श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ प्रार्थना म्हणजे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
☆
प्रार्थना म्हणजे ती नाही.. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…!
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं, ही खरी प्रार्थना…! !
जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…! !
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…! !
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…! !
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपन असतात.
एक भाव असतो.
एक भावना असते.
एक विचार असतो.
प्रार्थना म्हणजे मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…! !
☆
लेखक – अज्ञात
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈