श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ येणे जाणे… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
अवचित येणे असे कसे?
कळत नकळत
नकळत कळत
पर्णा बिलगून स्वप्न हसे
अंगांग व्यापणे आणि कसे?
हरखत निरखत
निरखत हरखत
घन सावन पसरी दाट पिसे
अलगद जाणे काय असे?
उधळत निखळत
निखळत उधळत
टपटपणारी बकुल कुसे
☆
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈