सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ नकळत… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
नकळत
डोळ्यातुन,
वाट मोकळी करत.
ओघळणारा एक अश्रू,
नेमका सुखाचा की दुःखाचा.
कधी कधी हे सुध्दा,
नाही उमगत मनाला.
बाई- मनाच्या अशा संभ्रमात,
मी शोधत आहे,
एक क्षण घट्ट आधाराचा.
… काजव्यांच्या चमकण्यानी
रात ऊजाडत नाही,
याची पक्की खात्री असतानाही.
पण का?… कुणास ठाऊक.
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈