सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
🌸 महालक्ष्मी माते… 🌸 सौ. विद्या वसंत पराडकर ☆
हे त्रिभुवन सुंदरी माते
लक्ष,लक्ष प्रणाम तुज करते
जगाच्या पालन कर्त्या ची कांता तू ग
महालक्ष्मी म्हणून ओळख तुझी ग
भाद्रपद मासी सोडून आपले सासर
तीन दिवस जवळ केले माहेर
तव आगमने घरे दारे सजली
प्रसन्नता बघ मुखावरआली
नक्षत्रांचे दीप लावूनी अंबर बघ सजले
मंगल तोरण नभोमडपी विविध रंगी रंगले
कोणती पैठणी तुज नेसवू ग
कोणत्या चोळीने तू खुलशी ग
पायी पैंजण रूणझुण रूणझुण
नथ खुलली सौंदर्य यौवन
जेष्ठा नक्षत्री पूजन करते
ललाट भाळी मळवट भरते
वाहू तुजला पुष्पमाला ग
चमेली, चंपक, जाई जुई ग
सोळा पदार्थांचा नैवैद्य अर्पिते
भाव भक्ती ची निरांजन ओवाळीते
अलौकिक लावण्याने मंत्रमुग्ध होऊ या
दो हस्ताने प्रणाम करून या
तव चरण कमलाचा भ्रमर असे मी
तव पुनः दर्शनाची तृषार्त असे मी
© सौ विद्या वसंत पराडकर
वारजे पुणे.
ई मेल- [email protected]
मो.नंबर – 91-9225337330
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈