सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘भारतीय मी, भारत माझा 🇮🇳‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

भारत देश महान, अमुचा भारत देश महान!

‘सत्यमेव जयते’, आमच्या राष्ट्राची हो शान!

 

 भारतभूच्या पोटी जन्मले,

 सुपुत्र लाखो महान!

 स्वातंत्र्यास्तव लढले घेऊन ,

  तळहातावर प्राण!

 सदा राखली जगात त्यांनी,

  राष्ट्राची या शान!

 म्हणून गाठले स्वातंत्र्याने

 पाऊणशे वयमान! ||१||

 

 स्वेच्छेने होती, भरती येथे,

  लाखो वीर जवान,

 मातृभूमीस्तव, सुहास्यवदने,

  प्राणांचे देती बलिदान!

 नागरिकांचे संरक्षण अन्

  नारीचा सन्मान,

 सीमेवरती अहोरात्र हे

  सशस्त्र उभे जवान! ||२||

 

 वाळवंटीचे प्रखर ऊन वा,

  वादळ सागरीचे ,

  तांडव जलधारांचे अथवा,

   हिम-दंशही सियाचीनचे,

 तहान-भूक, विसरूनी सारे,

  निभवित कर्तव्याला,

 विसरू नका हो भारतवासी,

  त्यांच्या समर्पणाला! ||३||

 

 झोप सुखाची आम्ही घेतां,

   दिनरात ते, देती पहारा,

 आठवत नसेल का हो त्यांना,

 माय-बाप अन् कुटुंब-कबिला?

  चला शोधूनी आपण त्यांना,

   हात मदतीचा देऊ,

  ओलाव्याने आपुलकीच्या,

   आश्वस्त जवानां करू! ||४||

 

  कार्यक्षेत्र जरी भिन्न आपुले,

    प्रामाणिकता जपू,

   नागरिकांच्या कर्तव्याचे,

      यथार्थ पालन करू!

    राष्ट्रध्वज,तिरंगा अमुचा,

     सन्मान तयाचा ठेवू,  

     विश्वशांतीचा  घेऊनी वसा,

     दहशतवादा उखडू!

    देशहिताच्या संस्काराचे,

     स्वयं उदाहरण बनू,

    भारतभूच्या विकासाचे,

     शिल्प मनोहर घडवू!    ||५||               

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments