श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ भोग☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

फेकतो फेकू कुणीही जे नको ते बोलताना

आणखी गोत्यात येतो सत्य सारे झाकताना

*

जोडला होता जिव्हाळा स्वार्थ साधाया जरासा

द्वेष तो बाहेर आला संशयाने वागताना

*

प्रेम धागे बांधलेले घट्ट होते काय त्याचे ?

दु:ख झाले  फार नाही प्रेम त्याचे सोडताना   

*

माणसाने माणसाला पूर्णतेने ओळखावे

ध्येय साधे जीवनाचे आग्रहाने मांडताना

*

कोण येथे तत्ववेत्ता वर्तनाने सिद्ध झाला, ?

होवुनी लाचार गेला स्वार्थ त्याचा साधताना

*

जोडलेल्या संगतीचा सोडला हव्यास नाही

वासनांचे खेळ सारे स्वैरतेने खेळताना

*

कोणता आदर्श कोणी पाळला आहे कळेना

 लाख मोलांच्या रुढींचे स्तोम सारे तोडताना

*

अंतरी येथे कुणाच्या आस नाही ध्यास नाही

 लाज आहे सोडलेली भोग सारे भोगताना 

*

चोर बाजारात येथे बोलके पांडित्य मिळते

वाचपोथ्या नाचथोडा कीर्तनातच रंगताना

*

काय लाचारी करावी का कुणाचा दास व्हावे

कोण येतो वाचवाया श्वास अंती मोजताना?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments