सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ ‘सावळाच रंग तुझा…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
☆
सावळाच रंंग तुझा भुलवी मनमोहना
सांग कधी भेटशील अधीर तव दर्शना॥धृ॥
*
मेघ शाम अंबरात
कृष्ण सखा अंतरात
नभातली श्रावणसर चिंब भिजवी तनमना
सांग कधी भेटशील……….॥१॥
*
अधरी शोभत बासरी
मम चित्ता धुंद करी
देहभान हरवले हीच एक भावना
सांग कधी भेटशील ……….॥२॥
*
प्रियकर तू माझा हरि
वर्ण गंध बकुळीपरि
सर्वस्व तुजसी वाहीन मी नच दुजी कामना
सांग कधी भेटशील……….॥३॥
☆
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈