श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ निर्धार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
धर्म आमचे ध्येय मानुनी
सजवत जावू भाव जुना
राज्य हिंदवी स्मरत जायाचे
मिटवायाला सर्व वेदना
समानतेचा हक्क मागते
रयत आमची मराठमोळी
लोक येथले करू म्हणाले
या राज्याला मानवंदना
भगवा आहे रंग सांगतो
वैराग्याच्या अध्यात्माला
,महाराष्ट्राच्या जनतेच्या ही
मुखात असते भक्तिभावना
सह्याद्रीच्या गडकोटांनी
जपली आहे खरी अस्मिता
या मातीला करती मुजरा
अभिमानाने करत गर्जना
तळहातावर मस्तक होते
आक्रमकांना परतवताना
सामर्थ्याची चुणूक दावता
नाही हुकला कधी सामना
शिवरायांच्या नियोजनाचा
करत जायचा पाठपुरावा
निधडी छाती संभाजीची
करा सांगते निर्धार पुन्हा
वैभव आहे मातृ भुमीचे
तेजा मधल्या सूर्य प्रभेचे
देश धर्म हा जपण्यासाठी
देत राहु या संदेश जना
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈