सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
–नरहरी सोनार–
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
हरी हर शब्दामधे
थोडेसे अंतर
अर्थामध्ये जाता
फरकच फार—–
☆
हरी वैजयंती माळ
हरी हातामधे टाळ
हरी कटी पितांबर
त्याचे चंदनी कपाळ—
☆
शिव सर्पमाळ गळा
भस्म लेपन सोहळा
शिव कटी व्याध्रचर्म
शिवमनी भाव भोळा—
☆
नरहरी शिवभक्त
वैष्णव विरुद्ध
वैष्णव देवता दर्शन
तो मानत निशिद्ध—
☆
विठ्ठलाने दाखविले
हरी हर असे एक
डोळे बांधुन स्पर्शाने
दावियेले विश्वात्मक—
☆
नरहरी समजला
लागे हरी चरणाला
गळा माळ भाळी टिळा
हरी भक्तीत रमला—
हरी भक्तीत रमला—
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈