श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आज महाविद्यालय पोहचताच मी रमेश शिपायाला बोलावून घेतले आणि ताराचंद ची माहिती घेणे सुरू केले. चौकीदार माणूस पाच मुलींचा शैक्षणिक खर्च करतो हे माझ्या अनुभवाला पटत नव्हते. त्याचा पगार किती असेल रे… मी शिपायाला विचारले… सर खूप झाले पाच हजार रुपये. अरे मग हा खर्च त्याचा मालक पाठवितो काय? कोण तो कोल डेपो वाला मालक….सर तो धड गणपतीची वर्गणी देत नाही….. तो काय पाठवितो सर.. अरे मग कोण पाठवितो रे पैसे. माझी खात्री आहे ते ताराचंद चे पैसे नक्कीच नाही… का जाणे सर पण पैसे दरवर्षी येते. तुम्ही याच वर्षी प्राचार्य झाले पण मागील चार वर्षांपासून पैसे नियमित ताराचंदच  देतो सर. आता माझे कुतूहल आणखी जागे झाले आणि सत्य शोधण्यासाठी मी बाहेर पडलो.

कोल डेपो समोर कार उभी करून मी एका ट्रक ड्रायव्हर ला विचारले, ताराचंद कहाँ मिलेगा? त्याने बोटानेच एका टीन पत्र्याच्या झोपडीकडे निर्देश केला. कोळशाची धूळ तुडवत मी त्या दिशेने निघालो.

झोपडी जवळ जाऊन ताराचंद जी अशी हाक देताच थोड्या वेळाने आत हालचाल सुरू झाली. बहुतेक रात्र पाळीमुळे तो झोपला असावा. टीनेचे दार उघडून ताराचंद आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिला….. सर आप यहाँ! क्या बात है सर? मुझे बुला लेते… त्याच्या बोलण्याची वाट न पाहता मी आत शिरलो आत एक लाकडी पलंग त्यावर कोळशाच्या धुळीने माखलेली गादी व एक ब्ल्यांकेट कोपऱ्यात एका लाकडाच्या पेटाऱ्यावर एक विजेरी त्यातच यफ एम ब्यांडचा रेडिओ, एक मजबूत लाठी,पाण्याचे मडके त्यावर मातीचे झाकण एक ग्लास. मला कुठे बसवावे हा त्याच्या समोर प्रश्न होता मीच पडलेले एक जुने वर्तमान पत्र पसरवून पलंगावर बसलो. ताराचंद ने बाहेर निघून चहा टपरी वाल्याला जोराने आवाज दिला.. गणपत दो स्पेशल कम शक्कर अद्रक डालकर जलदी भेजना. मी ही त्याला नाही म्हटले नाही. त्यानेच विषयाला हात घातला….. सर बात क्या है? क्या पैसे कम थे? रमेश को भेज देना था.आपने क्यो तकलीफ की सर? त्याला माझे येणे आवडले नव्हते हे मात्र खरे होते. तेव्हड्यात गणपत चहा घेऊन आला. दोन घुट चहा पिऊन मीच सुरवात केली. ताराचंद जी आप जो पाँच गरीब लाडकियों का खर्चा करते हो ये पैसे कौन भेजता है? मुझे जानकारी होना चाहिए.  सर ये मईच करता हुं जी खर्चा…….थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी त्याला विस्वासात घेत. तले आप अच्छा काम कर रहे हो, पर मुझे विस्वास है,आप किसिके पैसे लाकर दे रहे हो. औंर आप नहीं बताओगे तो मैं पैसे वापस कर दूँगा. माझी मात्रा बरोबर लागू पडली. ताराचंद चरकला, सर एैसा मत करना. पैसे मेरे नही है ये सही हैं. पर किसके है मै बता नहीं सकता, मुझे कसम डाली है सर………. और सुनेंगे तो आप पैसे लेंगे नहीं………. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन मी त्याला विस्वास दिला… तू बता मै पैसे लूंगा,पर सत्य बता……….

थोडा वेळ शांततेत गेला आणि ताराचंद ने जे सागितले ते ऐकून मी हादरलो. तो म्हणाला सर ये पैसे रत्ना नामकी वेश्या भेजती है…….

मी तडक बाहेर आलो व निघालो.

क्रमशः……

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments