श्रीमती उज्ज्वला केळकर

?  मार्च –  संपादकीय  ? 

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी नाट्यसृष्टी’ असे शब्द उच्चारले, तरी एक नाव अपरिहार्यपणे डोळ्यापुढे येतं , ते म्हणजे वि. भा. देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे.  त्यांनी काही आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली नाही. त्यांनी नाट्यसृष्टीबद्दल विपुल लेखन केलं. ते बराच काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. २०१५पर्यन्त त्यांनी एकूण ५१ पुस्तके लिहिली. त्यापैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत. मराठी नाट्यकोश हा १२०० पानी ग्रंथ लिहिला आणि कोश वाङमयात मोलाची भर टाकली.

नाटकातील माणसं, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, नाट्यभ्रमणगाथा, निवडक नाट्यप्रवेश ( पौराणिक ), वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा ही त्यांची गाजलेली काही पुस्तके.  नाटक, साहित्य, संगीत यावर त्यांनी नितांत प्रेम केले. आजवरच्या प्रवासात त्यांना भेटलेली माणसे, आणि त्यांचे आलेले अनुभव, म्हणजेच नाट्यभ्रमणगाथा हे त्यांचे पुस्तक. अनेक मोठमोठ्या नाट्यकलाकारांशी त्यांची ओळख झाली. स्नेह जुळले. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये, वि. भां. नी ओघवत्या शैलीत लिहिली. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना- प्रसंगही त्यातून उलगडले आहेत.

वि. भां.ना मिळालेले पुरस्कार 

  1. उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  2. कॉसमॉस
  3. नाट्यगौरव
  4. नाट्यदर्पण
  5. माधव मनोहर
  6. रंगत संगत
  7. राजा मंत्री
  8. वी.स. खांडेकर नाट्य समीक्षक म्हणून पुरस्कार
  9. पिंपरी-च्ंचवड महापालिकेने त्यांचा सन्मान करून गौरव केला.

वि. भां.चा जन्म ३१ मे १९३८ तर स्मृतिदिन ९ मार्च १९१७. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कार्याला मानाचा मुजरा. ?

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments