मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 100 – अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य # 100 ?

☆ अष्टविनायक…! 

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….!

 

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….!

 

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….!

 

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….!

 

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…!

 

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….!

 

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….!

 

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….!

 

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात निनादतो

मोरयाचा एक सूर….!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फरक… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? कवितेचा उत्सव ?

☆ फरक…. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बोलण्यास्तव गोड त्यांनी तिळगुळ वाटला

सहज जगण्यात अमुच्या गोडवा

नकळत दाटला

 

अपेक्षेने स्वार्थ सिद्धी च्या त्यांनी उपवास  ही धरीयला

उपाशी नको पोरे म्हणुनी माऊलीने तो सहज घडविला

 

दिसण्या सुंदर त्यांनी घाम ही गाळला

तडजोडीत जीवनाच्या आम्ही

नकळत तो ढाळला

 

शेकण्यास्ताव हात त्यांनी  होळ्या भडकविल्या

आम्ही कवडश्याच्या प्रकाशाने

मशाली पेटविल्या

 

मिरविण्या स्व त्यांनी किती भूमिका वठवील्या

जगता जगता सहजतेने आम्ही

माणूसच घडविला

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 120 ☆ वृत्त – मेनका ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 120 ?

☆ वृत्त – मेनका ☆

 मी अशी का गोंधळाया लागले

बोल माझे अडखळाया लागले

 

वाट माझी वेगळी होती तरी

का बरे इकडे वळाया लागले

 

मेनका मोठी अनोखी अप्सरा

कन्यकेला आकळाया लागले

 

तू तिथे आहेस एकाकी जरी

चंद्र तारेही जळाया लागले

 

लावल्या पैजा जरी त्यांनी किती

मोल त्याचेही ढळाया लागले

 

वेगळी आहे कहाणी आपली

शेवटी आता कळाया लागले

 

ठेव तू बांधून पाण्याला तिथे

डोह आता खळखळाया लागले

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोणते मी गीत गावे… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कोणते मी गीत गावे … ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

मोकळ्या केसात सखये चांदणे माळून यावे

आणखी स्वप्नात माझ्या तू मला भेटून जावे

 

वाजणा-या पावलांच्या चाहुलीने जाग यावी

स्वागतासाठी तुझ्या मी दीप सारे पेटवावे

 

थांबुनी दारात थोडी घाल ना मज साद वेडे

तू मला दिसताक्षणी मी मोग-याचे फूल व्हावे

 

या धरेच्या हिरवळीची पाखरांना भूल पडली

खेळ मांडाया निघाले मोकळ्या रानात रावे

 

बंधने तोडून सारी ये मला भेटायला तू

कोरुया मग काळजावर फक्त दोघांचीच नावे

 

काय मागावे जगाला हेच आहे एक कोडे

जिंदगीच्या दोन घटका भोगुनी येथे मरावे

 

आठवांच्या रागदारी संगीताचा मी भुकेला

प्रश्र्न पडतो या मनाला कोणते मी गीत गावे

 

 © श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 125 ☆ सुगंधाचा लळा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 125 ?

☆ सुगंधाचा लळा ☆

भेटल्यावर भेटायचे ना कडकडून

घेतलेही असते तुला मी सावरून

 

मीच वेड्यासारखी का वागते इथे

शिशिरात ही येते अशी मी मोहरून

 

कंठ फुटला पंख फुटले कोकिळ गातो

मोहराचा गंध येतो झाडावरून

 

तृप्त तृष्णा ढेकळाची नाही झाली

मेघ गेला फसवून हा दारावरून

 

एकांताच्या वाटेवर दोघे आपण

जायला पाहिजे होते काही घडून

 

लागो सुगंधाचा लळा तुला असा की

घेऊन जावीत सुमने माझ्याकडून

 

एक काटा काय इतका टोचला तुला

आलाच नाही तू पुन्हा मागे फिरून

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिदी ssss… (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ दिदी ssss…  (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अशोकाच्या वाटेवर,

कुणी पसरला शोक?

टोचे देठानाच आता,

पाकळ्यांचे तीक्ष्ण टोक!

 

तुझे जाणे ना सामान्य,

आनंदाचा हा युगांत!

संवादिनीला असह्य,

तिच्या भात्याचा आकांत!

 

मंगेशाच्या मंदिरात,

देई हुंदका ओंकार!

घंटा बडवूनसुद्धा,

तिचा गोठला झंकार!

 

कुणी कुणाचे सांत्वन,

आता करायाचे सांग?

आसवांच्या पाठीमागे,

उभी हुंदक्यांची रांग!

 

कोणताही भाव नाही,

तुझ्या गाण्यातून वर्ज!

पिढ्यापिढ्याना हवेसे,

तुझे सप्तसुरी कर्ज!

 

दुस्वासाने “लता” शब्द,

उलटाही केला तरी!

तोही “ताल होतो आणि,

येई संगिताच्या घरी!

 

भैरवीचा फुटे बांध,

हमसून रडे नांदी!

साती स्वर वेडेपिसे,

शोधतात त्यांची दिदी!

 

मंगेशीच्या गाभाऱ्यात,

ज्योत स्फुंदे समईत!

अभिषेकही तुटक,

धार विसरली रीत!

 

वाट पाही दिनानाथ,

त्यांच्या लेकीची स्वर्गात!

तीही चालली तृप्तीत,

अलौकिक स्वर गात!

 

आज क्षितिजावरती,

सूर्य उगवला नाही!

गेल्या तमात बुडून,

आंधळ्याच दिशा दाही!

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कसे? ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कसे? …  ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कसे देऊ दान तुला

हात माझे रिते रे…

कसे ढाळे अश्रू तरी

नेत्र झाले कोरडे रे…

कशी काढावी समजूत

ओठ माझे बंद रे…

कशी येऊ तुजसमोर

पायी साखळदंड रे…

काय बोलू तुजसवे

शब्द झाले मुके रे…

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 69 ☆ शृंगारिक… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

 

? साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 69 ? 

शृंगारिक… ☆

सखे अवखळ तू, अल्लड मोहक तू

तुझी काया प्रिये,  वसंताचा बहार तू

 

सुरेख तुझी कांती,  सुरेख तुझा बांधा

तुला पाहुनी मग,  मला झाला प्रेमबाधा

 

तुझे केस रेशमी,  त्यात तो गजरा

गजरा खुणावतो,  ये जरा सामोरा

 

गुलाबी तुझे ओठ, जसे डाळिंब पिकले

पिकून डाळिंब, आपोआप जसे फुटले

 

गोबरे गोबरे गाल,  नाजूक त्यावर खळी

स्मित तुझे हास्य,  गेला माझा बळी

 

गोरे गोरे नाजूक पाय,  मंद मंद त्याची चाल

ठुमकत आली जेव्हा,  मिठी मारावी खुशाल

 

एक आणले पैंजण,  तुझ्याच सारखे मस्त

पैंजण बांधताना पायात,  लाजली तू जास्त

 

अशी तू मंदाकिनी, तारुण्यात मुक्त बहरली

तुझ्यात अलवार माझी,  प्रीती बहू जडली

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३४ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३४– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१५३]

जेव्हा पान प्रेम करतं

तेव्हा फूल  होतं त्याचं

आणि

जेव्हा फूल पूजा करतं

तेव्हा फळ होतं त्याचं.

 

[१५४]

साचून आहे तुझ्यावर

धूळच धूळ…

नीरव शांततेच्या

शुद्ध प्रवाहात 

धुवायलाच हवा एकदा

तुझा आत्मा

 

[१५५]

हळुवार झुळूक येते

आणि किती स्पष्टपणे

जाणवून जातो

ईश्वरी शक्तीचा परमस्पर्श

वादळामधून

कधीही न जाणवणारा.

 

[१५६]

साधंसुधं शुभ्रपांढरं

प्रकाशवस्त्र

लेऊन येतो सूर्य

आणि हे वेडे ढगच कसे

लगडून जातात

रंगारंगाच्या

भपकेदार दिमाखानं 

 

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोक्षमंत्र ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मोक्षमंत्र ☆ श्रीशैल चौगुले ☆

तरिही विठ्ठल’ पावतोच

रोज नव्या सूर्योदयात

कितीही झाला सूर्यास्त

क्षितीजात .

विठ्ठल म्हणजे काळी शिवपिंड

कर्मयोगाने भरलेले ब्रम्हांड.

काळोखात दाखवेल रस्ता

जगण्याला ऊजेड

तो काळा पांडुरंग.

कर कटेवर ठेऊन

आशिर्वाद देत ऊभा

पंचमहाभूतास संजीवनी देत.

याकरिताच अनुभवावी

एक तरी वारी

संतांची ओवी कळण्यासाठी

या दशेद्रिंयांची टाळून

प्रदक्षिणा,

आणि नाचावे अभंगात

संतश्लोकांच्या आत्मरंग

रंगवून,चंद्राभागेच्या स्नानात

व्हावे मन शुध्द

गजराचा नाद घुमवीत

टाळ-मृदुंगात

“राम-कृष्ण-हरी”च्या.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares