सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ कर्माचा नियम… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण लहानपणी पासून ऐकतो, पेरावे तसे उगवते किंवा आपण जे किंवा जसे वागतो ते आपल्या कडे कोणत्याही रूपात परत येते. हे होऊ द्यायचे नसेल तर काय करावे बघू या. खरे तर हे सर्वांना माहिती आहे. पण काही गोष्टी परत उजळाव्या लागतात. तसेच हे आहे.

आपल्याला पावलोपावली काही निर्णय घ्यावे लागतात.

बऱ्याच गोष्टींवर आपण प्रतिक्रिया देत असतो. आणि त्या देताना जसे पूर्वग्रह मनात असतात. तसे आपण व्यक्त होतो. समजा एखाद्या व्यक्तीने पूर्वी आपला अपमान केला असेल तर तो राग मनात असतो.मग त्या व्यक्तीने साधा “कसे आहात?” असा प्रश्न विचारला तरी आपल्या कडून सरळ उत्तर दिले जात नाही. त्या वेळी अपमान,बदला,चिड,राग अशा भावना मनात येतात.

 किंवा एखाद्या व्यक्ती विषयी चांगले मत असेल आणि ती व्यक्ती रागावली तरी आपण फारसे मनावर घेत नाही. 

थोडक्यात आपले पूर्वग्रह जसे असतात तशी प्रतिक्रिया दिली जाते. प्रतिक्रिया किंवा प्रती उत्तर चांगले असेल तर आपण विसरुन जातो. पण कोणी आपला अपमान केला असेल तर विविध प्रतिक्रिया मनात येतात. त्यातील एकच प्रतिक्रिया योग्य असते. पण ती दुर्लक्षित केली जाते. आणि त्या पूर्वग्रह दूषित ठेवून दिलेल्या प्रतिक्रियेचा जास्त त्रास आपल्यालाच होतो. पण हे आपण टाळू शकतो. थोडक्यात चुकीच्या कर्मातून सुटका करुन घेऊ शकतो. या साठी काही छोटे उपाय प्रत्यक्ष करुन बघू.

▪️ १) लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही.

पूर्वी मोठी माणसे सांगायची राग आला की,पाणी प्या. मनात अंक मोजा. तसेच काहीसे करायचे. प्रतिक्रिया देण्याची वेळ आली की, लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण जी प्रतिक्रिया देणार आहोत ती फायद्याची, आनंदाची, हितकर आहे का? याचा विचार करायचा.

जी प्रतिक्रिया देणार आहोत त्याचा विचार मनात आल्यावर आपल्या हृदयात किंवा पोटात आनंद,समाधान जाणवले तर ती प्रतिक्रिया योग्य आहे असे समजायचे.आणि त्यामुळे जर भीती वाटली,धडधड जाणवली किंवा राग,ईर्षा,चिडचिड असे जाणवले तर ती प्रतिक्रिया अयोग्य समजावे.

काय जाणवते या कडे लक्ष द्यायचे. त्या नंतर प्रतिक्रिया द्यायची.

▪️ २) कोणत्या भावना निर्माण होतात या कडे लक्ष देणे.

कोणत्याही घटना,भाष्य या वर प्रतिक्रिया देताना कोणत्या भावना / लहरी मनात निर्माण होतात या कडे लक्ष द्यावे.चांगले /वाईट तरंग (vibration) आपल्याला जाणवतात.

ते जर चांगले असतील तरच मनात आलेली प्रतिक्रिया / प्रत्युत्तर द्यावे.

▪️ ३) कर्माचे कर्ज कसे फेडावे?

🔅१) परिणाम भोगणे –

निसर्ग नियमा नुसार ते भोगून फेडावे लागते.

🔅२) समुपदेशन करणे –  आपण ज्या चुका केलेल्या आहेत,त्या इतरांच्या कडून होऊ नयेत या साठी त्यांचे समुपदेशन करायचे.कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत व त्या कशा टाळाव्यात या विषयी मार्गदर्शन करावे. ज्याला अपयश मिळाले आहे,किंवा शिक्षा मिळाली आहे तिच व्यक्ती कोणत्या गोष्टी करु नयेत या विषयी चांगले सांगू शकते.

🔅३) गॅप मध्ये जाणे – म्हणजे मेडिटेशन करणे.दिवसातून दोन वेळा मेडिटेशन करावे.त्या मुळे विविध विचारांच्या पासून आपण दूर जातो.

त्या मुळे आपण योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करु शकतो.

आपले कार्मिक दोष कमी करायचे असतील तर पुढील गोष्टी कराव्यात.

🔅 १) दान, समुपदेशन, मेडिटेशन करणे.

🔅 २) प्रत्येक प्रतिक्रिया देताना थांबणे – विचार करणे.

🔅 ३) प्रतिक्रिया देताना आपल्या हृदयाला योग्य आहे की अयोग्य आहे विचारणे.म्हणजेच ( Heart Vibration) तपासून मग प्रतिक्रिया देणे.

हे उपाय आपल्याला कर्म दोषातून मुक्ती देऊ शकतात.फक्त हे मनापासून करावे.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments