श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ दवबिंदूपरी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
अंगणातल्या प्राजक्तावर
फुले उमलती लाखो गणती
फुलांवरी त्या दवबिंदुनी
केली वसती दाटीवाटी
ऊन कोवळे पडता त्यावर
जणू भासती माणीक मोती
मंद वायुच्या झुळकी सरशी
क्षणांत माती माजी मिळती
तसेच जीवन जगतो मानव
दंभ दावीतो उगाच जगती
दवबिंदुपरी असते जीवन
क्षणात मिळते माती माजी
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈