श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🙏 वि नं ती ! श्री प्रमोद वामन वर्तक
आठवांच्या हिंदोळ्यावर
आज घ्या झोके सावकाश,
परवा पासून खुणावेल
ते-वीसचे नवे अवकाश !
पूर्ण करण्या नवे संकल्प
कंबर तुम्ही आपली कसा,
समाधान वाटेल मनाला
पूर्ण केलात जर तो वसा !
अडल्या नडल्या लोकांना
करा मदत यथाशक्ती,
सोबत जागवा आपल्या
देशाप्रती तुम्ही भक्ती !
ठेवा आठव जवानांचा
घेता मुखी रोज घास,
मातृभूमीचे रक्षण करणे
ज्यांच्या मनी एकच ध्यास !
चुकले माकले गतसाली
जा सारे तुम्ही विसरूनी,
नव वर्षाचे नवे संकल्प
ठेवा मनात घट्ट धरूनी !
🌹 नवीन वर्षाच्या शुभेच्छा !🌹
© प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈