image_print

मराठी साहित्य – संकीर्ण ☆ लोककथा : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

सुश्री मंजुषा देशपांडे  ☆ संकीर्ण : लोककथा  : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे ही लोककथा आहे.  एकदा म्हणे समुद्र आणि पृथ्वीमध्ये सर्व बहिण भावंडांच्यात असते तसे भांडण लागले.  या कथेत सूर्याची मुलगी पृथ्वी आणि  समुद्र व चंद्र मुलगे.   पृथ्वी आणि समुद्राचे एक मिनिट पटत नसे. चंद्र धाकटा,  तो कधी पृथ्वीच्या तर कधी समुद्राच्या पार्टीत.  तर पृथ्वी आणि समुद्राच्या  कडाक्याच्या  भांडणाचे कारण म्हणजे समुद्र पृथ्वीच्या हद्दीत शिरत होता आणि त्यासाठी वा-याच्या मदतीने त्याने मोठमोठ्या लाटा निर्माण करून त्याच्या किना-यालगतची पृथ्वीवरील झाडे आणि घरे दणादणा हलवली,  पृथ्वीला भयंकर राग आला ती तडक सूर्याकडे गेली. चंद्र  होताच साक्षीला.  सूर्याने समुद्राला बोलावले,  समुद्र कसला खट,  काय म्हणाला असेल... तर..म्हणे चंद्राने त्याला उकसवलं,  तो जवळ आला,  लांब गेला.  समुद्र आणि चंद्राच्या खेळात वारा सामिल झाला,  आणि त्यामुळे ते.. काय पृथ्वीला त्रास झाला.  समुद्राला काही पृथ्वीची खोडी काढायची नव्हती. असे साळसूदपणे सांगून त्याने चंद्राकडे पाहून डोळे मिचकावले. सूर्याला काही ते दिसले नाही पण पृथ्वीला दिसल्यामुळे तिचा चरफडाट झाला. पण ती काही न बोलता निघून गेली.  तिने...
Read More
image_print