भारतीय साहित्य व संस्कृती मंच, बीड यांचेतर्फे आयोजित मुक्तकाव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखक व कवी श्री.रविंद्र सोनावणी यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
💐 ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्री.रविंद्र सोनावणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
घड्याळात पाच वाजले तसे हातातले पुस्तक बाजूच्या टेबलवर ठेऊन रावसाहेब उठले आणि किचन मध्ये जाऊन बारीक गॅसवर चहाचे आदण ठेवले. बाथरूममध्ये जाऊन हात-पाय, तोंड धुतले आणि बेसिनवर अडकवलेला नॅपकिन घेऊन तोंड पुसत गॅसच्या कट्ट्याजवळ आले. चहाला उकळी फुटली होती. त्यांनी फ्रीज मधील दुधाच्या पातेल्यातून अर्धा कप दूध छोट्या पातेल्यात घेऊन दुधाचे पातेले परत फ्रीजमध्ये ठेवले आणि छोटे पातेले गॅसवर ठेवले. . दूध साधारण गरम झाल्यावर त्यात उकळी फुटलेल्या चहाच्या पातेल्यातील अर्धा कप कोरा चहा ओतला आणि चांगला उकळल्यावर कपात गाळून घेऊन ते बाल्कनीत आले. रोजच्याप्रमाणे बाल्कनीतल्या आरामखुर्चीत चहाचे घोट घेत बसून राहिले
नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या या बाल्कनीतून समोर, वर पाहिले की फक्त आभाळच दिसायचे. . मावळतीला कळलेला सूर्य दिसायचा. . ही बाल्कनी त्यांना खूप आवडायची पण ती मुलाच्या मास्टरबेडरूमची बाल्कनी असल्याने ते फक्त याच वेळी बाल्कनीत घडीभर बसायचे. या टू बीएचके फ्लॅट मधील त्यांच्या बेडरूमलाही छोटी बाल्कनी होती. त्यांच्या मुलाने तिथेही त्यांच्यासाठी छानशी आराम खुर्ची आणून ठेवली होती. पण ती बाल्कनी रस्त्याच्या दिशेला होती. समोर दुसरी इमारत झालेली होती अकरा मजल्याची. . त्या बाल्कनीतून खाली बघितले की रस्ता दिसायचा. . वर्दळ दिसायची आणि समोर, वर पाहिले की इमारत. आणखी वर पाहिल्यावर दिसणारे समोरच्या इमारतीच्या वरचे तुटपुंजं आकाश बघायला त्यांना आवडायचे नाही.
त्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर काही वेळाने घड्याळात पाहिलं. सहा वाजत आले तसे ते कप घेऊन उठले. बाल्कनीचे काचेचे सरकते दार लावले. मास्टर बेडरूमचे दार ओढून घेतले. सिंकपाशी येऊन स्वतःचा कप, छोटे पातेले आणि गाळणे स्वच्छ धुवून कट्ट्यावर पालथे घातले. कोऱ्या चहाचे पातेले झाकल्याची, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लावल्याची खात्री केली. रुममध्ये जाऊन दरवाजामागे अडकवलेला विजार- सदरा घातला आणि पलंगाजवळच उभी टेकवून ठेवलेली काठी घेऊन बाहेर पडले. बाहेर पडताच फ्लॅटचे दार ओढून घेतले. . पुन्हा आत ठकलून लॅच लागल्याची खात्री करून घेतली आणि काठीचा हलकासा आधार घेत चालू लागले. साऱ्या गुळगुळीत फरशा. . काठीवर भार द्यावा तर काठीचा आधार मिळण्याऐवजी काठी घसरून पडण्याचीच भीती इमारतीतून चालताना नेहमीच त्यांच्या मनात तरळून जायची. . त्यामुळे ते सावध पावले टाकत चालायचे. . तशीच सावधानता बाळगत ते रोजच्या शिरस्त्यानुसार चालत, लिफ्टमधून खाली येऊन इमारतीबाहेर पडले आणि उजवीकडे वळून पदपथावरून चालू लागले.
रावसाहेब चालत चालत मैदानासमोर आले तसे पदपथावरून रस्त्यावर उतरून दोन्हीबाजूला पाहत रस्ता ओलांडून मैदानाच्या प्रवेशदारातून आत शिरले आणि त्यांनी नेहमीच्या बाकाकडे पाहिले. तिथे कोणीही बसलेले नाही हे पाहून त्यांच्याही नकळत त्यांना बरे वाटले आणि ते हळूहळू चालत येऊन त्या बाकावर बसले.
मुलांच्या खेळासाठी महानगरपालिकेने विकसित केलेले हे मैदान फ्लॅटपासून जवळच होते त्यामुळे ते रोज संध्याकाळी तिथं येऊन बसत. चार भिंतीबाहेरचा तो मोकळेपणा त्यांना हवाहवासा वाटे. मैदानात एकबाजूला बाग होती. . तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती. . भोवतीने झाडे होती त्याच्या सावलीत बसण्यासाठी बाके होती त्या बागेमध्येच ज्येष्ठाना फिरण्यासाठी वेगळा पथ निर्माण केला होता. तर या बागेला लागूनच मोठ्या मुलांना खेळण्यासाठी मोठं मैदानही होते. तिथे बऱ्याचदा क्रिकेट च्या मॅच ही होत असत. तिथेच हॉलीबॉलचे ग्राउंड ही होते. बाग व मैदान याच्या दरम्यान झुडपांचेच सुंदर कुंपण ही होते. रोजच्यासारखाच मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या क्रिकेट पिच वर मोठ्या मुलांचा क्रिकेटचा खेळ अगदी उल्हासात, जोशात चालू होता. त्यांचे फोर, सिक्स, आऊट, क्लिनबोल्ड, रन. . रन असे वेगवेगळे आवाज कधी स्वतंत्र तर कधी संमिश्र ऐकू येत होते.
फ्लॅटच्या चार भिंतीत स्वतःचाही आवाज फारसा न ऐकलेल्या त्यांना मुलांचे ते आवाज ऐकून बरे वाटले. त्यांनी बाकावर बसतानाच हातातील काठी बाजूला टेकून ठेवली आणि अवतीभवती नजर टाकली. त्यांच्या समोरच काही अंतरावर एक मुलगा एकटाच बॉलने खेळत होता. . दुसऱ्या कोपऱ्यात त्याच्याच वयाची तीन चार मुले गवतावरच बसली होती. त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या असाव्यात. . त्या मुलांच्याच मागच्या बाजूला जवळच असणाऱ्या बाकांवर बहुदा त्या मुलांच्या पालक असणाऱ्या महिला बोलत बसल्या होत्या.. पण बोलत असतानाही अधून मधून त्या मुलांकडे लक्ष देत होत्या. . मधूनच कुणीतरी. . ‘ नो नो बेटा. . ‘ असे काहीतरी म्हणत, काहीतरी सुचवत सांगत होत्या.
हे सारे पाहताना त्यांच्या मनात आले ‘, पालकांच्या नजरेच्या पिंजऱ्यात खेळण्याचा किती आणि कसा आनंद मिळत असेल या मुलांना ? वारा पिलेल्या वासरासारखे मुक्त, मोकळे हुंदडणे या मुलांना माहीत तरी असेल का ? ” त्यांना गावाकडच्या मुलांचे खेळणे, हुंदडणे आठवले आणि त्यांच्या मनात गावाकडच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.
झोपाळ्यावर कधी लिहीन असे वाटले नव्हते मला. लहानपणापासूनचा तो जिवलग मित्रच होता आमचा.
माझ्या माहेरी, खूप मोठा, शिसवी लाकडाचा गुळगुळीत मोठा झोपाळा माजघरात होता.
मोठा वाडा होता आमचा. शाळेतून आलो की दप्तर टाकले की बसलोच झोपाळ्यावर.
खाणे तिथेच.पुस्तके वाचणे तिथेच. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी झोपाळ्यावर बसायलाच माझ्या घरी यायच्या.
माझी आजी फार हौशी. तिने छान गादी करून घेतली होती झोपाळ्याच्या मापाची.
मग तर मी रात्री झोपाळ्यावरच झोपू लागले. पायाने झोका घेत, अशी सुंदर झोप लागायची.
आजी आणि आई, दुपारची कामे झाली की टेकायच्या झोपाळ्यावर. मग त्यांचे दुपारचे निवडणे, टिपणे, शिवणे सगळे काही झोपाळ्यावरच.
माझ्या वडिलांना भारी हौस होती सगळ्या गोष्टींची. त्यांनी झोपाळ्याला चकचकीत पितळी कड्या बसवून घेतल्या होत्या. ते झोका फक्त अगदी हळू,फक्त मागे पुढे करत. आमच्या सारखा जोरात, आढ्याला पाय टेकतील असा झोका त्यांना आवडत नसे. आम्ही काय त्यांना दाद देणार.
ते गेले की चढाओढीने जोरात झोके घेत असूच. आमच्या गल्लीतली सगळी मुलं, मुली आमच्या घरी संध्याकाळी येत.
आमची खूप भांडणेही होत, झोपाळ्यावर बसण्यासाठी. तो बिचारा तरी एका वेळी किती मुलांना बसवणार ना.
मग आजी म्हणायची, ”अरे, भांडू नका– थोड्या थोड्या वेळाने सगळे बसा हं.”
ती भांडणे मिटायचीही लगेच. मग आजी सगळ्यांना छान खाऊ द्यायची.अजूनही मैत्रीण भेटली की विचारते,
“अग तुमचा झोपाळा आहे का ग अजून.काय भांडायचो ना आपण.”
मला आठवते, मराठीच्या पुस्तकातल्या कविता, झोपाळ्यावर बसून,जोरजोरात ओरडून म्हटल्यामुळे लगेच पाठ होत.
माझे मामे भाऊ उल्हास उदय पण, केवळ झोपाळा आवडतो म्हणून आमच्याकडे राहायला येत.
असेच दिवस मजेत जात होते. मी मग मेडिकल कॉलेजला गेले. तिथला अतिशय मोठा, आणि न संपणारा
अभ्यासही मी झोपाळ्यावर बसूनच केला. मला आठवते, दुसऱ्या दिवशी आमची viva असली की रात्र रात्र जागून मी झोपाळ्यावरच वाचत असायची.वडील मला चहा करून देत आणि मायेने म्हणत,” अग झोप जरा. होईल परीक्षा छान तुझी.’ माझ्या पोटात त्या व्हायवा चा मोठा गोळा आलेला असे. आई म्हणायची,”अग मस्त देशील बघ तुझी ओरल।झोप जरा.”
बघता बघता मी डॉक्टर झाले. सासरही माझं फार सुंदर होतं. खूप मोठी टेरेस होती त्या घराला–प्रशस्त ,ऐसपैस.
माझ्या वडिलांनी मला हौसेने, त्या गच्चीत, मोठा झोपाळा बसवून दिला. मला तर ब्रम्हानंद झाला.
माझी तान्ही मुलगी रात्री जागायची.तिला घेऊन मी कितीतरी रात्री झोपाळ्यावर काढल्या आहेत.
तीही त्या संथ लयीत लगेच झोपून जायची.
माझे हॉस्पिटल सुरू झाले. एखादी खूप अवघड प्रसूती करून आले की रात्री अपरात्री सुद्धा मी झोपाळ्यावर बसून चहा घेऊन तो शीण घालवत असे.
माझ्या धाकट्या मुलीलाही असेच झोपळ्याचे वेड होते. शाळेतून आली की मला शोधत ती गच्चीवरच येई.
मग तिच्या लहान विश्वातली सगळी गुपिते, रुसवे-फुगवे, झोपाळ्यावर बसून मला सांगितल्याशिवाय तिला चैन नाही पडायचे. मोठ्या लेकीला नाही फारसा आवडायचा झोपाळा. पण तरी तीही,समोर खुर्ची घेऊन बसायची मी मात्र झोपाळ्यावरच. डॉक्टर नवराही घरी आला की समोर बसून कॉफी पीत, आम्ही इतक्या गप्पा मारत असू की बस. तोच एक निवांत वेळ असे आम्हाला आमच्यासाठी असा.
मग माझ्या बहिणीही यायच्या लाडक्या भाचीशी खेळायला. ताई हॉस्पिटलमध्ये असली तरी भाची आनंदाने लाडक्या मावश्याबरोबर खेळत असे. त्याही तिला घेऊन गाणी म्हणत बसत झोपाळ्यावर.
_दिवस भराभर पुढे गेले.आम्ही गावाबाहेर बंगला बांधला. मी टेरेसवर छान झोपाळा बसवून घेतला.
मुलीही लग्न होऊन परदेशात गेल्या. माझ्या बहिणींचीही लग्ने झाली. सुदैवाने त्यांनाही मोठी घरे मिळाली.
हौसेने प्रत्येकीने आपापल्या घरी झोपाळा बांधलाच.
अजूनही आम्ही एकमेकींकडे गेलो की म्हणतो, झोपाळ्यावर बसूया ग बाई. त्याशिवाय गप्पाना रंगत येत नाही.
माझी झोपाळा वेडी मुलगी अमेरिकेला गेली. त्यांनी स्वतः चे छान मोठे घर बांधले. खूप मोठे बॅकयार्ड आहे तिचे.
तिने खूप छान झोपाळा घेतला तिथे. मी तिकडे गेल्यावर बघितला. मला अतिशय आनंद झाला.
तिची लहान मुलगी आणि मी, तासनतास झोपाळ्यावर बसून गोष्टी ऐकत असू. आजी,गोष्ट सांग ना मला मराठी, असे म्हणत ती मला झोपाळ्यावरच घेऊन जायची. वंशपरंपरा झोपाळ्याचे वेड तिच्यातही उतरलेय.
परवाच मी आमच्या पूर्वी राहत होतो त्या लक्ष्मी रोडवर गेले होते. तिथे मैत्रीण भेटली. म्हणाली ,” आहे का ग अजून तो झोपाळा तुमचा ?”
म्हटले, ” नाही ग हेमा, वडिलांनी वाडा विकला ना आमचा,झाली की ग वीस वर्षे. पण आम्ही मात्र झोपाळा बांधलाच आहे आमच्या घरात. वडिलांचा झोपाळा धाकट्या बहिणीने फार्म हाऊस वर नेला. खूप मोठे फार्म हाऊस आहे तिचे. तिकडे तो रुबाबात अजूनही झुलतोय. आमच्या आई वडिलांची माया आम्हाला देत.”
हेमाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली,” निदान तुमच्या झोपाळ्याला भेटायला तरी स्वातीच्या फार्म हाऊसला आलेच पाहिजे.”
आम्ही तिघी बहिणी स्वातीच्या फार्म हाऊसवर आवर्जून जातो.आणि झोपाळ्यावर बसूनच चहा,जेवणही तिथेच घेतो. आमचे अतिशय गोड सज्जन मेहुणे आम्हाला बसल्या जागी चहा कॉफी पुरवतात.
आम्हा बहिणींचे झोपाळा वेड सर्वानाच माहीत आहे आता.
—-झोका घेताना,असा भास होतो की समोर आमचे आईकाका बसलेत आणि त्यांच्या सुखी असलेल्या लेकींकडे कौतुकाने डोळे भरून बघत आहेत.—–
माणसानं कितीही भौतिक प्रगती केली, अगदी चंद्रावर, मंगळावर पोहोचला , किंबहुना प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा ध्यास जरी त्यानं घेतला; तरीही काही गोष्टींपासून तो कायमच अंतरावर राहिला आहे- किंबहुना तो अनभिज्ञच आहे. अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्त्ववेत्ते अशाच काही ‘अज्ञात’ गोष्टींचा शोध घेत असतात. तर संवेदनशील कलाकार, लेखक हे या अज्ञात गोष्टींचा आपल्या कल्पनाशक्तीद्वारे मागोवा घेऊन ते आपल्या कलाकृतीद्वारे, साहित्याद्वारे सादर करतात. अतिशय बोलकं मुखपृष्ठ असलेला लेखिका डॉक्टर छाया महाजन यांचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह हे याचंच एक उत्तम उदाहरण.
‘अज्ञात’ या शब्दाचा पैसच इतका व्यापक आहे की गूढता, रहस्यमयता, असहाय्यता यांचं व्यामिश्र दर्शन यातुन घडतं. आपल्यालादेखील भवतालातल्या अनेक घटनांमधून या अज्ञाताचं अस्तित्व जाणवत राहतं. आणि अशा अज्ञात गोष्टींना आपण आपापल्या परीने अर्थ देण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अखेरीस त्यातली अपरिहार्यता स्वीकारून सामोरेही जातो.
अशाच प्रकारे अज्ञाताला सामोरं जाणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींच्या व्यथा या कथांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात. सर्वच कथा उत्तम असून त्या आपल्याला अंतर्मुख करतात, विषण्णताही निर्माण करतात. समाजातल्या अनेक वाईट गोष्टी, चालीरीती या सगळ्यांचा परिणाम तर त्यात दिसतोच. पण मानवी मन आणि भावना यांच्या दौर्बल्याची स्पष्ट जाणीवही या कथांतून होते. वास्तववादी असणाऱ्या या कथा अज्ञाताची दखल घेत असल्या तरी त्यावर कुठलाही उपदेश किंवा पर्याय सुचवण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि हेच या कथांचं खरं बलस्थान आहे, जे संपादण्यात लेखिकेला कमालीचं यश मिळालं आहे. त्यामुळेच या अज्ञाताचं महत्त्व वाचकाच्या मनात नोंदलं जाऊन, पात्रांच्या सुखदुःखाशी वाचक नकळतच समरस होतो. यातल्या अधिकतर कथा या नायिकाप्रधान आहेत. शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा सर्व स्तरातल्या स्त्रीजीवनाचं भेदक दर्शन त्या घडवतात.
हे दर्शन घडवताना लेखिकेची ओघवती आणि संयत लेखनशैली ही फार मोठी भूमिका पार पाडते. एकूण अकरा कथा असलेल्या या संग्रहातून फक्त कुठल्या एका कथेचा उत्तम म्हणून उल्लेख करणं फार अवघड आहे. आणि तशी तुलना करणंही योग्य नाही, कारण प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे.
अज्ञाताच्या या कथा वाचल्यानंतर मला जाणवलेली गोष्ट म्हणजे जरी या अज्ञाताचा शोध ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असली तरी त्याला अपरिहार्यपणे तोंड देण्याऐवजी मानसिक सामर्थ्याचं महत्त्व जाणून तत्कालीन सुसंगत कृतीद्वारे तोंड देणं… आणि त्यातून बाहेर पडणं हे आवश्यक आहे. आणि हेच कदाचित या अज्ञाताला उत्तर देण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे.
(तळटीप – आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह. लेखिकेने आणि जाणकारांनी एकांकिकेसाठी या कथासंग्रहाचा जरूर विचार करावा.)
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख समय व ज़िंदगी। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 132 ☆
☆ समय व ज़िंदगी ☆
समय व ज़िंदगी का चोली दामन का साथ है तथा वे दुनिया के सर्वश्रेष्ठ शिक्षक हैं। ज़िंदगी समय की महत्ता, सदुपयोग व सर्वश्रेष्ठता का भाव प्रेषित करती है, तो समय हमें ज़िंदगी की कद्र करना सिखाता है। समय नदी की भांति निरंतर बहता रहता है; परिवर्तनशील है; कभी रुकता नहीं और ज़िंदगी चलने का दूसरा नाम है। ‘ज़िंदगी चलने का नाम/ चलते रहो सुबहोशाम।’ ज़िंदगी हमें यह सीख देती है कि ‘गया वक्त कभी लौटकर नहीं आता और हम अपनी सारी संपत्ति देकर उसके बदले में एक पल भी नहीं खरीद सकते।’ सो! समय को अनमोल जान कर उसका सदुपयोग करें। दूसरी ओर समय ज़िंदगी की महत्ता बताते हुए इस तथ्य को उजागर करता है कि ज़िंदगी की कद्र करें, क्योंकि मानव जीवन उसे चौरासी लाख योनियों के पश्चात् प्राप्त होता है। इसलिए कहा गया है कि ‘यह जीवन बड़ा अनमोल/ ऐ मनवा! राम राम तू बोल।’ एक पल भी बिना सिमरन के व्यर्थ नष्ट नहीं जाना चाहिए, क्योंकि मानव जीवन का अंतिम लक्ष्य कैवल्य की प्राप्ति है।
ज्ञान प्राप्ति के तीन साधन हैं– मनन, अनुसरण व अनुभव। मनन सर्वश्रेष्ठ मार्ग है और सत्य है। अनुसरण सरल व सहज मार्ग है और अनुभव सबसे कड़वा होता है। महात्मा बुद्ध के उपरोक्त कथन में जीवन जीने की कला का दिग्दर्शन है। सो! मानव को हर वस्तु व व्यक्ति के विषय के बारे में चिंतन-मनन करना चाहिए, ताकि उसकी उपयोगिता-अनुपयोगिता, औचित्य-अनौचित्य व लाभ-हानि के बारे में सोच कर निर्णय लिया जा सके। यह सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम मार्ग है। अनुसरण बनी-बनाई लीक पर चलना। मानव को सीधे- सपाट व देवताओं-महापुरूषों द्वारा बताए गये मार्ग का अनुसरण करना चाहिए। ज्ञान-प्राप्ति का अंतिम मार्ग है अनुभव; जो कटु होता है। ऐसा व्यक्ति दूसरों पर लेशमात्र भी विश्वास नहीं करता। वह ग़लत-ठीक के भेद से अवगत नहीं हो पाता। जैसे एक बच्चा बड़ों की बात न मान कर आग को छूता है और जल जाता है और रोता व पछताता है। वास्तव में यह एक कटु अनुभव है, जिसका परिणाम कभी भी श्रेयस्कर नहीं होता। सो! महापुरुषों की सीख पर विश्वास करके उनके द्वारा निर्दिष्ट मार्ग का अनुसरण करना अत्यंत कारग़र है।
मैक्सिम गोर्की के मतानुसार ‘कोई सराहना करे या निंदा दोनों ही अच्छे हैं, क्योंकि प्रशंसा हमें प्रेरणा देती है और निंदा हमें असामान्य स्थितियों में सावधान होने का अवसर प्रदान करती है।’ यह तो आम के आम, गुठलियों के दाम वाली स्थिति है। जब काम स्वेच्छा से हो, तो जीवन में आनंद-प्रदाता है और जब पाबंदी में हो, तो जीवन गुलामी है। यदि मानव की सोच सकारात्मक है, तो प्रशंसा व निंदा दोनों स्थितियाँ हितकारक व प्रेरक हैं, क्योंकि जहां प्रशंसा मानव को प्रोत्साहित व ऊर्जस्वित करती है; वहीं निंदा हमें अनहोनी से बचाती है। प्रशंसा में लोग फूले नहीं समाते तथा निंदा में हताश हो जाते हैं। वास्तव में ये दोनों स्थितियां भयावह हैं। इसलिए मानव को स्वतंत्रतापूर्वक जीने का संदेश दिया गया है, क्योंकि पाबंदी अर्थात् परतंत्रता में रहकर कार्य करना व जीवन-यापन करना गुलामी है। अमुक विषम परिस्थितियों में मानव का सर्वांगीण विकास संभव नहीं है। वैसे मानव हर स्थिति में यह चाहता है कि प्रत्येक कार्य उसकी इच्छानुसार हो, परंतु ऐसा संभव नहीं होता। हम सब उस सृष्टि-नियंता के हाथ की कठपुतलियाँ हैं और वह हमसे बेहतर जानता है कि हमारा हित किस में है। वैसे भी स्वतंत्रता में आनंद है और निर्धारित नियम व कायदे-कानून व दूसरों के आदेशों की अनुपालना के हित कार्य करना परतंत्रता है; गुलामी है। इस स्थिति में मानव की दशा पिंजरे में बंद पक्षी जैसी हो जाती है। वह स्वतंत्र विचरण हेतु हाथ-पांव चलाता तो है,परंतु सब निष्फल। अंत में वह निराश होकर जीवन ढोने को विवश हो जाता है।
दो मिनट में ज़िंदगी नहीं बदलती, परंतु सोच-समझ कर लिए गये निर्णय से ज़िंदगी बदल जाती है। इसलिए मानव से यह अपेक्षा की जाती है कि वह निर्णय लेने से पूर्व उस समस्या के विभिन्न पहलुओं पर चिन्तन-मनन करे, ताकि उसे श्रेष्ठ परिणाम प्राप्त हो सकें। मुझे स्मरण हो रही हैं श्री जयशंकर प्रसाद की पंक्तियां ‘ज्ञान दूर, कुछ क्रिया भिन्न है/ इच्छा क्यों पूरी हो मन की/ एक दूसरे से मिल ना सके/ यह विडंबना है जीवन की’ के माध्यम से उन्होंने इच्छा-पूर्ति के लिए ज्ञान व कर्म के सामंजस्य की सीख दी है। इसके विपरीत आचरण करना मानव जीवन की विडंबना है।
मुझे स्मरण हो रही हैं आनंद फिल्म के गीत की वे पंक्तियां–’जिंदगी एक सफ़र है सुहाना/ यहां कल क्या हो किसने जाना’ अर्थात् भविष्य अनिश्चित है। सो! इस गीत के माध्यम से वर्तमान में जीने का सुंदर संदेश प्रेषित है। ज़िंदगी के सुहाने सफ़र में कल की चिंता मत करें और आज को जी लें, क्योंकि कल कभी आता नहीं। भविष्य सदैव वर्तमान के रूप में दस्तक देता है। गीता में भी यही संदेश प्रेषित है कि ‘जो हो रहा है अच्छा है; जो होगा वह भी अच्छा ही होगा और जो हो चुका है; वह भी अच्छा ही था। इसलिए ऐ मानव! तू हर स्थिति में खुश रहना सीख ले। जो इंसान अपनी इच्छाओं, आशाओं, आकांक्षाओं व तमन्नाओं पर अंकुश लगाना सीख जाता है; उसे संसार रूपी भंवर में नहीं फंसना पड़ता और वह अपनी मंज़िल पर अवश्य पहुंच जाता है। अक्सर अधिक समझदार व्यक्ति की हज़ारों ख़्वाहिशें दिल में ही रह जाती हैं, क्योंकि सीमित साधनों द्वारा असीमित इच्छाओं की पूर्ति संभव नहीं है।
‘सुख के सब साथी, दु:ख में ना कोई’ अर्थात् लोग मुस्कुराहट की वजह जानना चाहते हैं; उदासी की वजह कोई नहीं पूछता।’ इसलिए मानव को ख़ुद से मुलाकात करने की सब ख दी गयी है। जब मानव स्वयं को समझ लेता है; वह आत्मावलोकन करने लगता है, तो उसे दूसरे लोगों के साहचर्य व सहयोग की आवश्यकता ही नहीं पड़ती। समस्याएं हमारे मस्तिष्क में कैद होती हैं और अधिकतर बीमारियों की वजह चिंता होती है। इसका कारण यह है कि मनुष्य चुनौतियों को समस्याएं समझने लगता है और बड़े होने तक वे अवचेतन मन में इस क़दर रच-बस जाती हैं कि लाख चाहने पर भी उनसे निज़ात नहीं पा सकता। उस स्थिति में हम सोच- विचार ही नहीं करते कि यदि समस्याएं ही नहीं होंगी, तो हमारी प्रगति कैसे संभव होगी और हमारी आय के साधन भी नहीं बढ़ेंगे। वैसे समस्याओं के साथ ही समाधान जन्म ले चुके होते हैं। यदि सतही तौर पर समस्त समस्याओं से उलझा जाए, तो उन्हें सुलझाने में न केवल आनंद प्राप्त होता है, बल्कि गहन अनुभव भी प्राप्त होता है। नेपोलियन के मतानुसार ‘समस्याएं तो भय व डर के कारण उत्पन्न होती हैं। यदि डर का स्थान विश्वास ले ले, तो वे अवसर बन जाती हैं। वे विश्वास के साथ आपदाओं का सामना करते थे। इसलिए वे समस्याओं को सदैव अवसर में बदल डालते थे।
समय अनमोल है। यह हमें जीने की कला व कद्र करना सिखाता है और ज़िंदगी समय उपयोगिता का पता ठ पढ़ाती है। सुख-दु:ख एक सिक्के के दो पहलू होते हैं और समस्याएं भी आती-जाती रहती हैं। सो! मानव को धैर्यपूर्वक समस्याओं का सामना करना चाहिए तथा आत्मविश्वास रूपी धरोहर को सहेज कर रखना चाहिए, ताकि हम आपदाओं को अवसर में बदल सकें। समय और ज़िंदगी सबसे बड़े शिक्षक हैं; सीख देकर ही जाते हैं। वैसे इंसान की सोच ही उसे शक्तिशाली या दुर्बल बनाती है। बनूवेनर्ग के मतानुसार ‘वह किसी महान् कार्य के लिए पैदा नहीं हुआ; जो वक्त की कीमत नहीं जानता।’ भगवान श्रीकृष्ण भी ‘पूर्णता के साथ किसी और के जीवन की नकल कर, जीने की तुलना में अपने को पहचान कर अपूर्ण रुप से जीना बेहतर स्वीकारते है।’ मानव को टैगोर की भांति ‘एकला चलो रे’ की राह पर चलते हुए अपनी राह का निर्माण स्वयं करना चाहिए, क्योंकि वह मार्ग आगामी पीढ़ियों के लिए अनुकरणीय बन जाता है।
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना “माहिया”।)