मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 152 ☆ हास्य कविता, जाडू बाई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 152 ? 

☆ हास्य कविता, जाडू बाई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

 बालपण आठवलं मला

मला माझी शाळा आठवली

शाळेजवळची जाडूबाई

डोळ्यासमोर तरळली…०१

 

शाळेत जायच्या रस्त्यावर

घर होते जाडूबाईचे

अवजड प्रचंड होती ती

सखुबाई नाव तिचे…०२

 

ठेगणी होती खूपच

दिसायला सुद्धा सावळी

आरडायची, ओरडायची

जशी वाघिणीची डरकाळी…०३

 

पोरं तिला चिडवायचे

जाडी जाडी म्हणायचे

ती मागे लागताच मग

लगेच पळून जायचे…०४

 

तिला पाहून खरेच हो

हसायला खूप यायचे

चेष्टा तिची करतांना

हसून हसून पोट दुखायचे…०५

 

होती मात्र खूप प्रेमळ

बोरं, चिंचा खायला द्यायची

तहान लागली उन्हाळ्यात

थंड थंड, पाणी पाजायची…०६

 

आम्ही थोडे मोठे झालो

पश्चाताप आम्हाला झाला

तिची चेष्टा न करण्याचा

संकल्प आम्ही केला…०७

 

सखुबाई आम्हाला बोलायची

मोकळी मुक्त, सहज हसायची

मला जाडी म्हणा रे सर्वजण

स्वतःच निर्भेळ, ठुमकायची…०८

 

एक शिकायला मिळाले

दोष कुणाला न द्यावा

ईश्वराची निर्मिती सर्व

सन्मान सर्वांचाच करावा…०९

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈