सौ कुंदा कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ लहरी पाऊस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
☆
पाऊस लहरी लहरी
रोज नवी अदाकारी
दिला खोटा पैसा जरी
*
बरसे सरीवर सरी (१)
आला जरी गेला जरी
सारी सृष्टी स्वच्छ करी
रिमझिम रिमझिम नाद करी
चराचरामध्ये तरतरी (२)
*
झोके घेत घेत येई
आला म्हणता पसार होई
विरहात जळणाऱ्या त्या
प्रेमीजना व्याकुळ करी (3)
*
कधी खेळे तो उन्हाशी
सप्तरंग ते ठेवी हाताशी
मैत्रीच इंद्रधनुष्याशी
नवलाईची वाटे असोशी (4)
*
त्याचा धिंगाणा कहारी
संततधारा वर्षाव करी
उलथापालथ सृष्टीची
कदरच ना कशाची(5)
☆
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈