हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 19 (36-40)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 19 (36 – 40) ॥ ☆

सर्ग-19

एकान्त में स्त्रियों पै दिखा तीनों आंगिक व वाचिक व सात्विक विधायें।

अभिनय की, मित्रों के सम्मुख प्रतिष्ठिक की नाटक की अपनी कुशल योग्यतायें।।36।।

 

पहन कुटज-अर्जुन की मालायें वर्षा में, अँगराग करके कदम का परागण।

मयूरों से परिपूर्ण कृत्रिम वनों में बिताता था उन्मत्त हो वह सुखद क्षण।।37।।

 

कर मान मुँह फेर लेटी हुई माननियों को न वर्षा में वह था मनाता।

वरन धनगरज से विडर-चिपटने की, छाती में उनकी थी आशा लगाता।।38।।

 

कार्तिक की रातें खुली छत्त पै महलां की, सुमुखियों के संग वह था रति में बिताता।

जब श्रम मिटाने खुले नीलनभ से सुखद चाँदनी का था आनंद पाता।।39।।

 

वह अपने महलों से सुन्दर गवाक्षों से शोभा निरखता था सरयू शुभा की।

जिसके खुले रेणु तट पै बलाकायें दिखती थी रमणी जघन मेखला सी।।40।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शांता शेळके

शांता शेळके (12 ऑक्टोबर 1922 – 6 जून 2002) या प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, लेखिका, अनुवादिका , साहित्यिका , पत्रकार व प्राध्यापिका होत्या.

आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’मध्ये 5वर्षे उपसंपादक म्हणून काम केल्यावर त्या अध्यापनाकडे वळल्या. नागपूरमधील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या.

त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे.’कविता स्मरणातल्या’, ‘गोंदण’, ‘तोच चंद्रमा’वगैरेसारखे काव्यसंग्रह, ‘आतला आनंद’, ‘धूळपाटी’ वगैरे ललित लेखसंग्रह,’आंधळी’, ‘ चौघीजणी’, ‘मेघदूत’ वगैरे इंग्रजी/ संस्कृतमधून केलेले अनुवाद, ‘नक्षत्रचित्रे’सारखे व्यक्तिचित्रसंग्रह  अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

शांताबाईंनी असंख्य गीते लिहिली.अगदी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘खोडी माझी काढाल तर’सारखी बालगीते, ‘गजानना श्री गणराया’सारखी भक्तीगीते,  ‘चांदण्या रात्रीतले ते’पासून ‘शारद सुंदर चंदेरी राती’पर्यंत, ‘शालू हिरवा पाच नि मरवा’पासून ‘मध्यरात्रीला पडे तिच्या’पर्यंत, ‘तोच चंद्रमा नभात’पासून ते ‘वादळवारं सुटलं रं ‘पर्यंत विविध प्रकारची, वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी गीते त्यांनी लिहिली आणि ती सर्व गीते रसिकांच्या पसंतीला उतरली, त्यांच्या ओठांवर रूळली.

शांताबाईंवर ‘आठवणीतील शांताबाई’, ‘शांताबाई’, ‘शांताबाईंची स्मृतिचित्रे’, ‘शब्दव्रती

शांताबाई’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

1996साली आळंदीला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाईंनी  भूषवले होते.

शांताबाईंना गदिमा गीतलेखन पुरस्कार, ‘मागे उभा मंगेश’साठी सूरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार ( चित्रपट :भुजंग), साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार  इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.

शांताबाईंच्या सन्मानार्थ शांता शेळके साहित्य पुरस्कार दिला जातो.

☆☆☆☆☆

रामचंद्र दत्तात्रेय रानडे

गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे (3 जुलै 1886 – 6 जून 1957) हे आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत होते.

कर्नाटकातील जमखंडीमध्ये त्यांचा जन्म झाला.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी पहिली शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली.

एम.ए.(तत्त्वज्ञान)च्या परीक्षेत त्यांना ‘परीक्षकापेक्षा परीक्षार्थीला अधिक माहिती आहे’ असा शेरा मिळाला.

फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गंगनाथ झा यांच्या निमंत्रणावरून गुरुदेव रानडे अलाहाबाद विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तिथे अधिष्ठाता व कुलगुरू ही पदेही भूषवली.

गंगनाथ झा यांच्या शब्दांत ‘रानडे लौकिक व पारलौकिक अशा दोन जगात वावरत. म्हणूनच त्यांना ह्याच भौतिक जगात दिव्यानुभूती शक्य झाली.

‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’चा अपवाद वगळता त्यांनी आपले तत्त्वज्ञान कोठेही न मांडता विविध प्रदेशातील, संस्कृतीतील संतांचे साक्षात्कार अभ्यासून त्यातील साम्यस्थळे दाखवली. ग्रीक व लॅटिन भाषांच्या व्यासंगामुळे व कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील वास्तव्यामुळे मराठी, कानडी, हिंदी साहित्याच्या परिशीलनामुळे त्यांच्या चिंतनाचा परीघ विस्तारला.

गुरुदेव रानडेंनी विपुल लेखन केले. त्यातील बहुतांश इंग्रजीत आहे. ‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’, ‘ अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘द भगवदगीता ऍज अ फिलॉसॉफी अँड गॉड रिअलायझेशन’, ‘ वेदांत :द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट’, ‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतवचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’ इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.

‘इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू’ हे त्रैमासिक सुरू  करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांचे निंबाळचे समाधिस्थळ अध्यात्म विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन ( बेळगाव) ही संस्था त्यांचे आध्यात्मिक विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गुरुदेवांवर ‘गुरुदेव रानडे :साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान’, ‘गुरुदेव रानडे :ऍज अ मिस्टिक’ वगैरे आठ मराठी/इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

चरित्रकार शं. गो. तुळपुळे यांनी ‘परमार्थाचे पाणिनी’ या शब्दांत गुरुदेवांचा गौरव केला आहे.

शांताबाई शेळके व गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोश

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अजूनही…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अजूनही…!  ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

अजून वेळ पहाते वाट

तोच मनात विश्वास घेत

वचन एक ते भेटण्याचे

जगण्याला या आधार देत.

 

सारे आयुष्य नसते खोटे

आठवणी का मग छळती ?

ऋतू का सांगती बदलाव

श्रावण-वसंता घेता कवेत.

 

याच जीवनी प्रेम पुरावे

वळणावर भेट-दुरावे

हृदय स्पंदनी तेच दुवे

अश्रू विरही शब्दांसवेत.

 

विरले गीत तरी परंतु

कोकीळ गातो अजून तिथे

व्याकुळ सांज ओशाळ जिथे

कवण जीवंत हाक देत.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #83 ☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 83 ? 

☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆

तप्त उन्हाच्या झळा

चैत्र महिना तापला

पळस फुलून गळाले

होळीचा सण आटोपला…०१

 

तप्त उन्हाच्या झळा

जीव अति घाबरतो

थंड पाणी प्यावे वाटे

उकाडा बहू जाणवतो…०२

 

तप्त उन्हाच्या झळा

शेतकरी घाम गाळतो

अंग भाजले उन्हाने

तरी राब राब राबतो…०३

 

तप्त उन्हाच्या झळा

फोड आला पायाला

अनवाणी फिरते माय

चारा टाकते बैलाला …०४

 

तप्त उन्हाच्या झळा

सोसाव्या लागतील

थोड्या दिसांनी मग

मृगधारा बरसतील…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मैत्रिण… कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा पाटील (मनप्रीत)

अल्प परिचय 

सीमा ह.पाटील. (मनप्रीत)

शिक्षण – M.com. D.ed.

सम्प्रति – पंधरा वर्षे हायस्कुल शिक्षिका.

सध्या प्रायव्हेट ट्युशन 10th पर्यंत आणि एकयशस्वी  उद्योजिका.

आवड-  नाटकपाहणे,भावगीतांचे, सुगम संगीताचे कार्यक्रम एन्जॉय करणे. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे.वाचन,भावलेल्या प्रसंगावर लिखाण, कथा लेखन , कविता लेखन , चारोळ्या लेखन .अनेक लेखन स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम केले आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते ‘प्रीतिसरी ‘ हा  चारोळी संग्रह  प्रकाशीत झाला आहे. थोड्याच दिवसात काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे. सभोवतालचा परिसर ‘या सदरांतर्गत महाराष्टातील अनेक किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

 सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. विविध महिला ग्रुप मध्ये सक्रिय. तसेच  राजकीय  सक्रिय सहभाग.

अलीकडे ‘गझल’ हा लिखाणाचा अतिशय सुंदर आणि माझा आवडता प्रकार शिकत आहेत.

? काव्यानंद ?

 ☆ मैत्रिण…कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

कै. शांता शेळके

मैत्रिण – 

स्वप्नातल्या माझ्या सखी

कोणते तुझे गाव?

कसे तुझे रंगरुप

काय तुझे नाव?

 

कशी तुझी रितभात?

कोणती तुझी वाणी?

कसे तुझ्या देशामधले

जमीन, आभाळ, पाणी?

 

लव्ह्याळ्याच्या मुळांतून

झिरपताना पाणी

त्यात पावले बुडवून तू ही

गुणगुणतेस का गाणी?

 

सुगंधित झुळका चार

केसांमध्ये खोवून

तू ही बसतेस ऊन कोवळे

अंगावर घेऊन?

 

काजळकाळ्या ढगांवर

अचल लावून दृष्टी

तू ही कधी आतल्याआत

खूप होतेस कष्टी?

 

कुठेतरी खचित खचित

आहे सारे खास,

कुठेतरी आहेस तू ही

नाही नुसता भास.

  • शांता शेळके

☆ रसग्रहण ☆

आज खूप सुंदर आणि हळवे भाव व्यक्त करणारी जेष्ठ कवयित्री शांता यांची ‘मैत्रीण ‘एक अप्रतिम  कविता !सादर केली आहे.

 स्वप्नातल्या माझ्या सखी

 कोणते तुझे गाव?

 कसे तुझे रंगरुप

 काय तुझे नाव?

कवयित्री स्वप्नातल्या आपल्या सखीशी संवाद साधत असताना अगदी अनोळखीपणे विचारत आहेत, अग सखी तुझे गाव कोणते? तू दिसतेस कशी? आणि तुझे नाव काय?

म्हणजेच कधी कधी आपल्या स्वतः मधीलच काही वैशिष्ट्ये आपणास वेगळी वाटू लागतात. आणि याच वैशिष्ट्यांना आपण असे प्रश्न विचारतो म्हणजेच आपण एखादे आपले मत मांडत असू तेव्हा किंवा जेव्हा आपण एखादी भूमिका पार पाडत असतो किंवा तेव्हा त्याबद्दल आपण जर साशंक असू अशा वेळी द्विधा मनस्थिती  बद्दल आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारत आहोत असं काहीसं या ओळीतून कवयित्रीला सांगावेसे वाटते असे वाटते.

 कशी तुझी रितभात?

 कोणती तुझी वाणी?

 कसे तुझ्या देशामधले

 जमीन,आभाळ, पाणी?

 लव्ह्याळ्याच्या मुळांतून

 झिरपताना पाणी

 त्यात पावले बुडवून तू ही

 गुणगुणतेस का गाणी?

वरील कवितेतून कवयित्री आपल्या मनात लपलेल्या सखीच्या कानात हळूच प्रश्न विचारत आहे माझी जी व्यक्त होण्याची पद्धत आहे तीच तुझी स्वतःची आहे का? की काही वेगळ्या परंपरा, रूढी यांच्या प्रभावाखाली येऊन तू काही निर्णय घेत तर नाहीस ना?

तू जे काही वर्तन करतेस त्यातून तुला नक्कीच आनंद मिळत आहे ना? असं कवयित्री अगदी हळव्या भावनेसह गुणगुणतेस ना गाणी अशा सुंदर शब्दांत विचारत आहेत.

 काजळकाळ्या ढगांवर

 अचल लावून दृष्टी

 तू ही कधी आतल्याआत

 खूप होतेस कष्टी?

 कुठेतरी खचित खचित

 आहे सारे खास,

 कुठेतरी आहेस तू ही

 नाही नुसता भास.

वरील ओळी मधून कवयित्री शांता शेळके यांनी जीवन जगत असताना प्रत्येक स्त्री च्या मनाची तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतानाही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करून नाईलाजाने गप्प बसावे लागते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते तिचे अगदी भावस्पर्शी वर्णन वरील कवितेतील कडव्या मधून केले आहे त्या म्हणतात पाण्याने गच्च भरलेल्या कृष्ण ढगासारखी म्हणजेच पापणी आड सजलेल्या अश्रू ना बाहेर न येऊ देता अगदी प्रयासाने तू ते थांबवतेस ना, हो अगदी नक्की मी तुला अगदी जवळून ओळखते, कारण मी तुझी जिवलग सखी ना?

म्हणजेच प्रत्येक स्त्री च्या मनात एखाद्या दुःखी प्रसंगी लपलेल्या एका असहाय्य  भावनेची समजूत काढताना कवयित्री इथे दिसत आहेत !!

© सीमा पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 20 – महासमाधी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 20 – महासमाधी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रनाथ यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता. श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद घडवित होते. नरेंद्रनाथांच्या प्रापंचिक अडचणी हळूहळू कमी होत होत्या. पुस्तकाची भाषांतरे आणि काही काळ नोकरी करून ते आर्थिक बाजू सावरत होते. एव्हाना १८८३-८४ या काळात श्रीरामकृष्ण कलकत्त्यातील सर्वांच्या परिचयाचे झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि उपदेश ऐकण्यासाठी झुंडीच्या झुंडी येत असत लोकांच्या,

विसाव्या शतकातील एक आदर्शाचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण समजले जात. म्हणूनच संन्यासीश्रेष्ठ स्वामी विवेकानंदानी समस्त समाजाला घनगंभीर आवाजात ऐकविले होते, “जर तुम्हाला डोळे असतील तरच तुम्ही पाहू शकाल. जर तुमच्या हृदयाचे दार उघडे असेल तरच तुम्हाला ते जाणवू शकेल. ज्याला समयाची लक्षणे, काळाची चिन्हे दिसू शकत नाहीत, समजू शकत नाहीत, तो अंध, जन्मांधच म्हटलं पाहिजे. दिसत नाही की काय, दरिद्री ब्राम्हण आईबापाच्या पोटी एका लहानशा खेड्यात, जन्मलेल्या या मुलाची आज तेच सारे देश, अक्षरश: पूजा करीत आहेत. की जे शतकानुशतके मूर्तिपूजेविरुद्ध सारखी ओरड करीत आले आहेत”.

नरेंद्रनाथांना देवदेवतांची दर्शने होत होती. पण ही सगळी साकार रुपे होती. त्यात त्याचे समाधान होत नव्हते. अद्वैताचा अनुभव देणारी निर्विकल्प समाधी त्यांना हवी होती. ज्ञान, साधना आणि गुरूंचे समर्थ मार्गदर्शन यांच्यामुळे नरेंद्रनाथांनी अनेक वेळा आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला. निर्विकल्प समाधीचा अनुभव पण त्यांनी घेतला.

१८८६ मध्ये ,या सगळ्या काळात श्रीरामकृष्ण यांची तब्येत बिघडली. घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी कलकत्ता आणि नंतर काशीपूर मध्ये एक घर घेऊन तिथे उपचारासाठी त्यांना ठेवण्यात आले. सर्व भक्त मंडळी चिंतेत होती. श्रीरामकृष्णांच्या सेवा सुश्रुशेचा बंदोबस्त, त्यांची निगा राखणे यासाठी नरेंद्र नाथांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घर सोडून श्रीरामकृष्ण यांच्या सेवेसाठी काशीपूरला येऊन राहिले जेणे करून चोवीस तास सेवा करता येईल.

इतर भक्त पण येऊन राहत असत. हे घर आता नुसते निवास न राहता तो एक मठ आणि विश्वविद्यालय होऊन बसले होते. भक्तगण साधना, निरनिराळ्या शास्त्रांचे पठण करत. रामकृष्ण यांच्या सेवेच्या निमित्ताने सर्व भक्त एकत्र राहत असल्याने सर्वजण एका आध्यात्मिक प्रेमबंधाने एकमेकांशी जोडले गेले. इथेच भावी श्रीरामकृष्ण संघाची मुहुर्तमेढ रोवली गेली म्हटले तरी चालेल. शुभ दिवस पाहून श्री रामकृष्ण यांनी सर्व कुमार शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास देण्याचा संकल्प केला. 

गुरूंचा आजार बळावला होता. श्री रामकृष्ण यांच्या अखेरच्या दिवसातले त्यांचे उद्गार, लौकिक-अलौकिक, पार्थिव-अपार्थिव, क्षणिक-चिरंतन अशा दोन्ही बाजूंची स्पष्टता करणारे होते. मात्र हे जग सोडून जातांना आपला अनमोल वारसा कोणाकडे सोपवून जायचा, तो जपता यावा म्हणून त्याच्या मनाची कशी सिद्धता करायची याचा विचार शेवटपर्यंत त्यांच्या मनात असे.

अशा परिस्थितीतही सदासर्वकाळ ते बालक भक्तांना उपदेश देण्यात दंग असत. कधी नरेंद्रनाथांना जवळ बोलवून सांगत, “नरेन ही सारी मुले मागे राहिलीत. तू या सार्‍यापरिस बुद्धीमान आणि शक्तिमान आहेस. तूच त्यांच्याकडे पहा. त्यांना सन्मार्गाने ने. हे सारे आध्यात्मिक जीवन घालवतील. यातला कुणी घरी जाऊन संसारात गुंतणार नाही असे पहा. मी आता लवकरच देह सोडीन. त्यांच्या वारसदारांच्या अग्रणी नरेंद्र च होता. ‘नरेंद्र हा तुमचा नेता आहे’ असे रामकृष्ण शिष्यांनाही सांगीत.

महासमाधीच्या तीन-चार दिवस आधी, श्री रामकृष्णांनी नरेंद्रला आपल्या खोलीत बोलावले, आपली दृष्टी त्यांच्यावर स्थिर केली. आणि ते समाधीत मग्न झाले. जणू एखादा विजेचा प्रवाह आपल्या शरीरात शिरतो आहे, असा भास नरेंद्रला झाला. त्याचे बाह्य विश्वाचे ज्ञान नष्ट झाले. पुन्हा भानावर आल्यावर पाहतो तो, श्री रामकृष्णांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या आहेत. काय झालं असे नरेंद्र नाथांनी विचारताच, रामकृष्ण म्हणाले, “नरेन माझ्याजवळ जे काही होतं, ते सारं मी तुला आज देऊन टाकलं आणि आता मी केवळ एक फकीर झालो आहे. माझ्याजवळ दमडी देखील उरलेली नाही. मी ज्या शक्ति तुला दिलेल्या आहेत,त्यांच्या बळावर तू महान कार्य करशील आणि ते पुरं झाल्यावर तू जिथनं आला आहेस तिथं परत जाशील”.

 शेवटी शेवटी क्षणाक्षणाला त्यांच्या वेदना वाढत होत्या. कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नव्हता. श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तेव्हढ्यात त्यांची समाधी लागली. नरेंद्रनाथांच्या सांगण्यावरून नरेंद्रसहित सर्वांनी, ‘हरी ओम तत्सत’ चा घनगंभीर आवाजात गजर सुरू केला. काही क्षण भानावर येऊन त्यांनी नरेंद्रला अखेरचे काहीतरी सांगीतले आणि कालीमातेचे नाव घेऊन शरीर मागे टेकवले. त्यांच्या चेहर्‍यावर एक ईश्वरी हास्य होते आणि ते अखेरच्या समाधीत गेले होते. त्यांनी पार्थिव शरीराचा त्याग केला. शिष्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. त्यांच्या जीवनातला चालता बोलता प्रकाश हरपला होता. महासमाधी ! 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? जीवनरंग ❤️

My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….) इथून पुढे —

माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले.पण त्यांनी लग्न केले नाही. माझ्या आजी आजोबांनी  नैतिक, अनैतिक, भावनिकरित्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला,पण बाबा ठाम राहिले.. शेवटी तर आजीआजोबांनी  Ultimatum दिला….” तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती,जमीनजुमला,घर यातला छदामही मिळणार नाही, या सर्वातून  तुला बेदखल केले जाईल. “

बाबा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठीसुद्धा थांबले नाहीत आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडले. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण सुखी जीवनावर पाणी सोडले व मला घेऊन या मोठ्या शहरात एक सडाफटींग माणूस म्हणून अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं. रात्रंदिवस काम करुन मला वाढवलं,जपलं, प्रेमानं माझी काळजी घेतली.  .

आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत… ज्या मला आवडायच्या !

पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हंटलं की तो मीच संपवायचे…..कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही…

खरी ग्यानबाची मेख इथंच होती….त्यांच्या समर्पणाची.

त्यांच्या आवाक्याबाहेरचे,पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला.

Love, Care ..defines Mother.म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो.

Compassion….म्हणजे करुणा म्हणजे जर आई असेल,तर माझा बाबा यात फिट्ट….

Sacrifice…समर्पण हे आईचे रुप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर….

संक्षेपात……

आई जर प्रेम,काळजी,करुणा,समर्पण यांची मुर्ती असेल तर…..

  …..   MY FATHER IS THE BEST MOTHER ON EARTH THEN…

On Mother’s day I Salute him and say it with great Pride that, the hardworking GARDENER  working in this School is MY FATHER…

On Mothers day..या पृथ्वीवरचा  एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते.

कदाचित शिक्षकांना मी हे लिहलेलं आवडणार नाही,पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी, ज्यानी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केले.

टांचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली….आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच.

बागकाम करतांना तळपत्या उन्हाने कधीही घामाघुम न झालेला गंगा… आपल्या मुलीच्या या मृदु मुलायम शब्दांनी  त्याची छाती अश्रुंनी भिजून चिंब झाली..तो हात बांधून उभा होता….

शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि ह्रदयाच्या जवळ धरला.अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होत…….

प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितले, पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या….

आवाजातला प्रशासकीय करड्या स्वराची जागा आता मुलायमतेनी घेतली होती..

“ गंगा अरे तुझ्या मुलीला 10/10 गुण मिळाले. शाळेच्या इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर लिहलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत Mother’s Day निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित  केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवण्याचे ठरवलेयं. आपल्या मुलांना वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेम आणि समर्पण करणाऱ्या  व्यक्तिचा सन्मान आहे हा. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला Appreciate केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही, आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा….खरंतर एका अर्थाने बागशिल्पकारच तू. A  Gardner…. बागेतील झाडांची काळजी घेतोस,जपतोस.  एवढच नाही तर  तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन, पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोयस……

“So Ganga ….. will you be the chief guest for tomorrow’s event?”

—समाप्त

लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झपूर्झा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? झपूर्झा ? सौ राधिका भांडारकर ☆

शब्द गोठले. शब्दच तुटले. शब्दातीत आहे सारे. शब्दाविना, शब्दां पलीकडले..

अथांग समुद्राच्या शांत किनाऱ्यावर मुलायम वाळूत, एका झपुर्झा अवस्थेतच मी बसले होते. आणि पलीकडे क्षितिजावर, मावळतीला सूर्याची घागर हळूहळू कुठेतरी अज्ञातात बुडत होती.  अथांग आभाळात संध्या रंग उजळले होते. वार्‍याच्या झोताने मुठीतले  वाळूचे कण घरंगळत होते आणि बगळ्यांची माळ आकाशात मुक्तपणे विहरत होती.  खरोखरच हे सारं मनावर झिरपत असतानाची ही अवस्था शब्दातीत होती. अव्यक्त होती. शब्दां पलीकडची ती केवळ एक अनुभूती होती.

मातेला मुलाचे  मन न सांगताच कळते. त्याची भूक, त्याचा आनंद, त्याचं भावविश्व, त्याचा राग, त्याची व्यथा, त्याचा ताण, तिला न सांगताच कसे कळते? कारण हे वात्सल्याचं नातं शब्दांपलीकडचं असतं.तिथे संवादाची  गरजच नसते.

भक्ताचा ईश्वराशी घडणारा संवाद— हा सुद्धा शब्दाविना असतो.तो निर्गुण असतो.अंतराचा अंतराशी झालेला, शब्दांपलीकडे घडलेला एक भावानुभव असतो.

व्यक्त होत नाही ते अव्यक्त. आणि जे अव्यक्त असतं ते शब्दांशिवायच बोलत असतं.

एखादी नजर, एखादा स्पर्श, एखादीच स्मितरेषा, किंवा अर्धोन्मीलित अधर, भावनेचा कितीतरी मोठा आशय, शब्दाविनाच भिडवतो.  या शब्दांच्या पलीकडलं हे मौन असाधारण असतं. ती फक्त एक अनुभूती असते. ती अनेक रंगी ही असते. रागाची, लोभाची, प्रेमाची, क्रोधाची, भयाचीही. शब्दांत वर्णन करता येत नसली तरी  तिचं अंत: प्रवाहाशी नातं असतं. उमटलेले नुसते तरंग असले, तरी खूप खोलवर परिणाम करणारे असतात.

पन्नास वर्षानंतर, मला माझा बालमित्र अचानक भेटला.  सगळा ताठरपणा संपलेला, संथ, वाकलेला, दाट काळ्याभोर केसांच्या जागी काही चंदेरी कलाबूतच फक्त ऊरलेली. मी ही त्याला तशीच दिसले असेल ना? पण धाडकन् , समोरा समोर आल्यावर,  डोळ्यातल्या नजरेनं आणि ओठातल्या हास्याने तो पन्नास वर्षाचा काळ आक्रसून गेला. न बोलताच पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींचा एक मूकपट सहजपणे क्षणात उलगडून गेला.

“कशी आहेस?”

“बरी आहे.”

या पलीकडे शब्द जणू संपूनच गेले.पण त्या भेटीतला आनंद हा केवळ शब्दांच्या पलीकडचा होता.

आमचं नातं आता शब्दांपलीकडे गेलंय असं म्हणताना, त्यांना त्यातला घट्टपणा, अतूट बंध, विश्वासच जाणवतो. शब्दांपलीकडे याचा अर्थ अबोला नव्हे.मौनही. नव्हे तर एक अबोल, मूक समंजसपणा. जाणीव. खोलवर वसलेल्या प्रेमाची ओळख.

तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला निसर्गातले निश:ब्द संवादही ऐकू येतील. पक्ष्यांचं झाडांशी नातं, चंद्राचं रोहिणीशी नातं, धरणीचं पर्जन्याशी नातं, नदीचं सागराशी नातं, सागराचं किनार्‍याशी नातं, फुलाचं भ्रमराशी  नातं, चकोराचं चांदण्याशी नातं, कमळाचं चिखलाशी नातं. शब्द कुठे आहेत? पण नातं आहे ना? हेच ते शब्दांच्या पलीकडचं नातं!

दूर गावी गेलेल्या आपल्या धन्याला, त्याची निरक्षर कारभारीण, एक पत्र लिहिते. आणि जेव्हां तो,  ते पत्र उघडून पाहतो, तेव्हा त्यात फक्त एक कोरा कागद असतो. या कोर्‍या कागदाला सुकलेल्या बकूळ फुलांचा वास असतो. धन्याच्या पापण्या चटकन ओलावतात आणि तो त्या कोऱ्या कागदाचे चुंबन घेतो.

शब्द खोटे असतात. शब्द बेगडी असतात. शब्द पोकळ असतात. शब्द वरवर चे असतात. पण जे शब्दांच्या पलीकडे असतं, ते नितळ पाण्यासारखं, स्वच्छ स्फटिका समान  हिरव्या पाना सारखं, ताजं टवटवीत आणि खरं असतं.

म्हणूनच ….  शब्दांवाचूनी कळते सारे शब्दांच्या पलीकडले..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्यकथन ! ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ सत्यकथन ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.

आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !! 

दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!

अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.

मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.

अशी ती माणसं. हुशार आणि चतुर!

️️️️️©  सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #143 ☆ व्यंग्य – जल-संरक्षण के व्रती ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य  ‘जल-संरक्षण के व्रती’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 143 ☆

☆ व्यंग्य – जल-संरक्षण के व्रती

दशहरा मैदान में जल-संरक्षण पर धुआँधार भाषण हो रहे थे। बड़े-बड़े उत्साही वक्ता और विशेषज्ञ जुटे थे। कुछ गाँवों, शहरों में ‘वाटर हार्वेस्टिंग’ की बात कर रहे थे, कुछ पुराने टाइप के फटकारदार कुल्लों का त्याग करने की गुज़ारिश कर रहे थे। कुछ टॉयलेट में कम पानी बहाने का सुझाव दे रहे थे। कुछ की शिकायत थी कि स्त्रियाँ अमूमन ज़्यादा नहाती हैं और केश धोने में अधाधुंध पानी खर्च करती हैं, इसलिए जल- संरक्षण की दृष्टि से सभी स्त्रियों को अपने बाल छोटे करा लेना चाहिए। इससे जल की बचत होने के साथ-साथ वे आधुनिका भी दिखेंगीं। इससे घरेलू हिंसा भी कम होगी क्योंकि पति महोदय आसानी से पत्नी के केश नहीं गह सकेंगे। एक साहब ने क्रान्तिकारी सुझाव दिया कि भारत में टॉयलेट के भीतर ‘टॉयलेट पेपर’ का उपयोग कानूनन अनिवार्य बना देना चाहिए और वहाँ पानी बहाने वालों को जेल भेजना चाहिए।

यह भी सुझाव आया कि जैसे फौज में दारू का कम उपभोग करने वाले जवानों के अफसरों को पुरस्कृत किया जाता है वैसे ही शहरों में साल भर में पानी का न्यूनतम उपयोग करने वाले परिवारों को पुरस्कृत और सम्मानित किया जाना चाहिए और इसके लिए तत्काल जाँच- प्रक्रिया का निर्धारण किया जाना चाहिए।

इस सभा में मंच पर दूसरी पंक्ति में चार महानुभाव आजू बाजू विराजमान थे। बढ़ी दाढ़ी और मैले-कुचैले कपड़े। लगता था महीनों से शरीर को जल का स्पर्श नहीं हुआ। उनके आसपास बैठे लोग नाक पर रूमाल धरे थे।

अन्य वक्ताओं के भाषण के बाद संचालक महोदय बोले, ‘भाइयो, आज हमारे बीच चार ऐसी हस्तियाँ मौजूद हैं जिन्होंने अपने को पूरी तरह जल-संरक्षण के प्रति समर्पित कर दिया है। इन्होंने अपने व्रत के कारण समाज से बहुत उपेक्षा और अपमान झेला, लेकिन ये अपने जल-संरक्षण के व्रत से रंच मात्र भी नहीं डिगे। ज़रूरत है कि अपने उसूलों के लिए जीने मरने वाली ऐसी महान विभूतियों को समाज पहचाने और उन्हें वह सम्मान प्राप्त हो जिसके ये हकदार हैं। अब आपका ज़्यादा वक्त न लेकर मैं इन चार जल- संरक्षण सेनानियों में से श्री पवित्र नारायण को आमंत्रित करता हूँ कि वे माइक पर आयें और अपने साथियों के द्वारा जल-संरक्षण के लिए किये गये कामों पर विस्तृत प्रकाश डालें।’

नाम पुकारे जाने पर जल-संरक्षण के पहले सेनानी पवित्र नारायण जी सामने आये। उनके दर्शन मात्र से दर्शक धन्य हो गये। चीकट कपड़े, हाथ-पाँव पर मैल की पर्तें, पीले पीले दाँत और आँखों में शोभायमान कीचड़। दर्शक मुँह खोले उन्हें देखते रह गये।

पवित्र नारायण जी माइक पर आकर बोले, ‘भाइयो, आज मुझे और मेरे कुछ साथियों को आपके सामने आने का मौका मिला, इसके लिए हम आज के कार्यक्रम के आयोजकों के आभारी हैं। मैंने और मेरे साथियों ने जब से होश सँभाला तभी से हम जल-संरक्षण में लगे हैं, लेकिन हमें अफसोस है कि दुनिया ने हमें हमेशा गलत समझा है। इस कार्यक्रम में आने के बाद हमारे मन में उम्मीद जगी है फिर हमारे काम को समझा और सराहा जाएगा।

‘भाइयो, हमारी जल-संरक्षण की प्रतिबद्धता इतनी अडिग है कि हम कई साल से तीन-चार मग पानी में ही अपनी दिन भर की क्रियाएँ संपन्न कर रहे हैं। न हमें स्नान का मोह है, न कपड़े चमकाने का। पानी की बचत ही हमारे जीवन का एकमात्र लक्ष्य है। कुछ लोग इस गलतफहमी का शिकार हो जाते हैं कि हम स्वभावतः गन्दे हैं, लेकिन यह सच नहीं है। हम यहाँ इस उम्मीद से आये हैं कि कम से कम आप लोग हमें सही समझेंगे और हमारे काम और त्याग को महत्व देंगे।’

इतना बोल कर उन्होंने जनता की तरफ देखा कि उनके वक्तव्य पर ताली बजेगी, लेकिन वहाँ तो सबको साँप सूँघ गया था।

जनता में माकूल प्रतिक्रिया न देख पवित्र नारायण जी ने अपने तीनों साथियों को जनता के सामने ला खड़ा किया। बोले, ‘भाइयो, इस जल-संरक्षण अभियान में शामिल अपने तीन साथियों का परिचय कराता हूँ। ये धवलनाथ हैं। इनके हुलिया से ही आप समझ सकते हैं कि इन्होंने कितनी ईमानदारी से अपने को जल-बचत अभियान में झोंक रखा है। ये पानी की एक बूँद को भी ज़ाया करना हराम समझते हैं। लेकिन विडम्बना देखिए कि इनकी दस साल पहले शादी हुई और बीवी दूसरे ही दिन इस महान आदमी को छोड़कर चली गई। तब से उसने इधर का रुख नहीं किया। धवलनाथ जी का जज़्बा देखिए कि इस हादसे के बाद भी वे अपने मिशन में तन मन से लगे हैं।

‘और ये हमारे एक और साथी सुगंधी लाल हैं। आप देख सकते हैं कि इनकी उम्र ज्यादा नहीं है, लेकिन ये भी पूरी तरह हमारे मिशन को समर्पित हैं। अपने उद्देश्य के लिए इनका त्याग भी ऊँचे दर्जे का है। पिछले चार-पाँच सालों में इनको चार पाँच बार इश्क हुआ, लेकिन हर बार एक दो महीने में ही इनकी महबूबा ने इन से कन्नी काट ली। शिकायत वही  घिसी-पिटी है कि ये नहाते- धोते नहीं हैं। इसके जवाब में हमारे भाई सुगंधी लाल जी पूछते हैं कि जब मजनूँ, फरहाद, रांँझा और महीवाल इश्क फ़रमाने निकलते थे तो क्या वे रोज़ नहाते थे? महीवाल ज़रूर मजबूरी में नहाते होंगे क्योंकि कहते हैं कि वे दरया में तैर कर अपनी महबूबा से मिलने जाते थे, लेकिन बाकी महान प्रेमियों के नहाने का कोई प्रमाण उपलब्ध नहीं है। जो भी हो, अब भाई सुगंधी लाल ने मुहब्बत जैसी फिजूल बातों से मुँह मोड़ लिया है और पूरी तरह जल-बचत अभियान में डूब गये हैं। लोग कहते हैं कि इन्हें ‘हाइड्रोफोबिया’ है। बात सही भी है, लेकिन यह कुत्ते को काटने वाला हाइड्रोफोबिया नहीं है। इन्हें आपके आशीर्वाद की ज़रूरत है।’

पवित्र नारायण जी ने अपने आखिरी साथी का परिचय कराया, कहा ‘ये हमारे बड़े समर्पित साथी शफ़्फ़ाक अली हैं। इनके साथ यह जुल्म हो रहा है कि लोगों ने इनके मस्जिद में घुसने पर पाबन्दी लगा दी है। कहते हैं ये नापाक हैं। लेकिन भाई शफ़्फाक अली अपने उसूलों पर चट्टान की तरह कायम हैं। इनका कहना है नमाज़ तो कहीं भी और कैसे भी पढ़ी जा सकती है। उसके लिए मस्जिद की क्या दरकार?’

उपसंहार के रूप में पवित्र नारायण बोले, ‘तो भाइयो, मैंने जल-संरक्षण में पूरी तरह समर्पित इन साथियों से आपका परिचय कराया। हमारी इच्छा है कि समाज और सरकार हमारे काम को तवज्जो दे और हमें स्वतंत्रता-संग्राम सेनानियों के बराबर दर्जा दिया जाए। हमें प्रशस्ति-पत्र मिले और हमारे लिए पेंशन मुकर्रर हो। इसके अलावा जो लोग हमसे अछूतों जैसा बर्ताव करते हैं उन्हें छुआछूत कानून के अंतर्गत दंडित किया जाए। हमें पूरी उम्मीद है कि हमारी आवाज सरकार के कानों तक पहुँचेगी और हमें हमारी कुरबानी के हिसाब से सम्मान और पुरस्कार मिलेगा।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈