श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अभिसारिका ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डोळयात वाच माझ्या तू गीत भावनांचे… 

आसवे ही तरळून गेली कुसकरल्या प्रीत सुमनाचें… 

अधरी शब्द खोळंंबले दाटल्या मनी कल्लोळाचे…

समजूनी आले मजला माझेच होते चुकीचे…

उधळून टाकिले स्व:ताला प्रीतीच्या उन्मादात… 

माझाच तू होतास जपले हृदयीच्या कोंदणात…

प्रितीच्या गुलाबाला काटेही तीक्ष्ण असतात… 

बोचले ते कितीही त्याची तमा मी कधीच ना बाळगली.. 

अन तू… अन तू शेवटी एक भ्रमरच निघालास… 

फुला फुलांच्या मधुकोषात क्षणैक बुडालास.. 

भास आभासाची ती एक क्रिडा होती तुझी…

कळले नाही तेव्हा पुरती फसगत होणार होती माझी… 

शुल अंतरी उमाळ्याने उफाळून येतोय वरचेवरी..

एकेक आठवणींचा पट उलगडे पदरा पदरावरी.. 

तू पुन्हा परतूनी यावेस आता कशाला ठेवू हि आस..

वाटलेच तुला तसे शल्य माझ्या उरीचे बघुनी जाशील खास..

होती एक अनामिक अभिसारिका …

तुझी ठेवेन आठवणी मी जरी तू विसरलास..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments