मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगले तुझ्याच रंगात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रंगले तुझ्याच रंगात…  ? श्री आशिष बिवलकर 

रंगूनी रंगले,

तुझ्याच साऱ्या रंगात!

रंगवले हे मन माझे,

प्रेमळ सहवासाच्या ढंगात!

 

डोळ्यांच्या पापण्यांना,

तुझीच लागते रे आस!

उघडता तूच, मिटता तूच,

तुझाच होतोय भास!

 

गंध ही तूच, सुगंधही तूच,

दरवळे तुझाच सुवास!

माझे मी कुठे रे उरली आता,

तुझ्याच साठी घेतेय श्वास!

 

हरवले मी भान,

एकटीच गालात हसते!

गालावरच्या खळीत,

कळी तुझीच खुलते!

 

आरसाही कुठे राहिला माझा,

त्यात तूच मला रे दिसतोस!

माझे प्रतिबिंबही हरवले आता,

दर्पणातही हसतांना भासतोस!

 

लावलेस वेड तुझे तू मला,

देशील ना रे आयुष्यभराची साथ!

तुझ्या प्रेमाच्या समईतील,

प्रकाश देणारी असेल मी रे वात!

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

तडफड झाली बंद क्षणात

चोचीमधला होता घास

पकड एवढी घट्ट आपसूक

जीव जाई गुदमरून श्वास —

*

दोघांचे डोळे जवळजवळ

भक्ष्याचा आनंद एका नेत्री

भयभीत भाव दुज्या डोळी

मरणच या क्षणाची खात्री — 

*

जीवो जीवस्य जीवनम्

इथे तिथे निसर्गात चाले

मान्य असते आपणा परंतु

होतातच ना डोळे ओले! — 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ सारे फक्त जगण्यासाठी… ☆ सुश्री त्रिशला शहा

कुटूंब कबिला चालविण्या

पोटासाठी हा धंदा डोंबाऱ्याचा

*

गाण्याच्या तालावरती

नाचनाचते दोरीवरती

*

अपेक्षा काही जास्त नाही

भुकेपुरती मिळावी भाकरी

*

एक दोन रुपये मिळविण्यासाठी

जीवघेणा खेळ खेळते मी

*

आज इथे तर उद्या तिथे

डोंबाऱ्याचे जगणे फिरतीचे

*

कष्ट उपसते जगण्यासाठी

बालपण मज माहित नाही

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाईपण भारी देवा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बाईपण भारी देवा…  ? श्री आशिष बिवलकर 

बाईपण भारी | असतेच देवा |

जपतेच ठेवा | संस्कारांचा ||१||

*

बाईपण देते | पुरुषास बळ |

सोसतेच कळ | अंतरीची ||२||

*

बाईपण मनी | आभाळाची माया |

झिझवते काया | संसारात ||३||

*

बाईपण झाके | हृदयात दुःख |

दाखवते सुख | इतरांसी ||४||

*

बाईपण अंगी | दुर्गा अवतार |

करते संहार | दुर्जनांचा ||५||

*

बाईपण देखे | स्वप्न स्वराज्याचे |

यश शिवबाचे | जिजाऊत ||६||

*

बाईपण दावी | सामर्थ्याची दिशा |

जगण्याची आशा | उमेदीने ||७||

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆

श्री रविंद्र सोनवणे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्त्री शक्ती? ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆

हरेन मी पुन्हा पुन्हा 

जिंकेन परी मी शेवटी 

यत्न ना सोडेन कधी

असले जरी मी एकटी ||

*

अबला न मी, कृतीशील मी

गंभीर पण खंबीर मी

ओझे आहे खांद्यावरी

आकाशही पेलेन मी ||

*

ध्येयधुंदी अंतरी

उत्साह मज बेबंद आहे

संकटांना नमविण्याचा

मज अनोखा छंद आहे ||

*

कोण मजला अडवितो

तटबंदीही भेदेन मी

दश दिशा मज मोकळ्या 

सगळीकडे विहरेन मी ||

*

ढासळणारे धैर्य सावरुन

कोसळताना उठते मी

वैफल्याच्या धुक्यातूनही

क्षितिजा पल्याड बघते मी ||

*

गर्व आहे मज स्त्री शक्तीवर

पर्व नवे अनुभवते मी

अवश्य या आशीष द्यावया

सिद्ध आहे स्वागतास मी ||

© श्री रविंद्र सोनवणे

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

भ्रमणध्वनी : ९२२२०५३४३५/८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सहावे इंद्रिय… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ सहावे इंद्रिय… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पंचेंद्रियाचे शरीर आपले

सहावे इंद्रीय जडले गेले

हातामधूनी प्रवेश करूनी

मेंदुवर सत्ता करते झाले

*

हे नवे सहावे इंद्रिय

 मन देहावर गारूड करते

 नुकसान होते कळे मेंदूला

अवयवास कळते नच वळते

*

 मेंदूला प्रवृत्त करण्यासाठी

 सतत नवनव्या आणि गोष्टी

 खिळवुन ठेऊन आपल्याशी

 चांगुलपणाची करतो पुष्टी

*

विचार करूनी वापर करता

 उपयुक्तपणा पुष्कळ आहे

 अती तिथे माती म्हणीचा

 प्रत्यय या इंद्रियाही आहे

*

सहावे इंद्रिय मानलेच तर

दुज्या इंद्रिया हानी नसावी

शरीर मनाच्या आरोग्यास्तव 

इंद्रियांची वागणूक असावी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

आई मूल नाते गोड 

माय जगे बाळासाठी 

साऱ्या विश्वाच्या सौख्याला 

बांधी त्याच्या मनगटी ||

*

ठेच लागता बाळास 

कळ माऊलीच्या उरी 

नाही आईच्या मायेस 

कशाचीही बरोबरी ||

*

तिचा काळीज तुकडा

येई ग नावारूपाला 

लेक कर्तृत्वसंपन्न 

नेई जपून आईला ||

*

आई मुलाच्या नात्याची 

अदलाबदल होते 

एका पिढीचे असे हे 

आवर्तन पूर्ण होते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – महादेव शिवशंकर… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? महादेव शिवशंकर... ? श्री आशिष  बिवलकर ☆

सर्व देवांच्यात सर्वश्रेष्ठ,

असती हर हर महादेव!

सृष्टीचा तारणहार,

शिवस्तुती करावी सदैव!….. १

*

पत्नी पार्वती,

पुत्र कार्तिकेय -गणपती ! 

पुत्री अशोक सुंदरी,

भक्तांच्या हाकेला धावती!…. २

*

शिरी चंद्रकोर धारण,

हातात त्रिशूल डमरू! 

नंदीवर होई स्वार,

भोलेनाथ बाबा अवतरू!….. 3

*

जटातून वाहे गंगा,

म्हणती कुणी गंगाधर!

कंठात हलाहल केले प्राशन,

नीळकंठ परमेश्वर !….. ४

*

चिताभस्म नित्य लावे,

कंठाभोवती वासुकी नाग!

व्याघ्र चर्मावर बैसे,

त्रिकाळाची असे जाग!….. ५

*

त्रिनेत्र सामर्थ्य शिवाचे,

पाही भूत, भविष्य, वर्तमान!

तांडव नृत्य करून,

नृत्यात नटराज सामर्थ्यवान!….. ६

*
त्रिदल बेल वाहता,

होई भोलेनाथ प्रसन्न!

मनोप्सित वर देऊन,

भक्तांना करी धन्य!….. ७

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वार्थातूनपरमार्थ… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ स्वार्थातूनपरमार्थ… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कुणब्याचा जीव साधाभोळा

मातीत रंगतो जीवन सोहळा

मातीत राबतो उन्हात नाहतो

तण काढाया कमरेस विळा

*

 मायेने करतो माती मशागत

 बीज पेरायाचे तया भूगर्भात

 बीज पेरता नभा विनवणी

 पाड अंबरा पाऊस शेतात

*

 चरितार्थार्थ राबे दिनरात

 स्वार्थातून साधे इथे परमार्थ

 अन्नदात्याच्या कष्टाने घास

 विश्व मानवजाती मुखात

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मधुबाला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

 सुश्री शीला पतकी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “मधुबाला…” ☆  डॉ. शैलजा करोडे

ठाऊक नाही यातील काही /

गोड गोड मधुबाले /

तुझ्या हृदयाला यौवनात ग /

छेद कशाने झाले//

*

कुरळे कुरळे केस तुझे हे/

असंख्य त्यातील वाटा /

कितीक गुंतले किती हरवले/ 

चेहऱ्यावरच्या बटा //

*

मोहक सुंदर दंतपंक्ती ती /

रसरशीत ओष्ठ कमान /

नयन निरागस बालकापरी /

तरी यौवनाचे आव्हान //

*

जीवणी मोहक जीवघेणी ती /

आरक्त गाल ते छान/

 भुवयांची ती महिरप सुंदर /

वर सुंदर भव्य कपाळ//

*

कित्येकाने स्वप्नात ठोकले/

 तव हृदयाचे द्वार /

त्या साऱ्यांच्या ठोक्यांनी मग /

झाले छिद्र तयार? //

*

जीवघेणी ही ठोकाठोकी/ 

हृदयस्पंदने चुकली /

अन रसिकांचा ठोका चुकून /

मृत्यू पुढे ही झुकली//

*

नको आभूषण नको विशेषण/ 

तुझ्यासारखी तूच /

देवाने ही पुन्हा न केले/

 कॉपी-पेस्ट हे रूप //

*

पुन्हा न होणे ऐसे रूपडे /

पुन्हा न ऐसा भाव/

 सौंदर्याला समान शब्द हा /

मधुबाला हे नाव!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares