(जन्म १४ एप्रिल, १९२७ – मृत्यू ०२ ऑक्टोबर २०२१)

? स्व द. मा. मिरासदार – विनम्र  श्रद्धांजली? 

मराठीती ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विनोदी लेखक आणि कथाकार द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने काल दि.02/10/2021 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे २४ कथासंग्रह आहेत. प्रामुख्याने ते विनोदी लेखक व कथाकथानकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे काही गंभीर कथासंग्रह आहेत आणि काही ललित लेख संग्रहही प्रसिद्ध आहेत. १९६२पासून त्यांनी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्याबरोबर कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले. या त्रयींनी३००० पेक्षा जास्त कार्यक्रम केले. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर, इतकंच काय कॅनडा – अमेरिका इथेही त्यांचे कार्यक्रम झाले. व्यंकूची शिकवणी,माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी इ. त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. त्यांची पात्रे  इब्लिस, बेरकी, वाहयात, टारगट क्वचित भोळसट आहेत. त्यांच्या कथातून ग्रामीण जीवनाचं दर्शन होते.

एक डाव भुताचा,ठकास महाठक या २ चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिक मिळालं. याशिवाय आणखी १६ चित्रपट कथा त्यांनी लिहिल्या. परळी वैजनाथ येथे १९९८ साली झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पुणे महानगर पालिकेचा वाल्मिकी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृतिक मंडळाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

विनोदी कथा,पटकथा लेखन याबरोबरच त्यानी श्री.शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह कथाकथनाची प्रथा महाराष्ट्रात रुजवली व लोकप्रिय केली.
जगणं सुसह्य करणा-या या थोर साहित्यिकास ई-अभिव्यक्तीच्या वतीने त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली, शब्दांजली..???

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments