सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वैशाख स्वागत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

स्वागत करुया वैशाखाचे

झळा मारती तप्त रवीच्या

घरात बसुनी पंख्याखाली

चला मांडुया डाव रमीचा

*

सुरू जाहली सुटी मुलांना

वह्या पुस्तके ओझे नाही

डाळ पन्ह्याची रुची चाखुया

आंब्यासम फळ दुसरे नाही

*

अंगांगाची होत काहिली

निसर्ग आहे पण नटलेला

पीत बहावा फुलला आहे

गुलमोहर तो बहारलेला

*

वैशाखी दिन विशेष तृतिया

मुहूर्त मोठा अक्षय्य नामे

शुभकार्यासी योग्य म्हणुनिया

सरसर करुया मंगल कामे

*

जमू लागती मेघ नभी का

वैशाखाच्या या वणव्याने

जलद सावळे अवलोकुनिया

गाऊ नाचू उल्हासाने

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments