श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ अंतर्बोध… ☆ श्रीशैल चौगुले ☆
अन् त्या तिथे आहे
भक्तिचे मंदिर ऊभे
जिथे मन देहाविना
भक्तितच दंग, राबे.
कुठे नको पंढरी
तिर्थक्षेत्र रोज नवे
ध्येय एक ऊराशी
श्रध्देत संसार हवे.
संतांची हिच वाणी
संस्काराचे ठाई वसे
कर्म करता जीव
सत्य तिथे देव दिसे.
त्याग दुष्ट वर्तने
चैतन्य मुर्ती अंतरी
आत्मा संतुष्ट खरा
कर्तव्य भाव मंदिरी.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈