सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री वीणा रारावीकर
🌺 अ भि नं द न 🌺
आपल्या समूहातील लेखिका सुश्री वीणा रारावीकर यांनी अनुवादित केलेले ‘यू हॅपिअर’ हे पुस्तक मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे द्वारा नुकतेच प्रकाशित केले गेले आहे. मूळ इंग्रजीत असलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
– – ‘ आनंद हे मेंदूचे कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर जीवन आनंदाने जगता येऊ शकते. त्यासाठी आपल्या मेंदूचा प्रकार ओळखा आणि मेंदूचे सर्वांगीण आरोग्य सुधारा ‘ असा महत्वाचा आणि मोलाचा संदेश देणारे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी न्यूरो सायन्समधील रहस्यांवर आधारित शास्त्रशुद्ध उपाय सांगणारे हे पुस्तक, आनंदाने जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल असे खात्रीने म्हणावेसे वाटते.
या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल आपल्या समूहातर्फे सुश्री वीणा रारावीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि असेच लोकोपयोगी काम यापुढेही त्यांच्या हातून व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈