श्री आशिष बिवलकर
वाचतांना वेचलेले
☆ “देवाची प्रार्थना…” – कवी : श्री श्रीपाद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆
☆
आता तरी देवा मला पावशील का?
उपचारासाठी पैसे आधी मागशील का?
सहानुभूती मरीजाला दावशील का?
माणूस गेला मदतीला धावतील का?
*
पैसा आणू कुठून एकदम करी खळबळ
देईल कोण मरीजाला लक्ष्मीचे बळ
त्याच्यासाठी मदतीला धावशील का?
आराम कसा पडतो त्याला दावशील का?
*
पैसे घेऊन धन्वंतरी दूर दूर पळतो
पैश्यापाई गरिबाला छळ छळतो
लूट करतील त्यांना आळा घालशील का?
शहरी गरीब योजना त्यांना दावशील का?
*
आले निवडून तुम्ही आमुचे मुख्यमंत्री
वैद्य खातो सफरचंद आणि संत्री
भलं आमचं करायला सांगशील का?
कमी पैशात एखादी खाट मांडतील का?
*
आता तरी देवा भाऊ सांगशील का?
गरिबाला आरोग्यसेवा मिळतील का?
आमच्यासाठी त्यांच्यासोबत भांडशील का?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का?
*
मंदिर झाले बांधुन देवा झाला कुंभ
पिळ नाही सुटला जरी जळाला सुंभ
तीन तेरा वाजायचे आमचे थांबतील का?
गरजवंतासाठी तुझे हात राबतील का?
☆
कवी : श्री श्रीपाद देशपांडे
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈