1

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धनाचे  श्लोक ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😅 🤠 धनाचे  श्लोक ! 😎 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

(सध्याच्या जगात बोकाळलेल्या, “माझं काय?” अशी मनोवृत्ती झालेल्या जनांसाठी धन जोडण्याचे, आणखी काही जगनमान्य आणि सोपे उपाय !)

सदा सर्वदा योग धनाचा घडावा रे

त्या कारणे खिसा मानवा भरावा रे

 

उपेक्षु नको तू येणाऱ्या संधी रे

आलेल्या संधीचे सोने कर तू रे

 

जुगार लॉटरी नको खेळू तू रे

लॉटरी सेंटर चालवावया घे रे

 

खेळणारे सारे विकती घरे दारे

चालका घरी लक्ष्मी पाणी भरे

 

नवा सोपा धंदा तुज सांगतो रे

भाई गल्लीतला तू आता बन रे

 

मग उघडतील राजकारणाची दारे

देवून खोटी वचने निवडून ये रे

 

राजकारण म्हणजे कुबेर कुरणे

तेथे तुवा आहे मनसोक्त चरणे

 

हो यथावकाश शिक्षणसम्राट रे

सात पिढ्यांची मग सोय होय रे

 

दुजा सोपा धंदा तुज सांगतो रे

होऊन बुवा छान मठ बांध तू रे

 

आता स्वर्ग सुखं पायी लोळती रे

नाही पडणार कसली ददात रे

 

‘दामदासे’ रचिली ही रचना रे

एखादा नुस्का यातला वापर रे

 

धन मिळतां नको विसरू या दामदासा रे

मज पोचव मला माझा हिस्सा रे

 

 धनकवी दामदास !

 

© प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈