श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ मृत्युचक्र… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
मृत्युचक्र हे फिरे निरंतर , त्याच्या हाती नियती
अग्निडाग तो कुणास मिळतो,कुणास मिळते माती. धृ
रंक असोवा राव कुणी ना, या चक्रातुन सुटतो ,
तेल संपता दिप अचानक, हलके हलके विझतो,
एका मगुन एक प्रवासी, वस्ती सोडुन
जाती. ………..(१)
अटळ सत्य हे जाणे तरीही, उगा लाविती लळा,
हा माझा, तो माझा म्हणुनी, गळा घालीती गळा.
क्षणात सारी . विरुन जाती, ती तकलादू नाती. ………(२)
चराचरांवर सत्ता ज्याची, तो मृत्यू अविनाशी.
तोच वाटतो, ते नवजीवन , या साऱ्या विश्वासी.
तू केवळ कठपुतळी मनुजा, त्या मृत्युच्या हाती. ………(३)
म्हणती सारे जन्म मरण हे असते देवा हाती,
तरी चिरंजीव होतो कोणी कर्तृत्वाच्या हाती.
युगे युगे मग जिवंत असती, ते सारे मरणांती. ……..(४)
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈