मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – विटेवरती हरित शहारे – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – विटेवरती हरित शहारे  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

फरशीखाली  माती दबली

माती नाही माता  गाडली

कट्ट्यावरती उघडी रहाता

त्या मातीवर विट ठेवली

थोडी तिजला मिळता जागा

बीज अंकुरून येई वरती

सजीवांच्या कल्याणास्तव

सृजनशील ही झटते धरती

इवले इवले सृजन पाहुनी

विटेवरती हरित शहारे

विट मनाशी हसून  म्हणते

या सृजनाने मीही सजले

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈