“फुलोरा कलेचे माहेरघर” या ग्रुपने ‘माझा आवडता कवी’ ही स्पर्धा व्हिडिओ स्वरूपात ऑनलाईन घेतली होती. त्यामधे सौ.ज्योत्स्ना तानवडे यांना चतुर्थ क्रमांक मिळाला आहे.
आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे याचे ‘ई अभिव्यक्ती’ परिवारातर्फे
☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2☆ श्री अरविंद लिमये ☆
“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. म्हणून म्हटलं. फार अंधार करू नका.”
“आण्णा?” त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले. आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.”
“मला आधी का कळवलं नाहीत? आॅपरेशनचं?”
“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय. डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं. तू उगाच काळजी करतेस.”
“आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.
“मी… मी काम असं नाही गं…”
” काहीच करत नाही?”
“तसं म्हणजे करतो आपलं मला जमेल ते… जमेल तसं…”
“का?” तिने तीव्र शब्दात विचारलं.
“का म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम. ते गप्प बसले.
“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची?”
“तुला…सारंग बोललेत का हे सगळं?”
“त्याने कशाला सांगायला हवं? आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की. दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या? तेही या वयात? वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते. गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकल वरून एखादातरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”
“ए.. वेडी आहेस का तू? तू..तू तिला यातलं कांहिही बोलायचं नाहीss”
“का नाही बोलायचं? दादाशी तरी मी बोलणारच. चांगली खडसावून विचारणाराय”
“सावू… हे बघ, तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल. ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”
हे खरं की खोटं तिला समजेचना. ती अगदी हळवी होऊन गेली. आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.
“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले. तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..
“सावू, हे बघ, शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते. सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो. तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला. अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”
“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”
“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’ असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो. मी जायला नको होतं हे त्या पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”
सविता विचारात पडली हे सगळं असंच असेल? आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.
“सावू, तुला सांगू? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक. माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची. पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय. सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं. पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची. याच बाबतीत नाही सावू, तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”
सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं. “माझ्यावरील प्रेमापोटी सावू, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं. जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”
या शेवटच्या वाक्यात ‘बाहुबली भाग- २ ची बीजे रोवली होती आणी भाग- २ येणार हे नक्की होते.
*”भाई” वरचा लेख व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यावर* टुकार लेखकाचे कौतुक करायला अनेकजण पुढे आले. टुकार लेखकाच्या लक्षात आले की भाई- भाग २ ची बीजे पहिल्या लेखात आहेतच की, मग काय .
लिहायचे निमित्य बाकी काही नाही. (नाहीतर लिहायची हिंम्मत तरी झाली असती का? , आता या टुकार लेखकाला कसे समजवायचे की भाग- १ चीच हवा जास्त होते. २,३ वगैरे कामाचे नसतात. असो ).
तर पहिल्या भागात, भाईं सुनिताबाईंना सांगत होते की बरं झालं अत्रे ढाराढूर झोपले होते नाहीतर सकाळी आपल्याला विडंबन रुपी गाण्याचा ‘झेंडूच्या फुलांचा’ हार मिळाला असता.
मंडळी, अत्रे अजिबात झोपले नव्हते बरं का. त्या दोघांचे बोलणे आचार्यनी सगळे ऐकले. भाई आणि सुनिताबाईं पुण्याला गेल्यावर “फाॅर अ चेंज” अत्रे भाईंच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी झेंडूच्या फुलांचा हार विणायला घेतला.
चाल: बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला)
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ….
चिमणा गटणे, साहेब रावा
चिमण्या थेटरात, “म्हैस” थांबवा
चिमणी पोर , घेऊन गाडी
हेल्मेट घालते, आपल्या नव-याला
चिमणं चिमणं “सिंबा” थांबवलं ,त्याही थेटरला
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..
शिलेदार ‘महाराष्ट्र भूषण’ माझा, थोर असा साहित्याचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या कलेला .
‘आहे मनोहर तरी’ पसारा, खेळ पाहुनी जीव रंगला
गोजिरवाणी जुगलबंदी, वाजवितो भाई पेटी गाण्याला
येडं यडं मन येडं झालं पाहून “भाईला”
भाई भाई, व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..
आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावर क्र-१ वरुन सुटणा-या “दख्खनच्या राणीने” आपल्या नियोजीत वेळेत एक शिट्टी जोरात मारून मुंबई कडे झेप घेतली. आज तिला माहित होते की गाडीत अख्या मराठी सृजनांचे लाडके “भाई आणि सुनिता बाई ” विराजमान आहेत. तळेगावत ते लोणावळा धुकं जास्त असल्याने राणीला मुंबईला पोहोचायला थोडा उशीरच झाला पण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर ‘धावपट्टीच्या’ कामासाठी मेगा-ब्लाॅग घेतल्याने भाईंचे पुष्पक थोडे उशिराच सुटणार होतं त्यामुळे काळजीचे काम नव्हतं.
इकडे आचार्य झेंडूच्या फुलांचा हार हातात घेऊन स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी ‘ भाई’ अजून कसे आले नाहीत म्हणून येरझा-या घालत आहेत.
*पु. ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य, लाडक्या भाईंना टुकार लेखकाकडून ही लेखनांजली समर्पित* ?
संध्याकाळची वेळ होती. टेरेवर वनिता फेऱ्या मारत होती. आपण किती चाललो हे पाहण्यासाठी सोबत मोबाईल ही होता. आवडती गाणी ऐकत शांत फिरण्यातील मौज काही औरच होती.तो आनंद घेत असताना मोबाईलची रिंग वाजली. बघते तर भाचीचा होता.ही प्राची पुण्यात जाॅब करते.” हं… बोल प्राचू,काय म्हणतेस?”
“अगं… अतू आज ना… मी मुलगा बघायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली.”
“तूला कसा वाटला तो? काय करतो? कसा दिसतो? कुठे असतो?”
“अगं किती प्रश्न ते? हे बघ त्याचा फोटो आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी तुला सेंट केले आहे. मग मला कळव. तुला कसा वाटला तो? या बाबत तूच माझी गुरू आहेस बरं. बरं फोन ठेवते, मला एक काॅल येतोय रात्री निवांत बोलू,बाय..बाय..आय लव्ह यू.”
फोन कट झाला.
मनात आले. ही पिढी किती प्रक्टिकल आहे. बरोबर चूक हा भाग पुढचा. ही पिढी उगाच गुंतून पडत नाही. त्रास करून घेत नाही.भाऊ माहिती पाठवतो. मग प्राची पुण्यात नोकरी सांभाळत मुलांना बघते. ते ही एका हाॅटेल मध्ये एकटी जाते. बोलते. विचारांची देवाण घेवाण होते.हे सारं किती सुटसुटीत छान आहे. एका क्षणात माझे मन भूतकाळात गेले. आमच्या वेळी पस्तीस, चाळीस वर्षा पूर्वी घरात मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणजे किती गडबड, किती लोकांची ऊठबस, किती तयारी, किती दमणूक होत असे.
घर स्वच्छ करा, बैठकीची खोली सजवा, ठेवणीतल्या कपबश्या काढा स्वच्छ करून ठेवा, कांद्यापोह्यानची तयारी करा, कांदेपोहे सुधा एकदम स्पेशल. त्यात शेंगदाणे हवेत, बटाटा हवा, खोबरंकोथिंबीर हव, लिंबू,बारीक शेव हवी. किती मिजास असे पोह्यांची. असे गरमागरम पोहे समोर आले की सगळं विसरायला होत असे. एवढ करून ही मुलाला बिधास्त बघता येत नसे. बघण्यांची चोरी. कुठेन तरी लांबून, एखाद्या फटीतून चोरुन बघाच आणि मग अंदाज करत बसायचं यातला नेमका नवरदेव कोण? मुलीला बघताना मुले आपल्या सोबत तीन चार मित्रांना हमखास घेऊन येत, साडी सांभाळत खाली मान घालून बसायचं, चोरट्या नजरेने बघायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हळू आवाजात उत्तरे द्याची. आपली इच्छा असली तरी मुलाला प्रश्न विचारण्यांची हिंमत नसायची. घरातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आधी दटावून ठेवलेले असायचे तुझा शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. तिथं वर तोंड करून काही बोलून आपली अक्कल पाजळू नकोस. खर तर परक्या माणसा समोर जाताना आधी मनात भिती असायची, चारचौघात बोलण्यांची सवय नसायची, मग काय बऱ्याच वेळा ततपप व्हायच. अश्या वेंधळा मुली लगेच पसंतीला उतयाच्या. पुढे ही मुलगी घरात निमुट वागेल असा अंदाज बांधला जायचा. खर तर बऱ्याच मुलीच्या मनाचा तिथे चोळामोळा होत असे. तिच्या विचारांना फारशी किंमत नसे.ती मिळवती असली तरी ही. घराण्यांची अब्रु जायला नको म्हणून बोलायचे नाही. चांगल्या वळणाची, सुसंस्कृत, शिवणटीपन करणारी, स्वयंपाकपाणी करणारी अशी किती तरी लेबलं चिटकवली जायची. ती मुलगी मात्र मुक. घरच्या पुढे चालत नसे. बऱ्याच वेळा मुलींची फसगत होत असे. दोघांनी भेटून मन समजून घेणे खुप पुढची गोष्ट. पुन्हा एकदा बघण्यांची पध्दत नव्हती, लग्न नंतर समजे तिला आवडलेला मुलगा नेमका मुलाचा मित्र होता. मग काय आलीया भोगाशी असावे सादर. हसतमुख राहून संसार नेटका करावा लागे.
माझ्या बाबतीत तर अजून वेगळे आम्ही पाच भावंडे.दोन बहिणी मोठ्या तर एक छोटी. भाऊ माझ्या पाठीवर.मोठ्या बहिणीना बघायला येणार त्याना त्रास नको म्हणून प्रत्येक वेळी घर आवरण्या पासून पोहे करे पर्यंत सगळं कामे मी करत असे. पोहे इतके बनवले की डोळे बांधून ही आज बनवेन. पण माझ्या वेळी मात्र घरी कोणीच नव्हते. मीच घर आवरायचे, बैठकीची खोली सजवायचे, पोहे करायचे, साडी नेसून पाटावर बसायचे. किती वेळा पाहुण्याना पत्र व्यवहार ही मीच करे. मी यात एकदम तंज्ञ झाले.
प्राचीमुळे आज इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा मिळाला. आज काल अशी झंझटे नाहीत. हाॅटेल मध्ये सगळं तयार असतं, कसली आवरा आवर नाही, सजावट नाही, कांदेपोहे नाहीत, मनावर दडपण नाही, सगळ कस मस्त मोकळं. मुलामुलीना आपलं मत मांडता येते, एकमेकांना जाणून घेता येते. अडचणी मांडता येतात, हे सारं चांगले आहे. याचा पुरस्कार व्हायला हवा. मुलीनां ही एक व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे दिली गेली पाहिजे. लग्न ठरवताना मुला मुलीचा बाजार होता कामा नये.
आजवर कांदेपोह्यांनी अनेक संसार उभारले, जीवनात आनंद पेरला, आज संकल्पना बदलत आहे. मुलामुलीची बघण्यांची ठिकाण बदलत आहेत. खाण्यांचे पदार्थ बदलत आहेत पण लग्न जुळवण्याचा विषय आला की कांदेपोहे समोर येतातच त्यांचे लग्न जमवण्यात अतूट नाते आहे. आता फेऱ्या मारताना माझ्या समोर हा भूतकाळाचा का उभा राहावा? काही झालं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, नातं दृढय करण्यासाठी काही तरी निमित्त हवं असतं ते निमित्त आजवर समाजाने त्या कांदेपोहे यात शोधले यात त्यांचा काय दोष?
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम दोहे । )
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज पस्तुत है आपका अभिनव गीत “अचीन्हें आतपों में… ”। )