मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर बदल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर बदल ☆ श्रीशैल चौगुले ☆

जगण्यामधले अंतर

आशेत व्यापून आहे

पुढेच पाऊले पडती

भविष्य लपून आहे.

 

झाडावरले ते घरटे

पाखरु जपून आहे

चिंताच ऊद्याची लागून

झेपेत निपूण आहे.

 

डोळे झाकून ऊघडता

दुःखच निवारुन जाते

पुन्हा जीवन ऊमलते

मार्गही सोबतीच होते.

 

बघता-बघता जीवन

क्षणा-क्षणांनी त्या सरले

ऊमेद कळ्यांची घेऊन

झाड ऋतूसंगे झरले.

 

तसेच फुलांना बहर

वसंत मनाचा फुलवा

हसताना सुरकुतला

चेहरा सुखाचा खुलवा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈