सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ प्रेरणापुंज ऋतुराज ॥ –  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

बिहारचा युवक ऋतुराज चौधरी ने परवा रात्री १:०५:०९ वाजता गुगल ला हादरवून सोडलं. त्याने ५१ सेकंदांपर्यन्त गुगल इंजिनच हॅक करून टाकलं. हॅक होताच अलम दुनियेत बसलेल्या गुगल अधिकाऱ्यांचे हातपाय थंडगार पडले. अमेरीकेच्या ऑफिसमधे एकच हल्लकल्लोळ माजला.

त्यांना नेमकं कारण कळण्यापुर्वीच म्हणजे ५१ सेकंदाने ऋतुराजने गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पुर्ववत सुरू केली आणि गुगल ला मेल करून कळवून दिले कि गुगलच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे तो ते हॅक करू शकला.

सदरहू ई मेल करून ऋतुराज झोपी गेला कारण आपल्या देशात रात्र होती. परंतू मेल वाचून अमेरीका मात्र बैचैन झाली. मेल मधे ऋतुराजने दिलेल्या सर्व तपशीलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनी सुध्दा १ सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना तांत्रिक उणिवेची खात्री पटली.

अमेरीकेत तडकाफडकी ह्या गंभीर विषयावर १२ तास मिटींग चालली आणि शेवटी निर्णय झाला की संबंधीत युवकाला बोलाविण्यात यावं.

दिवसा ठीक २ वाजता ऋतुराज ला मेल आला की ‘आम्ही तुझ्यातील गुणवत्तेला सॅल्यूट करत आहोत. कृपया तू आमच्यासोबत काम कर.

आमचे अधिकारी तुला न्यायला येत आहेत. ‘

लगेच दुसऱ्या मेल द्वारा गुगलने ऋतुराजला 

‘जॉईनींग लेटर ‘ दिले ज्यामधे ३. ६६ कोटी रूपयांचे पॅकेज आहे.

ऋतुराज जवळ पासपोर्ट नव्हता. गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि केवळ दोन तासाच्या अवधीमधे त्याचा पासपोर्ट तयार करून त्याच्या घरी पोहोचता केला. ऋतुराज आता प्रायव्हेट जेट विमानाने अमेरिकेला रवाना होईल.

ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील ‘बी टेक’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. आणि बेगुसराय शहराजवळ असलेल्या मुंगेरगंज नावाच्या खेड्याचा रहिवासी आहे.

जगाच्या सुपरपॉवरला भारी पडलेल्या भारतमातेच्या ह्या अद्भुत गुणवंत युवकाला सलाम. —–

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments