच्याअसायच्या. भूतकाळाचीआठवणकरणारे त्यांचे डोळे पाणवलेले असायचे.

फुलांचा मोसम होता. सगळ्या मूर्ती आपल्या लावण्याच्या तोर्‍यात होत्या. पण लवकरच मौसम बदलला. फुले आणि ऊबदार वातावरण दूर सारत ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. धो धो पाऊस सुरू झाला. मातीच्या मूर्तीरडू लागल्या. रडता-रडता  हळूहळू विरघळून गेल्या. त्यांचं नामोनिशाणही राहीलं नाही.

दुसर्‍या दिवशी ऊन पडलं. टणक दगडावरच्याआणि खडकांवर कोरलेल्या मूर्तींनाआपल्या दृढतेचाआणि लावण्याचा अभिमान वाटूलागला. दूर दूर विखुरलेल्या छिन्न-भिन्न झालेल्या मूर्तींना त्यांच्या अभिमानाची तीक्ष्ण धार अधीकच वेदना देऊन गेली.

एक दिवस धरतीच्या पोटातून एक विलक्षण थरथर, भयानक, विचित्र आवाज ऐकू  येऊ लागला. जमीन सरकली. तिचा वक्ष भग्न होऊन विदीर्ण झाला. मोठमोठ्या शीलाखंडांसमवेतलोखंडासारख्या टणक मूर्ती त्यात सामावल्या.

दुसर्‍याच दिवशी तो कलंदर कलाकार पुन्हा तिथे आला. नव्या उगवत्या सूर्याबरोबर तिथलं वातावरण त्याला इतकं अद्भूत वाटलं, की तोपुन्हाआपल्याकामाला लागला. बघता मूर्तींची एक भव्य सृष्टी पुन्हा तिथे स्थापित झाली. काही कच्च्या मातीच्या मूर्ती, काही दगडांच्या, लोखंडासरख्या टणक… पण सगळ्याच सुंदर… अति सुंदर…

 

मूळ हिंदी कथा – मूर्तियाँ    मूळ लेखिका – सुश्री शकुन्त दीपमाला

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
स्मिता पंडित

मुर्तीया मस्त. ???