प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन प्रवास… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

व्यथा व्यथेतून जन्म आपला

कथे कथेतून गाणी

सर सर सरते येथे

जीवन संपते जीवन कहाणी

*

युगे युगे युगुलांचे जीवन

प्रेमरसाने येथे नांदती

दिल्याघेतल्या शपथेचे

शब्द पूर्ण गाणी गाती

*

कैक क्षणाचे भारलेले

अनेक जणांची नाती

ऋणानुबंध नष्ट जिवा

नंन्तर होते माती

*

अनेक रंगी अनेक पक्षी

जमता नाती गोती

सृष्टी मध्ये विहार करुनी

परततात आपल्या घरटी

*

आपण सारे होत प्रवासी

अमर नाही कोणी

जीवनाचा कागद कोरा

स्तब्ध होते वाणी.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

छान कविता