मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

या सूर्यालाही खग्रास ग्रहण लागले.स्वतःच्या बचावाचे जे भाषण टिळकांनी कोर्टापुढे केले, ते जवळजवळ साडेचार दिवस चालले.पण गेंड्याचे कातडे पांघरलेल्या त्या ज्युरी आणि न्यायाधिशांवर त्याचा शून्य  परिणाम झाला. त्यांना राजद्रोही ठरवले. त्यांना सहा वर्षाचे काळे पाणी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सारा महाराष्ट्र या शिक्षेचे वृत्त ऐकून हादरून गेला. मी तर पूर्ण कोसळून गेले. मधुमेहाने शरीर आतून पोखरले होते, या बातमीने ते कोलमडून गेले. अंथरूणावर उठून बसण्याचे  त्राण माझ्या मध्ये राहिले नाही.

तुरुंगवासातल्या एकांताचा टिळकांनी फार चांगला सदुपयोग केला. त्यांनी गीतेवर टीका लिहिली आणि गीतारहस्य हा हा साडेआठशे पानांचा ग्रंथ लिहिला. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषाही ते तिथे शिकले. वयाच्या 52 व्या वर्षी ते विद्यार्थी होते.

तिकडून येणाऱ्या पत्रांवरून आम्हाला त्यांचे वर्तमान कळे. मुलेही त्यांच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे वागत. कोणीतरी मला पत्रातील मजकूर वाचून दाखवे. त्यांच्या अचाट आणि अफाट बुद्धिमत्तेचे मला आश्चर्य वाटे. त्यांनाही मधुमेह होता. पण त्यावर ही ते कशी मात करत होते, ते आणि परमेश्वर जाणे. मी मात्र त्यांच्या कुठल्याच राष्ट्रकार्यात मदत करू शकत नसे म्हणून मला फार वाईट वाटे. पण साधी अक्षर ओळखही नसलेली मी, चार भिंती बाहेरचे जग न पाहिलेली मी, बाहेरच्या जगाचा थोडाही अनुभव नसलेली मी काय करणार होते? मुलांकडे पाहत कशीतरी दिवस अन रात्र ढकलत होते. रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. शरीराचा डोलारा कोलमडतोय हे मला जाणवायला लागले होते. या जन्मी पुन्हा त्यांचे दर्शन होणार नाही, ते भेटणार नाहीत, याची खात्री पटली होती. गळ्यातले मंगळसूत्र सोडून सगळे दागिने मी काढून ठेवले. रोज काळे साडी नेसायला सुरुवात केली. आजूबाजूचे काही समजेनासे झाले. कोणी काही बोललं तरी तिकडे लक्ष देण्याचा  मी टाळायला लागले. फक्त “भक्त विजय” हा ग्रंथ कोणी वाचून दाखवला तर मात्र मनःपूर्वक भक्तिभावाने ऐकत होते. त्यांच्या कार्याला यश मिळो, अशी परमेश्वराला आळवणी करत होते. मुलांच्यावर निदान त्यांचे कृपाछत्र राहो म्हणून प्रार्थना करत होते. भारतातल्या जनतेला भविष्यात तरी शांतता,  सुख समृद्धी आणि स्वातंत्र्य लाभो अशी आळवणी करत होते. देशाला स्वातंत्र्याचा सूर्य लवकर पहायला मिळवून म्हणून त्या मातृ देवतेला अश्रूंचा अभिषेक करत होते. अशातऱ्हेने का होईना, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंड यामध्ये माझ्या देहाची समिधा अर्पण करायला मी आतुर झाले होते.

अखेर तो दिवस उगवला. त्यांची भेट झाली नाही, तरी सौभाग्यलेणं  लेवून,अहेवपणी समाधानाने,दोन्ही मुलांना आशीर्वाद देत मी या जगाचा निरोप घेतला.

टिळकांना या बातमीचा जबर धक्का बसणार याची खात्री होती. पण आहे आघात धीराने, शांतपणे ते पचवतील हेही माहीत होते. कारण डगमगून जायला ते सर्वसामान्य होते काय ? ते तर प्रखर तेजस्वी सूर्य पुत्र होते आणि मी त्यांची तेजशलाका!

समाप्त 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यांचा आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे तंतुवाद्यं! तत्‌म्हणजे तार, ह्यावरून आपल्या लक्षात येईल कि ज्या वाद्यामधे तार/तारा वापरल्या गेलेल्या असतात त्याला तंतुवाद्य किंवा तत्‌वाद्य असं म्हणतात. ह्या वाद्यांच्या शोधाची कहाणी खूपच रंजक आहे. प्राचीन काळी निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना जंगली श्वापदांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आणि नंतर शत्रूंपासूनही स्वसंरक्षण करण्यासाठी मानवप्राणी ‘धनुष्य-बाण’ हे शस्त्र वापरत असे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. बाण सोडताना धनुष्याची प्रत्यंचा खेचावी लागते तीही किती अंतरावर बाण गेला पाहिजे हा अंदाज घेऊन! एकदा बाण सोडला कि ही खेचलेली प्रत्यंचा त्याच्या पूर्वस्थितीत येईतोवर कंप पावते आणि त्या कंपनांमुळं त्या प्रत्यंचेतून नादनिर्मिती होते.

तंतू कंपन पावल्यावर त्यातून नादनिर्मिती होते हे ह्यातून बुद्धिमान मानवप्राण्यानं हेरलं. त्यापूर्वी पोकळ वस्तूवर चामडं ताणून बांधलं तर आवाजाची गुणवत्ता आणि पातळी वाढते हे ज्ञान तालवाद्यांच्या निर्मितीप्रक्रियेतून त्याला मिळालेलंच होतं. मग ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून त्यानं लाकूड धनुष्याकारात कोरून त्यावर चामडं घट्ट बांधलं आणि त्याला तारही जोडली. अशाप्रकारे ‘वीणा’ जन्माला आली.

असं म्हणतात कि अगदी पूर्वी वीणा ही एकच तार असलेली होती जिच्या दांडीच्या वरच्या व खालच्या बाजूच्या भागात प्रत्येकी एकेक भोपळा होता. हिला ‘घोषा’ किंवा ‘घोषिका’ असं म्हटलं जातं. हिचा उल्लेख भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ ह्या संगीताच्या आद्यग्रंथात आढळतो. पुढं संगीत रत्नाकर ग्रंथात उल्लेखिली गेलेली ‘एकतंत्री वीणा ’ही एक तार असलेलीच होती! तिलाच ‘मूलवीणा’ किंवा ‘ब्रम्हवीणा’ असंही म्हटलं जातं. ही सर्व वीणांची जननी मानली गेली आहे आणि ह्या वीणेचं दर्शन किंआ स्पर्श मोक्ष देणारा असतो असंही मानलं गेलं आहे. ह्यातून एक गोष्ट नक्कीच दिसून येते कि, मानवानं त्याच्या आयुष्यात संगीताला दिलेलं भक्तीचं, अतीव श्रद्धेचं, आदराचं स्थान! आज आपल्याकडं भजनसंप्रदायात आवर्जून वापरली जाणारी एकतारी डोळ्यांपुढं आणली कि थोड्याफार फरकानं पूर्वीची एक तार असलेली वीणा कशी असेल ह्याची कल्पना येऊ शकते.

असं म्हणतात कि, एकतारीवर गाणं सर्वात कठीण असतं आणि जो एकतारीवर रियाज करतो तो नेमकेपणी अगदी सुरेल गाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे, एकाच तारेमुळं तिच्यातून गाणाऱ्याला फक्त आधारस्वर मिळत असतो आणि त्या एकाच सुराच्या आधारे इतर सगळे सूर लावणं हे कठीण काम! आणि हे कठीण काम जमतं तेव्हां गायकाचा सूर साधला जातोच कारण इतर सुरांचा त्या आधारस्वराशी तेव्हांच मेळ बसतो जेव्हां ते अगदी नेमकेपणी लागतात. म्हणूनच आजही असे एकतारीवर गाणारे कित्येक गायक (भले त्यांनी शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलेलं असो किंवा नसो) सुराला एकदम पक्के असतात, त्यांचा गाणं ऐकलं कि केवळ प्रचंड सुरेलपणाच्या किमयेनं आपण वेगळ्याच विश्वात पोहोचतो, इतर कसलाही दिखावा, तंत्रज्ञानाची साथ, बाकी कोणतेही साथीदार नसतानाही! ह्या वीणेला मोक्षदायिनी म्हणण्याचं कारण ह्यातच दडलं असावं.

पुढं हळूहळू वेगवेगळे प्रयोग होत तारांच्या वेगवेगळ्या संख्या व रचनेतील इतरही काही बदलांनुसार अनेक वीणा अस्तित्वात आल्या. आलापिनी वीणा, धनुकलीने वाजवली जाणारी धनुष्याकृती ‘पिनाकी वीणा’ (आधुनिक व्हायोलीनचं प्राथमिक स्वरूप), एकवीस तारांची मत्तकोकिला वीणा, सात तारांची चित्रवीणा, नऊ तारांची विपंची, सारिकायुक्त अशी किन्नरी वीणा, तीन तारा असणारी त्रितंत्री वीणा(जिला सतारीचं प्राथमिक रूप मानलं जातं), भरपूर म्हणजे शंभर तारा असलेली ‘शततंत्री’ वीणा, कात्यायनी वीणा अशा वेगवेगळ्या रचना व तारसंख्या असलेल्या अनेक वीणांचा उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथांमधे आढळतो. वेदिक काळात ‘वनस्पती’, ‘बाण’, ‘औडंबरी’, ‘क्षोणी’ इ. वीणा अस्तित्वात असल्याचाही उल्लेख आढळतो. राजा समुद्रगुप्त जी वीणा वाजवायचा ती सात तारांची ‘परिवादिनी’ नामक वीणा सुवर्णमुद्रांनी मढवलेली होती असाही उल्लेख आढळतो.

सतार ह्या तंतुवाद्याबद्दल एक महत्वाचा उल्लेख आढळतो कि, ख्यालगायनाला लोकप्रियता मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या महम्मद शाह रंगीलेंच्या दरबारातील सदारंग-अदारंग- महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी सदारंग म्हणजे ‘नियॉंमत खॉं’साहेबांचा धाकटा भाऊ ‘आमीर खॉं’ हा तीन तारा असलेल्या एका पर्शियन वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीतातील राग वाजवून पाहात असे, ते सतारीचं प्रारंभिक रूप! त्याने आणि पुढं इतरांनीही त्या वाद्यावर वेगवेगळे प्रयोग केले आणि आजची पूर्ण विकसित सतार जन्माला आली. नावाच्या साम्यामुळं ‘आमीर खुस्रो’ ह्यांना सतारनिर्मितीचं श्रेय दिलं जातं मात्र त्यात तथ्य नाही, कारण कागदोपत्री पंधराव्या शतकापर्यंत कुठंही ह्या वाद्याचा उल्लेख आढळत नाही.

तंतुवाद्यांमधे ते वाद्य वाजवण्याच्या पद्धतीवरून तत आणि वितत असे दोन प्रकार आढळतात. तत वाद्यं म्हणजे ज्या वाद्यांच्या तारा बोटांनी, नखांनी किंवा ‘नख्खी/मेजराब’ अशा गोष्टींनी वाजवल्या जातात. उदा. तानपुरा, एकतारी, तुणतुणं, सतार, वीणा, स्वरमंडल, सरोद, संतूर इ.

वितत वाद्यं म्हणजे जी वाद्यं बो किंवा गजाच्या सहाय्याने वाजवली जातात. उदा. इसराज, सारंगी, दिलरुबा, व्हायोलीन, आपल्या राजस्थानमधे आढळणारं ‘रावणहाथा’ हे वाद्य इ.

ह्या सर्व वाद्यांच्या रचनांमधे पोकळ भाग (ध्वनिवर्धक व अनुनाद निर्मिती करणारा) म्हणून वाळवून आतून पोकळ केलेले विविध आकारांचे, प्रकारचे भोपळे, नारळाची करवंटी इ. गोष्टींचा वापर होतो. व्हायोलीनमधे असे काही वापरले गेले नसले तरी साऊंडबॉक्स म्हणून लाकडाचाच ‘पोकळ भाग’ तयार केलेला असतो.

निसर्गाकडूनच मिळालेल्या जादूई तत्वांचा वापर करून मानवानं आपल्या बुद्धीकौशल्यानं, अभ्यासूवृत्तीनं आणि नैसर्गिकरीत्या लाभलेल्या शक्तींच्या आधारे कायकाय किमया घडवून आणली हे जाणून घेताना एकीकडं अभिमानानं ऊर भरून येतो आणि त्याचक्षणी निसर्गाच्या महान, अद्भुत शक्तींपुढं नतमस्तकही व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 33 ☆ आदमी आदमी को करे प्यार जो ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा  एक भावप्रवण कविता  “आदमी आदमी को करे प्यार जो“।  हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 33 ☆

☆ आदमी आदमी को करे प्यार जो 

आदमी आदमी को करे प्यार जो, तो धरा स्वर्ग हो मनुज भगवान हो

घुल रहा पर हवा में जहर इस तरह, भूल बैठा मनुज धर्म ईमान को

राह पर चल सके विश्व यह इसलिये, दृष्टि को दीप्ति दो प्रीति को प्राण दो

 

रोज दुनियां बदलती चली जा रही,  और बदलता चला जा रहा आदमी

आदमी तो बढ़े जा रहे सब तरफ, किन्तु होती चली आदमियत कीकमी

आदमी आदमी बन सके इसलिये, ज्ञान के दीप को नेह का दान दो

 

हर जगह भर रही गंध बारूद की, नाच हिंसा का चलता खुला हर गली

देती बढ़ती सुनाई बमो की धमक, सीधी दुनियां बिगड़ हो रही मनचली

द्वार विश्वास के खुल सकें इसलिये, मन को सद्भाव दो सच की पहचान दो

 

फैलती दिख रही नई चमक और दमक, फूटती सी दिखती सुनहरी किरण

बढ़ रहा साथ ही किंतु भटकाव भी, प्रदूषण घुटन से भरा सारा वातावरण

जिन्दगी जिन्दगी जी सके इसलिये स्वार्थ को त्याग दो नीति को मान दो

 

प्यास इतनी बढ़ी है अचानक कि सब चाहते सारी गंगा पे अधिकार हो

भूख ऐसी कि मन चाहता है यही हिमालय से बड़ा खुद का भण्डार हो

जी सकें साथ हिल मिल सभी इसलिये मन को संतोष दो त्रस्त हो त्राण दो

 

देश है ये महावीर का बुद्ध का, त्याग तप का जहां पै रहा मान है

बाह्य भौतिक सुखो से अधिक आंतरिक शांति आनंद का नित रहा ध्यान है

रह सकें चैन से सब सदा इसलिये त्याग अभिमान दो त्याग अज्ञान दो

 

आदमी के ही हाथों में दुनियां है ये आदमी के ही हाथो में है उसका कल

जैसा चाहे बने औ बनाये इसे स्वर्ग सा सुख सदन या नरक सा विकल

आने वालो और कल की खुशी के लिये युग को मुस्कान का मधुर वरदान दो

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी , रामपुर , जबलपुर

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – संग्रह ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – संग्रह ?

संग्रह दोनों ने किया,

उसका संग्रह,

भीड़ जुटाकर भी

उसे अकेला करता गया,

मेरे संग्रह ने

एकाकीपन

पास फटकने न दिया,

अंतर तो रहा यारो!

उसने धनसंग्रह किया

मैंने जनसंग्रह किया!

 

©  संजय भारद्वाज

रविवार 16 अप्रैल 2017, प्रातः 8:16 बजे

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिंदी साहित्य – आलेख ☆ इतिहास का अध्ययन – एक निवेदन ☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा 

 

 

 

 

((श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। )

 ☆ आलेख ☆ इतिहास का अध्ययन – एक निवेदन ☆ श्री सुरेश पटवा ☆ 

सेवानिवृत्त बुजुर्गों को गुणवत्ता पूर्ण समय बिताने के लिए अपने देश के सच्चे इतिहास को अवश्य पढ़ना चाहिए ताकि उन्हें वर्तमान से जोड़कर एक स्वस्थ नज़रिया विकसित करने में सहूलियत हो सके। अन्यथा निहित स्वार्थों से अभिप्रेरित इतिहास उन्हें सही आकलन तक पहुँचने ही नहीं देता है।

भारत में राजनीतिक मजबूरियों के चलते इतिहास चार तरह से लिखा गया या लिखा जा रहा है।

  • साम्यवादी इतिहास
  • विजेता के नज़रिया का इतिहास
  • राष्ट्रवादी इतिहास
  • स्वतंत्र इतिहास

लोगों को यही नहीं पता कि स्वतंत्र इतिहास क्या है? वे प्रायोजित इतिहास की भूलभूलैया में भटक कर अनुचित अवधारणा विकसित कर लेते हैं। जिससे इतिहास के सबक़ भी गड़बड़ाने लगते हैं।

बीस सालों में इतिहास का शौक़िया अध्ययन करके मैंने भारत के स्वतंत्र इतिहास की प्राचीन काल से मध्ययुग तक के अध्ययन हेतु तीन किताबें चुनी हैं जो कि रोचक संदर्भ ग्रंथ भी हैं। प्रत्येक भारतीय को इन्हें अवश्य पढ़ना चाहिए।

“प्राचीन भारत” प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मजूमदार द्वारा और “दिल्ली सल्तनत” एवं “मुग़लकालीन भारत” आशीर्वादी लाल श्रीवास्तव द्वारा कलमबद्ध की गई हैं। ये किताबें सस्ती भी उपलब्ध हैं या पुरानी किताबों की दुकान पर मिल जाती हैं। मैंने खुद चाँदनी चौक के ढ़ेर से ख़रीदीं थीं।

निवेदक: श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार#46 – सच्चा भक्त ☆ श्री आशीष कुमार

श्री आशीष कुमार

(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में  साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है। 

अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से  सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं।  आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से  बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।” )

 ☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार#46 – सच्चा भक्त ☆ श्री आशीष कुमार☆

एक राजा था जो एक आश्रम को संरक्षण दे रहा था। यह आश्रम एक जंगल में था। इसके आकार और इसमें रहने वालों की संख्या में लगातार बढ़ोत्तरी होती जा रही थी और इसलिए राजा उस आश्रम के लोगों के लिए भोजन और वहां यज्ञ की इमारत आदि के लिए आर्थिक सहायता दे रहा था। यह आश्रम बड़ी तेजी से विकास कर रहा था। जो योगी इस आश्रम का सर्वेसर्वा था वह मशहूर होता गया और राजा के साथ भी उसकी अच्छी नजदीकी हो गई। ज्यादातर मौकों पर राजा उसकी सलाह लेने लगा। ऐसे में राजा के मंत्रियों को ईर्ष्या होने लगी और वे असुरक्षित महसूस करने लगे। एक दिन उन्होंने राजा से बात की – ‘हे राजन, राजकोष से आप इस आश्रम के लिए इतना पैसा दे रहे हैं। आप जरा वहां जाकर देखिए तो सही। वे सब लोग अच्छे खासे, खाते-पीते नजर आते हैं। वे आध्यात्मिक लगते ही नहीं।’ राजा को भी लगा कि वह अपना पैसा बर्बाद तो नहीं कर रहा है, लेकिन दूसरी ओर योगी के प्रति उसके मन में बहुत सम्मान भी था। उसने योगी को बुलवाया और उससे कहा- ‘मुझे आपके आश्रम के बारे में कई उल्टी-सीधी बातें सुनने को मिली हैं। ऐसा लगता है कि वहां अध्यात्म से संबंधित कोई काम नहीं हो रहा है। वहां के सभी लोग अच्छे-खासे मस्तमौला नजर आते हैं। ऐसे में मुझे आपके आश्रम को पैसा क्यों देना चाहिए?’

योगी बोला- ‘हे राजन, आज शाम को अंधेरा हो जाने के बाद आप मेरे साथ चलें। मैं आपको कुछ दिखाना चाहता हूं।’

रात होते ही योगी राजा को आश्रम की तरफ लेकर चला। राजा ने भेष बदला हुआ था। सबसे पहले वे राज्य के मुख्यमंत्री के घर पहुंचे। दोनों चोरी-छिपे उसके शयनकक्ष के पास पहुंचे। उन्होंने एक बाल्टी पानी उठाया और उस पर फेंक दिया। मंत्री चौंककर उठा और गालियां बकने लगा। वे दोनों वहां से भाग निकले। फिर वे दोनों एक और ऐसे शख्स के यहां गए जो आश्रम को पैसा न देने की वकालत कर रहा था। वह राज्य का सेनापति था। दोनों ने उसके भी शयनकक्ष में झांका और एक बाल्टी पानी उस पर भी उड़ेल दिया। वह व्यक्ति और भी गंदी भाषा का प्रयोग करने लगा। इसके बाद योगी राजा को आश्रम ले कर गया। बहुत से संन्यासी सो रहे थे।उन्होंने एक संन्यासी पर पानी फेंका। वह चौंककर उठा और उसके मुंह से निकला – शिव-शिव। फिर उन्होंने एक दूसरे संन्यासी पर इसी तरह से पानी फेंका। उसके मुंह से भी निकला – हे शंभो। योगी ने राजा को समझाया – ‘महाराज, अंतर देखिए। ये लोग चाहे जागे हों या सोए हों, इनके मन में हमेशा भक्ति रहती है। आप खुद फर्क देख सकते हैं।’ तो भक्त ऐसे होते हैं।भक्त होने का मतलब यह कतई नहीं है कि दिन और रात आप पूजा ही करते रहें। भक्त वह है जो बस हमेशा लगा हुआ है, अपने मार्ग से एक पल के लिए भी विचलित नहीं होता। वह ऐसा शख्स नहीं होता जो हर स्टेशन पर उतरता-चढ़ता रहे। वह हमेशा अपने मार्ग पर होता है, वहां से डिगता नहीं है। अगर ऐसा नहीं है तो यात्रा बेवजह लंबी हो जाती है।

भक्ति की शक्ति कुछ ऐसी है कि वह सृष्टा का सृजन कर सकती है। जिसे मैं भक्ति कहता हूं उसकी गहराई ऐसी है कि यदि ईश्वर नहीं भी हो, तो भी वह उसका सृजन कर सकती है, उसको उतार सकती है। जब भक्ति आती है तभी जीवन में गहराई आती है। भक्ति का अर्थ मंदिर जा कर राम-राम कहना नहीं है। वो इन्सान जो अपने एकमात्र लक्ष्य के प्रति एकाग्रचित है, वह जो भी काम कर रहा है उसमें वह पूरी तरह से समर्पित है, वही सच्चा भक्त है। उसे भक्ति के लिए किसी देवता की आवश्यकता नहीं होती और वहां ईश्वर मौजूद रहेंगे। भक्ति इसलिए नहीं आई, क्योंकि भगवान हैं। चूंकि भक्ति है इसीलिए भगवान हैं।

© आशीष कुमार 

नई दिल्ली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – कविता ☆ जीवन की रीत ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

(आज  प्रस्तुत है  डॉ कामना तिवारी श्रीवास्तव जी  की  एक भावप्रवण रचना जीवन की रीत । 

 ☆ कविता ☆ जीवन की रीत ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ☆ 

जो किया तुमने ठीक किया

मुस्कुराता जीवन तुम्हारा

तुमसे गिला नहीं है हमारा

दुख नहीं मुझे तुमसे मिले हादसों से

क्योंकि जीवन की रीत

अभी-अभी ही देखी है

मुस्कुराता चेहरा ठीक तुम्हारी तरह

उसकी अभी एक तस्वीर और देखी है

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव

मो 9479774486

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत…. उत्तर मेघः ॥२.११॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत …. उत्तरमेघः ॥२.११॥ ☆

 

अक्षय्यान्तर्भवननिधयः प्रत्यहं रक्तकण्ठैर

उद्गायद्भिर धनपतियशः किंनरैर यत्र सार्धम

वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यसहाया

बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ति॥२.११॥

सहचर बिना एक उसे चक्रवाकी

सदृश अल्पभाषी विरह वासिनी को

समझना मेरा ही हृदय दूसरा है

पड़ी दूर मुझसे प्रिया कामिनी को

प्रलंबित विरह के दिनो को बिताती

विकल वेदना से भरी यामिनी जो

मुझे भास होता है कि वह म्लान होगी

शिशिर से मथित ज्यो पद्यनी हो

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – प्रा. रोहिणी तुकदेव  – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

? प्रा. रोहिणी तुकदेव – अभिनंदन ?

थांगपत्ता-Thangpatta by Rohini Tukdev - Aakar Foundation Prakashan - BookGanga.com

प्रा. रोहिणी तुकदेव यांची नवीन कादंबरी ‘थांगपत्ता’ अगदी अलीकडेच , डॉ ताराबाई भवाळकर यांच्या हस्ते ‘ऑन लाईन’ प्रकाशित झाली आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेछा. आज वाचा, या कादंबरीविषयी त्यांनी लिहिलेले मनोगत.

? ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

 

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

जगायचे तर आनंदाने जगणे सुंदर आहे

भवसागर हा तरण्यासाठी म्हणती दुर्धर आहे

 

कर्म धर्म तर गोंदण होते जन्मासोबत भाळी

जगणे मरणे याच्या मधले जीवन अंतर आहे

 

सुरुवातीचे परावलंबन सरते उरते काही

कर्म चांगले देते किर्ती उरणे नंतर आहे

 

परावलंबन सरते तेव्हा स्वावलंबनी व्हावे

निसर्गातली अदभुत शक्ती इथे निरंतर आहे

 

विशाल जगती नवीनतेची नवी योजना मांडा

जग झुलवाया हाती तुमच्या मोठा अवसर आहे

 

प्रेम आंधळे नका म्हणू ना ते तर डोळस आहे

सुखी व्हायचे दोघा वरती सगळे निर्भर आहे

 

लळा जिव्हाळा प्रेम वाढवा माणुसकीचे नाते

तुमच्यासाठी हे जग दुसरे मायेचे घर आहे

 

दु:ख दळायला बसताना ही गीत सुखाचे गावे

संसाराची होते ओवी हेच बरोबर आहे

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈