श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात जन्म घ्यायचाय ? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मुळात पुण्यात जन्म घ्यायलाच पुण्य लागतं…

पहिल्या उष्टावणात पु ना गाडगीळांकडून घेतलेली अंगठी चितळ्यांच्या श्रीखंडात बुडवून बाळाला चाटवली की त्या 

बाळाच्या पुणेकर होण्यास सुरुवात होते..

कोवळे नाजूक दात आले की काका हलवाईंकडची आंबा बर्फी किंवा काजू कतली खाल्ली की मग हा पुणेकर 

कोणाचेही दात घशात घालू शकतो…

शालेय जीवनात कयानीचा केक खाल्ला नाही तर पुणे महानगरपालिका पालकांना दंड करते म्हणे… 

वैशाली, रुपाली, वाडेश्वर मध्ये एकदा तरी खाल्लं नसेल असा माणूस यौवनाची पायरी घसरून एकदम म्हातारा झाला असंच समजावं… 

उगा कोल्हापुरातील २-३ आणि नाशकातील २-३ मिसळींचं कौतुक ऐकवणाऱ्याला प्रत्येक चौकात नव्या चवीची मिसळ खिलवणारा खरा पुणेकर … 

आमची गणेशोत्सवाची लांबणारी मिरवणूक दिसते..  पण  मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी खरं कळतं ते पुणे, पुणेरी आणि पुणेरीपण….  अख्खी पुण्यनगरी दृष्ट लागेल अशी सजलेली असते…

मराठी संस्कृती आणि नाविन्याची कास धरायची वृत्ती जपली असेल तर ती फक्त आणि फक्त पुण्यानेच…

बाकी पुणेकरांपेक्षा १ ते ४ बंदचा त्रास पुणेतरांनाच जास्त होतो.. पण बहुदा  तो त्या वेळेमुळे नाही, तर आपलं 

शहर पुण्यासारखं नाही यामुळेच ….. 

बहुत काय लिहिणे ?

 ता. क.

*जन्म नुसता पुण्यात असून चालत नाही. तर तो कसबा , शनिवार, रविवार, सोमवार,  बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 

रास्ता पेठ, नाना, गणेश, नारायण ,सदाशिव ह्या पेठांमधील असला तरच सोन्याहून पिवळं ….

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments