☆ सूचनाएँ/Information ☆
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५ ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे
महाराष्ट्र राज्यस्तरीय हा शालेय व महाविद्यालयीन शिक्षकवर्गासाठी -महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५
महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान)
श्री सुनील देशपांडे
निबंध विषय (खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर):
- महादान ही काळाची गरज
- विद्यार्थ्यांमध्ये महादान संस्कार रुजवण्यासाठी माझ्या संकल्पना
- महादानासाठी शिक्षकांची भूमिका
- समाजासाठी महादान – सामूहिक जबाबदारी
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
ही स्पर्धा दोन गटात विभागली आहे
गट विभाग पहिला
शालेय शिक्षक गट – इयत्ता १० वी पर्यंत शिकवणारे शिक्षक
गट विभाग दुसरा
महाविद्यालयीन प्राध्यापक गट – इयत्ता ११ वी ते पदवी स्तरावर शिकवणारे प्राध्यापक
निबंध लेखनासाठी सूचना:
१) एका शिक्षकाला कोणत्याही एका भाषेतून व कोणत्याही एकाच विषयावर एकच निबंध सादर करता येईल.
२) शब्दमर्यादा: ८०० ते १००० शब्द
३) निबंध ए ४, साईज कागदावर, एकाच बाजूने सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टाईप केलेला असावा.
४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्यावर कोणत्याही प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया केली जाऊ शकणार नाही
५) निबंधावर लेखकाचे नाव किंवा ओळख दर्शवणारी कोणतीही माहिती लिहू नये
६) निबंधासोबत खालील माहिती वेगळ्या कागदावर देऊन स्टेपल करून पाठवावी:
-
-
-
- लेखकाचे पूर्ण नाव
- वय
- मोबाईल नंबर
- ई-मेल
- शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता
- मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे नाव व संपर्क क्रमांक
- लेखकाचै एक छायाचित्र. (पासपोर्ट साईज फोटो)
-
-
प्रतिज्ञापत्र:
(स्वतःच्या माहितीच्या कागदाखाली लिहावे आणि स्वाक्षरी करावी)
“मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की वरील निबंध मी स्वतः लिहिला आहे.
तो कोणत्याही व्यक्तीच्या, संस्थेच्या वा इंटरनेटवरील मजकुराची प्रत नाही.
हा निबंध यापूर्वी कुठेही प्रसिद्ध केलेला नाही व हा या स्पर्धेसाठीच सादर केला आहे.
स्पर्धेचे सर्व नियम व अटी मला मान्य आहेत.”
स्वाक्षरी, स्थळ व दिनांक
६) निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक: ३० जून २०२५ पर्यंत
७) पोस्टाने किंवा कुरिअरने निबंध पोहोचलेला असला पाहिजे.
८) निबंध पाठविण्याचा पत्ता:
श्री. सुधीर बागाईतकर, उपाध्यक्ष,
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,
रो हाऊस क्र. १५, साई सदन सोसायटी,
महानगर बँकेजवळ, सेक्टर क्र. २,
ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८
टीप: ई-मेल, व्हॉट्सॲप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पाठवलेले निबंध स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.
९) बक्षीसै व सन्मान:
प्रत्येक गटातून:
प्रथम क्रमांक: ₹१०,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)
द्वितीय क्रमांक: ₹५,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)
प्रत्येक भाषेतील एका निबंधास एक विशेष पुरस्कार: ₹३,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)
१०) निकाल आणि सन्मान समारंभ:
निकाल: ऑगस्ट २०२५ या महिन्यात जाहीर करण्यात येईल
सन्मान समारंभ: फेडरेशनच्या २०२५ मधील राज्यस्तरीय अधिवेशनात बक्षिसाची रक्कम व विजेत्यांचा सन्मान केला जाईल (२०२५)
अधिवेशनासाठी विजेत्यांना स्वखर्चाने यावे लागेल, परंतु अधिवेशनाचे सहभाग शुल्क भरावे लागणार नाही.
११) बक्षीस विजेते निबंध फेडरेशनच्या विशेषांकात प्रसिद्ध केले जातील त्याला कोणतेही वेगळे मानधन दिले जाणार नाही
१२) सर्व सहभागी शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र (ई-सर्टिफिकेट स्वरूपात) मिळेल.
१३) अधिक माहिती व संपर्कासाठी
श्री सुधीर बागाईतकर – 9819970706
श्री सुनील देशपांडे – 9657709640
श्री प्रशांत पागनीस – 8530085054
सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक बांधव व शिक्षक संघटनांना विनंती:
आपल्या संस्थेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महादान विषयक संस्कार रुजवावेत, ही नम्र विनंती!
साभार – श्री सुनील देशपांडे
पुणे , मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈