श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– काकस्पर्श…–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
पितृपक्ष चालू आहे,
सगळीकडे धावाधाव |
खाऊन खाऊन आता
पोट भरलंय राव |
☆
वर्षभर सगळे हुसकवती ,
कुणीच देत नाही भाव |
दाही दिशा ओरडत,
फिरतो कावकाव |
☆
केवळ श्राद्ध करण्यापुरतंच
आठवतं आमचं नाव |
आम्ही मृतांसाठी पिंडाला शिवतो,
इतकंच माणसांना ठावं |
☆
काकस्पर्श नाही झाला,
अर्थ गतात्मा इच्छा अपूर्ण |
दर्भाचा कावळा लावून म्हणती ,
अपूर्ण इच्छा करू पूर्ण |
☆
काँक्रीटच्या जंगलात,
हरवला नैसर्गिक अधिवास |
रोडावली हो संख्या,
पितृपक्षापुरतीच आमची आस |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈