मराठी साहित्य – आलेख – ☆ खाकीतली आई ☆ – सौ संगीता अजित माने

सौ संगीता अजित माने

 

(मराठी साहित्यकार सौ संगीता अजित माने जी का e-abhivyakti में स्वागत है। महाराष्ट्र पुलिस में सेवारत होते हुए अपने अतिव्यस्त कार्य प्रणाली के साथ परिवार, साहित्य एवं समाज सेवा में सामंजस्य बनाना इतना आसान नहीं है। हम सौ संगीता जी के इस जज्बे का सम्मान करते हैं। वे हम सब के लिए भी अनुकरणीय हैं। हम श्रीमती रंजना  मधुकरराव लसणे जी  के आभारी हैं, जिन्होने सौ संगीता अजित माने जी जैसी प्रतिभाशाली साहित्यकार की रचनाओं को हमारे पाठकों से साझा करने का अवसर दिया।)

संक्षिप्त परिचय 

सौ संगीता अजित माने , म पो हे काॅ सातारा

साहित्य 

  • छंद कविता/कथा लेखन संगीत समाजसेवा
  • सन २०१८ महिला दिन निमित्ताने कै वामनराव बोर्डीकर इंग्लीश स्कूल जिंतूरने उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित केले
  • सन २०१९ मशाल न्यूज नेटवर्क आयोजित युट्युब चॅनेल ने आयोजित काव्य स्पर्धा पर्व दुसरे तृतीय क्रमांक विजेता पुरस्कार
  • व्हाट्सएप चे विविध साहित्यिक समुहातील स्पर्धा मध्ये सर्वोत्कृष्ट ते लक्षवेधी पर्यंत ७८६ प्रमाणपत्र
  • सन २०१९ माहुर काव्य संमेलन काव्यसखी पुरस्काराने सन्मानित
  • २ जून २०१९ रोजी काव्यस्पंदन तर्फे महाराष्ट्र भुषण अष्टपैलू कामगिरी पुरस्कार सन्मानित
  • विविध समुहात परिक्षण करीता पुरस्कार प्राप्त
  • पोलीस दला मध्ये विविध कामगिरी बक्षीसे

समाजसेवा

  • ३४ लग्न विनामोबदला जमवली तसेच २ कन्यादान करुन दिली

 

☆  ससममान प्रस्तुत है सौ संगीता अजित माने जी का आलेख “खाकीतली आई”। ☆     

☆ खाकी वर्दी  में माँ की विवेचना कोई खाकी वर्दी में सेवारत माँ ही कर सकती हैं।  ☆   

 

? खाकीतली आई ?

 

*खाकीतल्या आईचा*

*रडी भुकेन घरी तान्हा*

*कर्तव्याला बांधलेने*

*ती तिथेच जिरवी पान्हा*

“आई” उच्चारता हा शब्द प्रत्येकाच्या समोर उभी राहते त्याच्या मातेची प्रेमळ छबी .तीने मुक्तपणे केलेली प्रेम बरसात छोट्या मोठ्या संकटात झालेली आपल्या समोरची ढाल आणि आपल्या सुखासाठी ती तहहयात करीत असलेला त्याग.

खाकीतली आई ही अगदी तशीच असते . उदरी जाणवता पहिला श्वास बाळाचा इतर आई सारखीच ती सुखावते मनात आनंदाचे भरते आले तरी एक पोलीस म्हणून तीला कराव्या लागणार्‍या ड्यूटीचा गर्भास काही त्रास तर होणार नाही या कल्पनेने धास्तावते खाकीतली आई. आई म्हणून तीच धास्तावण इथुनच प्रारंभत .

गर्भधारणेनंतर होणाऱ्या उलट्या चक्कर थकवा तीला ही निसर्ग नियमाप्रमाणे होत असतोच पण नोकरीत रोजरोज कोण रडगाणे ऐकणार म्हणून कोणताही सबब न  सांगता ती नेमली नोकरी करत राहते. नोकरी करत करत दिवस लागतात संपू आठव्या नवव्या महिन्यात तर पोटाचा आकार व भार याचा त्रास कितीही झाला तरी ती रजा काढत नाही कारण ती रजा तीला बाळासाठी त्याच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी घालवायची असते.

सन 2006 च्या आयोगाने शासकीय नोकरदार महिलांना सहा महिने बाळंतपणाची रजा देवू केली फार चांगला निर्णय होता तो. त्यापुर्वी तीन महिन्यांतच   बाळाला घरी सोडून मातेस नोकरी वर याव लागे कार्यालयीन कामकाज करणार्‍या महिला ठराविक कार्यालयीन वेळेनंतर बाळाला वेळ देवू शकतात पण पोलीस असणाऱ्या महिलांचे तसे नसते आरोपीपार्टी कायदा व सुव्यवस्था  बंदोबस्त मंत्री दौरा बंदोबस्त या  अनियमित काल असलेल्या दैनंदिन नोकरी ती नाकारुच शकत नाही. अंगावर पुरेसे दुध असताना ही ती बाळाला स्तनपान  करु शकत नाही अस ही म्हणता येईल की,स्तनपान बाळाचा हक्क ती त्याला देवु शकत नाही.  नोकरीवर असताना आलेला पान्हा तीच्या वर्दीवर वाहुन जातो त्यावेळी सहपुरुष कर्मच्यार्यानां तो दिसु नये ही स्त्रीसुलभ लज्जा तीच्या मनात येते त्या वेळी होणारी तीची तारांबळ आणि वाटणारी लाज याने खाजिल होते ती . घरी बाळाला सांभाळायला कोणी असेल तर ठिक पण नसेल कोणी तर अजूनच समस्या पाळणाघरात ठेवले तरी पाळणाघराची ठराविक वेळ संपल्यावर रोज बाळाला कुठे ठेवायचे कोण आपल्या बाळाला संभाळेल एक नाही हजार प्रश्नांचा पाठपुरावा ती करत असते कधी कधी तर बाळाची रांगणे चालणे बोलणे पहिली बाललीला पाहणे तीच्या वाट्याला येत नाही हे फक्त एक आईच समजू शकते  त्या बाळलीला पाहणे तीच्यासाठी किती आनंदायक क्षण असतो जो तीच्या ह्रदयावर कायमचा कोरला जातो.

मुले शाळेत जात असतील भुकेने व्याकुळ होऊन येतात घरी, मायेने गरम गरम खाऊ घालणारी आई नसते त्यांच्या नशिबी  गृहपाठ कर,  लांब खेळायला जावु नको इत्यादी सुचना फोनवरच देत असते खाकीतील आई  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पालकसभा नाही वेळ देवू शकत. एवढच काय तापाने फणफणलेल्या मुलाला ठेवून तीला नोकरीवर हजर राहावे लागते. नोकरीमध्ये शरीर करत असते नोकरी मन मात्र मुलांभोवती पिंगा घालत असते.

धावत असते ती रात्र दिवस संसार आणि नोकरीच्या तालावर या दोन्ही मध्ये तीच ती स्वअस्तित्वच विसरते फक्त चालू असते तीची कसरत घर घरातील माणसे नातेवाईक सणवार समारंभ  आजारपण यांना जपुन प्रामाणिकपणे नोकरी करते.

खाकीतली आई तरीही सगळीकडे दुर्लक्षित असलेली.

 

© सौ संगीता अजित माने ✍

*सातारा*

*७०५७८०८४४८*