श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गतवैभवाचे साक्षीदार…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

ओस पडले जुने वाडे,

ओस पडली जुनी घरं |

गत वैभवातल्या वास्तूंना

अखेरची लागली घरघर |

 

पिढयांपिढयांचे,

गोकुळ सुखात नांदले |

भूतकाळाच्या आठवणीत,

घर एकटेच रुदले |

 

पाहिले लग्न सोहळे,

अंगणी उठल्या पंगती |

अखेरच्या घटका मोजताना,

कोणी नाही संगती |

 

ऊन पावसाळे झेलले,

सुख दुःखाचे भोगले प्रसंग |

जीर्ण झाल्या भिंती,

चिरे पावत चाललेत भंग |

 

भजन कीर्तने ऐकली,

श्रवण केल्या हरी कथा |

एक एक सोडून गेला,

एक एक खांबाची व्यथा |

 

पडके वाडे, पडकी घरे ,

वारसांना ना घेणं-ना देणं |

पूर्वजांच्या ठेवी दुर्लक्षित,

जमेना वास्तूकडे वळणं |

 

गत वैभवाचे साक्षीदार,

गावोगावी पहायला मिळतात |

थकलेल्या वास्तूच्या वेदना,

कुणाला कितीशा हो कळतात |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments